एक्स्प्लोर

... म्हणून CM देवेंद्र फडणवीसांवर हक्कभंग आणणार; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर नाना पटोले संतप्त

राज्यात एकीकडे संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन संताप व्यक्त होत असताना दुसरीकडे महापुरुषांचा अपमान करण्यात येत असल्यावरूनही विरोधक आक्रमक झाले आहेत.

मुंबई : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील नैतिक जबाबदारी म्हणून महायुतीमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर नैतिकतेच्या मुद्द्यावर हा राजीनामा घेतल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकातून म्हटलं आहे. मात्र, गेल्या अडीच महिन्यांपासून नैतिकता कुठे होती, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे यापूर्वीच हत्याप्रकरणाचे फोटो पोहोचले नाहीत का, असा सवाल आता विरोधकांनी उपस्थित केला आहे. तसेच, धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार यांच्यात बैठक झाली. त्यानंतर, सकाळी मुख्यमंत्र्‍यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्याचे सांगितले. मात्र, तांत्रिकदृष्ट्या अद्यापही त्यांचा राजीनामा घेण्यात आल्याची माहिती सभागृहात सांगण्यात आली नसल्याचे काँग्रेस नेते आणि आमदार नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटलं आहे. 

राज्यात एकीकडे संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन संताप व्यक्त होत असताना दुसरीकडे महापुरुषांचा अपमान करण्यात येत असल्यावरूनही विरोधक आक्रमक झाले आहेत. समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबावर स्तुतीसुमने उधळली होती, औरंगजेब हा उत्तम प्रशासक असल्याचे आझमी यांनी म्हटले होते. तर, प्रशांत कोरटकर यांनी इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना फोन करुन धमकी देत शिवाजी महाराज व संभाजी महाराजांबद्दल अर्वाच्य भाषा वापरल्यानेही सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून विरोधकांनी सरकारला याच मुद्द्यावरुन लक्ष्य केलं आहे.

धनंजय मुंडेंचा राजीनामा लपवता यावा, विरोधकांकडून विचारणा होऊ नये म्हणून आजचं कामकाज बंद पाडण्यात आलं, या सरकारचा निषेध केला पाहिजे. एकीकडे शेतकरी चिंतेत आहे, पीकाला भाव मिळत नाही. सध्या शेतकरी उपाशी आणि सरकार तुपाशी अशी परिस्थिती आहे. आझाद मैदानावर एवढे मोर्चे येत आहेत, सरकारला त्याची काळजी नाही. राज्यात आज जे काही संतापजनक सुरू आहे, पण सरकारने विधानसभा बंद पाडली, आजचा दिवस हा काळा दिवस असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले. तसेच, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरही भाष्य केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती थेट माध्यमांना दिली. पण, सभागृहाला दिली नाही. गेल्या अधिवेशनात नागपुरात जे काही बोलले ते खोट होतं, अजून किती लपवणार. गृहखात्याकडे ही माहिती नव्हती का, गृहखात्याने ही माहिती का लपवली, असा सवाल नाना पटोले यांनी विचारला आहे. संतोष देशमुख प्रकरणात गुन्हेगाराला वाचवण्याचं काम सरकार करत होते, हे सरकार देखील सहआरोपी आहे. या सरकारला हिशोब द्यावा लागणार, असे पटोले यांनी म्हटले.  

मुख्यमंत्र्‍यांवर हक्कभंग आणणार

मुख्यमंत्री रात्री ताफा घेऊन अजित पवारांना भेटायला जातात, राजीनामा लिहून घेतात. राजीनामा आल्यानंतर त्यांनी थेट माध्यमांना येऊन सांगितलं. पण, नियमानुसार मुख्यमंत्र्‍यांनी सभागृहाला त्याबाबत सांगणं अपेक्षित होतं. त्यामुळे उद्या आम्ही मुख्यमंत्र्यांवर हक्कभंग आणणार आहोत, असे नाना पटोले यांनी म्हटले. त्यामुळे, आता उद्या अधिवेशन सभागृहात काय होतं, हे पाहता येईल.

हेही वाचा

धनंजय मुंडे म्हणाले वैद्यकीय कारणास्तव राजीनामा, जितेंद्र आव्हाडांची लेक संतापली; ट्विट करुन सुनावलं

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
रोहित पवार म्हणाले, जय पवारांना पत्रकार परिषद घेऊ नका असं सांगितलंय; आता चुलतभावाने दिलं उत्तर
रोहित पवार म्हणाले, जय पवारांना पत्रकार परिषद घेऊ नका असं सांगितलंय; आता चुलतभावाने दिलं उत्तर
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
पालकमंत्र्यांना कोंडीत पकडण्यासाठी मोहिते पाटलांनी टाकला डाव! राष्ट्रवादीकडे बहुमत असूनही शिंदेंच्या शिवसेनेला सभापतीपद
पालकमंत्र्यांना कोंडीत पकडण्यासाठी मोहिते पाटलांनी टाकला डाव! राष्ट्रवादीकडे बहुमत असूनही शिंदेंच्या शिवसेनेला सभापतीपद

व्हिडीओ

Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report
Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report
Politics On Marathi Language : मराठीचा मुद्दा, मुनगंटीवारांचा गुद्दा Special Report
Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, 22 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार, महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार,महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
Inflation : महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
Iran : आखाती देशांवरील हल्ले थांबणार नाहीत, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इशारा
शहीद झालेले जवान, लहान मुलांच्या मृत्यूचा बदला घेणार, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार : मोजतबा खामेनी
EPFO : 7 कोटी खातेदारांच्या पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
Share Market Crash: शेअर बाजारातील घसरणीचा ट्रेंड कायम, ट्रम्प कनेक्शनमुळं बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले 
ट्रम्प कनेक्शनमुळं भारतीय शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
Embed widget