ABP News C-Voter Survey : गुजरातमधील तरुण मतदारांचा पाठिंबा कोणाला? C-Voter Survey मधून 'हा' निष्कर्ष समोर
Gujarat Opinion Polls 2022 : तरुण मतदार गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणासोबत आहेत? सी-व्होटरनं केलेल्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष काय?
Gujarat Opinion Polls 2022 : गुजरातमधील (Gujarat Elections) निवडणुकीच्या गोंधळात सी-व्होटरनं (C Voter Survey) एबीपी न्यूजसाठी (ABP Majha) सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणात असं आढळून आलं की, गुजरातमधील (Gujarat News) 25 वर्ष वयापर्यंतचे मतदार कोणासोबत आहेत? या सर्वेक्षणातून आलेला निष्कर्ष भुवया उंचावणारा आहे. गुजरातमध्ये निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. गुजरात निवडणुकांसाठी दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 1 डिसेंबरला आणि दुसऱ्या टप्प्यात 5 डिसेंबरला मतदान होणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून गुजरातमधील सर्वच पक्षांना घाम फुटला आहे. अशातच गुजरातच्या तरुणांचा पाठिंबा कोणत्या पक्षाला मिळू शकतो, हे जाणून घेण्यासाठी सी-व्होटरनं एक सर्व्हे केला होता.
गुजरातमधील तरुण मतदार कोणासोबत?
सी-व्होटरच्या सर्वेक्षणातून समोर आलेल्या निष्कर्षानुसार, "गुजरातमध्ये भाजपला 25 वर्षांपर्यंतच्या 43 टक्के मतदारांचा सर्वाधिक पाठिंबा मिळू शकतो. यानंतर काँग्रेसला 35 टक्के, आम आदमी पार्टीला (AAP) 17 टक्के आणि इतरांना 5 टक्के मतं मिळू शकतात. यावेळी गुजरातमध्ये शेकडो तरुण प्रथमच मतदान करणार आहेत."
गुजरातमधील असं गाव, जिथे फक्त 4700 मतदार
गुजरात निवडणुकांचं बिगुल वाजलं असून सर्वच पक्षांनी कसून प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. गुजरातमधील निवडणुकीत यंदा तिहेरी लढत दिसणार आहे. गुजरातमध्ये यावेळी आम आदमी पक्ष, काँग्रेस आणि भाजप निवडणूक रणसंग्रामात आमनेसामने आहेत. गुजरात निवडणुकीच्या निमित्तानं सध्या राज्यातील एका गावाची चर्चा सर्वाधिक होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
गुजरातमध्ये असं एक गाव आहे, जिथे जाण्यासाठी गाडी किंवा रेल्वे नाही तर फक्त बोटीची गरज लागते. येथे केवळ 4700 मतदार आहेत. निवडणूक आयोगानं येथे मतदानासाठी मतदान केंद्रही उभारलं आहे. इथपर्यंत पोहोचणं फारसं सोपं नसून, मोठ्या अडचणींचा सामना करुन येथे पोहोचता येतं. गुजरातच्या या बेटाचं नाव Shiyalbet आहे. Shiyalbet हे गाव राजुला विधानसभा क्षेत्रात येतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :