एक्स्प्लोर

Navneet Rana : औरंगजेबाबद्दल ज्यांना प्रेम आहे त्यांनी आपल्या घरात त्याची कबर लावून घ्या;अबू आझमींच्या वक्तव्यावरून नवनीत राणा कडाडल्या

Navneet Rana : औरंगजेबची कबर छत्रपती संभाजीनगरमधून उखडून टाकली पाहिजे. तसेच ज्यांना प्रेम आहे त्यांनी आपल्या घरात त्या औरंगजेबची कबर लावून घ्यावी. अशी आक्रमक प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिलीय.  

मुंबई: औरंगजेब (Aurangzeb) हा उत्तम प्रशासक होता. त्याच्या राजवटीत भारताची सीमा ही अफगाणिस्तान आणि बर्मा देशापर्यंत होती, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी(Abu Azmi) यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन राज्यभरात वादंग निर्माण झाला आहे. दरम्यान याच प्रकरणावरून अमरावतीच्या माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा (Navneet Rana) यांनी अबू आझमींवर सडकून टीका केली आहे. ज्यांनी आमच्या संभाजी महाराजांवर क्रूर अत्याचार केला, अशा औरंगजेबची कबर त्या छत्रपती संभाजीनगरमधून उखडून टाकली पाहिजे. तसेच ज्यांना प्रेम आहे त्यांनी आपल्या घरात त्या औरंगजेबची कबर लावून घ्यावी. अशी आक्रमक प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिलीय.  
 
अबू आझमी यांनी सांगितले की औरंगजेब हा चांगला प्रशासक होता, तर त्यांना मी लक्षात आणून देते की त्यांनी एकदा छावा चित्रपट पाहावा. किंबहुना सरकारला मी आवाहन करते की, औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर नाव दिलं आहे. जे औरंगजेबला या राज्यात राहून आपला बाप म्हणून राहतात. अश्या लोकांना उत्तर देण्याच काम राज्य सरकारने केलं पाहिजे. असेही नवनीत राणा म्हणाल्या. हिंदुत्व विचारधारेचे सरकार आमचे आहे, असे बेताल वक्तव्य करणाऱ्यांना क्षमा नाही असेही त्या म्हणाल्या.

अबू आझमींवर मरीनड्राइव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी(Abu Azmi) यांनी औरंगजेबाविषयीच्या वक्तव्यावरुन मुंबईच्या मरीनड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना नेते आणि माजी आमदार किरण पावसकर यांनी या विषयी तक्रार दाखल करत मरीनड्राइव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अबू आझमी विरोधात आम्ही मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात पत्र दिलं असून त्याच्या विरोधात तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आमची आहे. हा दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रकार आहे. याबाबत पोलीस प्रशासनाकडून देखील सकारात्मक प्रतिसाद मिळालेला असून हे विधिमंडळ परिसरात घडले असल्याकारणाने या संपूर्ण प्रकरणाची वस्तुस्थिती समजून पुढील कायदेशीर कारवाई करण्याचा आश्वासन पोलिसांकडून देण्यात आल आहे. हे वक्तव्य समोर येताच एकनाथ शिंदे यांनी देखील हा मुद्दा गांभीर्याने घेतला असून अबू आझमी यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी देखील आमची मागणी आहे.

