एक्स्प्लोर

Election Result 2022 LIVE: गोव्यात भाजप सरकारचा 14 मार्च रोजी शपथविधी? पाच राज्यातील जलद निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Election Result 2022 LIVE Updates: राजकीयदृष्ट्या आजचा दिवस खूप महत्त्वाचा. पंजाब, गोवा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांचा विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार जाहीर

LIVE

Key Events
Election Result 2022 LIVE: गोव्यात भाजप सरकारचा 14 मार्च रोजी शपथविधी? पाच राज्यातील जलद निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Background

5 State Election Results 2022 LIVE: राजकीयदृष्ट्या आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. कारण पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. यामध्ये पंजाब, गोवा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांचा समावेश आहे. संपूर्ण देशाचे या निकालांकडे लक्ष लागले आहे. अवघ्या काही तासांमध्येच मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सकाळी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरू होणार आहे.  मतमोजणी सुरु झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच आपल्याला कल समजणार आहेत. 

देशामध्ये 10 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत पाच राज्यांमध्ये निवडणुकांची प्रक्रिया पार पडली होती. यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात मतदान झाले होते. त्याठिकाणी एकूण 403 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे तिथे कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. कारण दिल्ली गाठण्याचा मार्ग युपीमधून जातो असे म्हटले जाते. त्यामुळे राजकीयदृष्ट्या यूपी हे अत्यंत महत्त्वाचे राज्य आहे. त्यानंतर मणिपूरमध्ये 60 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडले होते. तसेच गोव्यात 40 जागांसाठी एकाट टप्प्यात, उत्तराखंडमध्ये 70 जागांसाठी एकाच टप्प्यात आणि पंजाबमध्ये 117 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडले होते.

उत्तर प्रदेशात 10 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत सात टप्प्यांत मतदान झालं आहे. पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात 14 फेब्रुवारीला तर मणिपूरमध्ये 27 फेब्रुवारी आणि 3 मार्चला मतदान झालं. 

पाच राज्यांतील सर्व 690 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकांचे अचूक निकाल पाहण्यासाठी, भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) results.eci.gov.in या संकेतस्थळावर लॉगइन करून निकाल पाहता येणार आहे. निवडणुकांचे  निकालाचे लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 

दरम्यान, एक्झिट पोलमधून उत्तराखंड आणि गोव्यात चुरशीच्या शर्यत पाहायला मिळणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर बहुतेकांनी पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या विजयाचा अंदाज व्यक्त केला आहे आणि यूपी आणि मणिपूरमध्ये भाजप विजयी होण्याची शक्यता आहे. एबीपी माझा आणि एबीपी माझा लाईव्ह टीव्हीवर सकाळी 8 वाजल्यापासून तुम्ही निवडणूक निकालांचे लाईव्ह अपडेट्स पाहू शकता. 
20:14 PM (IST)  •  10 Mar 2022

 Pm Modi : 2022 चे निकाल 2024 चं भवितव्य ठरवणार : पंतप्रधान मोदी

 Pm Modi : 2017 च्या निकालांनी 2019 चं भवितव्य ठरवलं असं विश्लेशकांचं मत होतं. त्यामुळे 2022 चे निकाल 2024 चं भवितव्य ठरवणार आहेत, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी यावेळी व्यक्त केला. 

20:11 PM (IST)  •  10 Mar 2022

 Pm Modi : गरीबांचा विकास हाच आमचा ध्यास : पंतप्रधान मोदी

 Pm Modi : गरीबांचा विकास हाच आमचा ध्यास आहे. भाजप सरकार गरीबांसाठी काम करत आहे, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. 

20:08 PM (IST)  •  10 Mar 2022

 Pm Modi : भाजपच्या विजयात महिलांचं मोठं योगदान : पंतप्रधान मोदी

 Pm Modi : भाजपच्या विजयात महिलांचं मोठं योगदान आहे. जिथं महिलांचा जास्त प्रतिसाद मिळाला, तेथे भाजपचा मोठा विजय झाला आहे, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. 

20:06 PM (IST)  •  10 Mar 2022

 Pm Modi : प्रत्येक गरीबापर्यंत सरकारी योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार : पंतप्रधान मोदी

 Pm Modi : भाजपने प्रशासन यंत्रणा मजबूत केली आणि प्रत्येक काम पारदर्शक केलं. यापुढेही प्रत्येक गरीबापर्यंत सरकारी योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिले आहे.  

20:03 PM (IST)  •  10 Mar 2022

Pm Modi : आजच्या निकालाने भाजपच्या कामावर शिक्कामोर्तब केलं : पंतप्रधान मोदीं

Pm Modi : आजच्या निकालाने भाजपच्या कामावर शिक्कामोर्तब केलं आहे. भाजपने गरीबांसाठी काम केलं असून त्यामुळे जनतेने आम्हाला विजयी केले. आम्ही देशातील प्रत्येक गरीबापर्यंत पोहोचणार आहे, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी दिला आहे.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघाची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Praful Patel :  मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच? केंद्रीय मंत्रिपदावर प्रफुल पटेलांचा दावाTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 04 PMRavindra Waykar on EVM : ईव्हीएमसोबत छेडछाड केल्याचा प्रश्नच येत नाही, रवींद्र वायकरांची प्रतिक्रियाABP Majha Headlines : 04 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघाची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Embed widget