एक्स्प्लोर

आजारपणाचं कारण दिलं, पण देशमुखांना साधी श्रद्धांजलीही वाहिली नाही, राजीनामा देताना धनंजय मुंडेंनी लहानपणा दाखवला; कराडला 'महाक्रूर दादा' म्हणत बच्चू कडूंचा प्रहार

Bacchu Kadu on Dhananjay Munde Resignation : धनंजय मुंडे यांनी राजीनामा देऊन भागणार नाही. या प्रवृत्तीला खतपाणी कोणी घातलं? असा सवालही बच्चू कडू यांनी उपस्थित केलाय.

Bacchu Kadu on Dhananjay Munde Resignation :  सरपंच संतोष देशमुख यांची हत्या (Santosh Deshmukh Death Case) करताना केलेल्या अमानुष अत्याचाराचे फोटो सोमवारी रात्री समोर आलेत. यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळत आहे. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीचीच शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. तर संतोष देशमुखांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी दबाव वाढत चालला होता. यानंतर धनंजय मुंडे यांनी आज मंगळवारी (दि. 04) अखेर मंत्रि‍पदाचा राजीनामा दिलाय. मात्र, धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर वैद्यकीय कारणास्तव मी राजीनामा दिल्याचं ट्विट त्यांनी केले आहे. यावरून माजी आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केलीय. 

बच्चू कडू म्हणाले की, धनंजय मुंडे यांनी राजीनामा देऊन भागणार नाही. या प्रवृत्तीला खतपाणी कोणी घातलं? या प्रवृत्ती कशाप्रकारे देशभरात आणि राज्यभरात वाढत चालल्या आहेत. पक्ष, कार्यकर्ता आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सत्ता एवढेच शिल्लक राहिलेले आहे. हातात तलवारी घ्या आणि कापा. बलात्कार करा, काहीही करा पण सत्ता आमच्या हाती द्या. एवढा विचार करणाऱ्या राज्यकर्त्यांचा निषेध केला पाहिजे. मारणारा कोणत्या जातीचा होता? मरणारा कोणत्या जातीचा होता? हा विषय महत्त्वाचा नाही. ज्या प्रवृत्तीने आणि ज्या पद्धतीने त्यांना मारलं हे फार वाईट आहे, असे त्यांनी म्हटले. 

लोकांना किती लहानपणा दाखवत आहात

बच्चू कडू पुढे म्हणाले की, वाल्मिक कराड सारख्या प्रवृत्तीला दहा, वीस वर्षात खतपाणी घातले गेलं. महाक्रूर दादा या ठिकाणी निर्माण होतो, गुंड निर्माण होते आणि त्याला राजाश्रय मिळते हे फार महत्त्वाचे आहे. धनंजय मुंडे यांनी स्वतःचा राजीनामा हा देशमुख यांना श्रद्धांजली देऊन दिला नाही. आजारपणाचे कारण देऊन दिले, असं त्यांनी सांगितलं. ही काय प्रवृत्ती आहे? लोकांना किती लहानपणा दाखवत आहात. तुम्ही मंत्री, आमदार आहात, मोठेपणा घेता आला पाहिजे, अशी टीका त्यांनी यावेळी धनंजय मुंडे यांच्यावर केली. तर एकीकडे प्रभू रामचंद्राचे नाव घ्यायचे आणि दुसरीकडे अशा प्रवृत्तीला खतपाणी घालायचे, असे म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

धनंजय मुंडे म्हणाले वैद्यकीय कारणास्तव राजीनामा, जितेंद्र आव्हाडांची लेक संतापली; ट्विट करुन सुनावलं

Dhananjay Munde Resignation : धनंजय मुंडेंचा राजीनामा केवळ फार्स, पुन्हा मंत्रिपद दिलं जाईल; CM फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी करत प्रणिती शिंदेंचा घणाघात

एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Baramati : बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर? निवडणूक जाहीर होताच नवी अपडेट, नेमकं काय घडलं?
बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर? निवडणूक जाहीर होताच नवी अपडेट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
मोठी बातमी! प.बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल
मोठी बातमी! प.बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल
Baramati and Rahuri By Election : बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक जाहीर, 23 एप्रिलला मतदान, मतमोजणी 'या' दिवशी, निवडणुकीचं संपूर्ण वेळापत्रक, जाणून घ्या
बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक जाहीर, 23 एप्रिलला मतदान, मतमोजणी 'या' दिवशी, निवडणुकीचं संपूर्ण वेळापत्रक

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत, पहिला ओपिनियन पोल समोर
Adinath Maharaj : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
SA vs NZ :  दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
West Bengal Election in 2 phases: केरळ, तमिळनाडू एकाच टप्प्यात अन् पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान; सीएम ममता अन् केरळात डाव्यांसमोर गड राखण्याचे आव्हान
केरळ, तमिळनाडू एकाच टप्प्यात अन् पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान; सीएम ममता अन् केरळात डाव्यांसमोर गड राखण्याचे आव्हान
Embed widget