खरी शिवसेना जी आक्रमकता दाखवते ती इतर कोणीही दाखवणार नाही- किरण पावसकर

जे बाळासाहेबांचे विचार आहेत त्या विचाराला अनुसरून ज्या पद्धतीने ज्या औरंग्याचे गुणगान अबू आजमी यांनी गायलेले आहेत, त्यांना फक्त पुस्तक भेट देऊन चालणार आहे का? इतिहासाची मोडतोड करून कुठेतरी औरंगजेबाचा गुणगान या ठिकाणी गायले जात आहे, आणि हे गुणगान गात असताना खरी शिवसेना म्हणून आम्ही ज्या पद्धतीने आक्रमकता दाखवलेली आहे ती आक्रमकता इतर कोणीही दाखवणार नाही. हे फक्त बोलून घरीच बसणार असल्याचा टोला हा किरण पावसकर यांनी ठाकरे गटाला लगावला आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Eknath Shinde VIDEO : अबू आझमीला औरंगजेबकडे... एकनाथ शिंदेंचा मोठा पॉज, म्हणाले, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पंढरीची वारी करुन आले, नातवाला बागेत घेऊन जाताना आजोबांचा अपघाती मृत्यू; चिमुकला गंभीर जखमी
पंढरीची वारी करुन आले, नातवाला बागेत घेऊन जाताना आजोबांचा अपघाती मृत्यू; चिमुकला गंभीर जखमी
Maharashtra : मतदानासाठी 'या' तारखेपर्यंतची मतदार यादी ग्राह्य, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाचे निर्देश
मतदानासाठी 'या' तारखेपर्यंतची मतदार यादी ग्राह्य, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाचे निर्देश
रिल्ससाठीचा स्टंट अंगलट आला, चारचाकी गाडीसह युवक 300 फूट दरीत कोसळला; व्हिडिओ व्हायरल
रिल्ससाठीचा स्टंट अंगलट आला, चारचाकी गाडीसह युवक 300 फूट दरीत कोसळला; व्हिडिओ व्हायरल
LIC : केंद्र सरकार एलआयसीमधील भागीदारी विकण्याच्या तयारीत, अपडेट येताच शेअरमध्ये मोठी घसरण
केंद्र सरकार एलआयसीमधील भागीदारी विकण्याच्या तयारीत, अपडेट येताच शेअरमध्ये मोठी घसरण
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Jitendra Awhad on Raj Uddhav : राऊत काहीही बोलले तरी...ठाकरे बंधूंवर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया
Sanjay Gaikwad Case : तक्रार नसल्याने गायकवाडांवर गुन्हा दाखल नाही,पोलिसांची माहिती
Jalna Badnapur : बदनापूरमधील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांच्या निवासी शाळांचा पंचनामा
MLA Brawl | कँटिनमध्ये हाणामारी, सभागृहात 'तू बाहेर ये'ची धमकी; आमदारांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह
MLA Security Incident | Varun Sardesai संतापले, Neelam Gorhe यांच्या सुरक्षारक्षकाचा दुसऱ्यांदा धक्का!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंढरीची वारी करुन आले, नातवाला बागेत घेऊन जाताना आजोबांचा अपघाती मृत्यू; चिमुकला गंभीर जखमी
पंढरीची वारी करुन आले, नातवाला बागेत घेऊन जाताना आजोबांचा अपघाती मृत्यू; चिमुकला गंभीर जखमी
Maharashtra : मतदानासाठी 'या' तारखेपर्यंतची मतदार यादी ग्राह्य, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाचे निर्देश
मतदानासाठी 'या' तारखेपर्यंतची मतदार यादी ग्राह्य, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाचे निर्देश
रिल्ससाठीचा स्टंट अंगलट आला, चारचाकी गाडीसह युवक 300 फूट दरीत कोसळला; व्हिडिओ व्हायरल
रिल्ससाठीचा स्टंट अंगलट आला, चारचाकी गाडीसह युवक 300 फूट दरीत कोसळला; व्हिडिओ व्हायरल
LIC : केंद्र सरकार एलआयसीमधील भागीदारी विकण्याच्या तयारीत, अपडेट येताच शेअरमध्ये मोठी घसरण
केंद्र सरकार एलआयसीमधील भागीदारी विकण्याच्या तयारीत, अपडेट येताच शेअरमध्ये मोठी घसरण
मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरांसाठीची ती अट रद्द, बैठकीत निर्णय; उदय सामंतांचा उद्धव ठाकरेंना टोला
मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरांसाठीची ती अट रद्द, बैठकीत निर्णय; उदय सामंतांचा उद्धव ठाकरेंना टोला
RBI : महाराष्ट्रातील तीन सहकारी बँकांना आरबीआयकडून विविध कारणासाठी दंड, सोलापूर, बीड आणि नागपूरच्या बँकेचा समावेश
महाराष्ट्रातील तीन सहकारी बँकांना आरबीआयकडून विविध कारणासाठी दंड, सोलापूर, बीड आणि नागपूरच्या बँकेचा समावेश
जनसुरक्षा विधेयकाचं काही विरोधकांकडून स्वागत तर काही जणांचा विरोध, नेमकं कोण काय म्हणाले?
जनसुरक्षा विधेयकाचं काही विरोधकांकडून स्वागत तर काही जणांचा विरोध, नेमकं कोण काय म्हणाले?
भारतीय स्टेट बँक QIP च्या माध्यमातून 25000 हजार कोटींची उभारणी करणार, बँकेनं शेअर विक्रीचा निर्णय का घेतला?
भारतीय स्टेट बँक QIP च्या माध्यमातून 25000 हजार कोटींची उभारणी करणार, बँकेनं शेअर विक्रीचा निर्णय का घेतला?
Embed widget