UPSC Success Story : सिंगापूरमधील नोकरीला लाथ मारून UPSC ची तयारी, चौथ्याच प्रयत्नात यशाला गवसणी; IAS अधिकाऱ्याची प्रेरणादायी स्टोरी
IAS Saurabh Gangwar Success Story : सौरभ गंगवार यांनी 2014 मध्ये यूपीएससीची तयारी सुरू केली. चौथ्या प्रयत्नात त्यांना यश मिळाले.

नवी दिल्ली : देशभरातून दरवर्षी लाखो विद्यार्थी यूपीएससीची परीक्षा (UPSC Exam) देतात. मात्र अत्यंत कमी फार कमी विद्यार्थ्यांना यूपीएससी परीक्षेत यश मिळते. आज आम्ही तुम्हाला एका अशा आयएसएस अधिकाऱ्याबद्दल माहिती देत आहोत, ज्यांनी प्रचंड मेहनत आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी आपलं ध्येय गाठलं आहे. मेरठचे नवे शहर आयुक्त सौरभ गंगवार (IAS Saurabh Gangwar Success Story) यांचा प्रवास हा अत्यंत प्रेरणादायी आहे. जाणून घेऊयात सौरभ गंगवार यांच्याबद्दल...
सौरभ गंगवार हे 2018 सालच्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. सौरभचे वडील शेतकरी आहेत. सौरभ यांना वयाच्या पहिल्या वर्षी पोलिओची लागण झाली होती. पोलिओ झालेल्या मुलाचे भविष्य काय असेल? असे लोक म्हणत होते. मात्र, आपल्या जिद्दीने त्यांनी प्राथमिक शाळा ते आयआयटी दिल्लीसारख्या संस्थेपर्यंतचा शैक्षणिक प्रवास पूर्ण केलाय.ते नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. आज सौरभ गंगवार हे अनेक तरुणांसाठी प्रेरणास्रोत ठरत आहेत.
परदेशातील नोकरी सोडून भारतात परतले
एका वृत्तवाहिनी बोलताना सौरभ गंगवार यांनी म्हटले आहे की, ते बरेलीतील एका प्राथमिक शाळेत शिकले आहेत. ते एक वर्षाचे असतानाच त्यांच्या उजव्या पायाला पोलिओ झाला होता. बरेलीत माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर ते कानपूरला बहिणीच्या घरी वास्तव्यास गेले. बहिणीच्या घरी त्यांनी प्रचंड अभ्यास केला. यानंतर त्यांची आयआयटीमध्ये निवड झाली. आयआयटी पूर्ण करून ते नोकरीसाठी सिंगापूरला रवाना झाले होते. मात्र आपल्या लहान भावासाठी ते सिंगापूरहून पुन्हा भारतात परतले.
चौथ्या प्रयत्नात बनले IAS अधिकारी
2014 मध्ये त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली. चौथ्या प्रयत्नात त्यांना युपीएससी परीक्षेत यश मिळाले. त्यांनी पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा अनेकदा दिल्या. मात्र त्यांनी निवड होऊ शकली नाही. मात्र अखेर 2018 साली त्यांना यूपीएससी परीक्षेत यश मिळाले. सौरभ गंगवार यांची आता मेरठ शहर आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सौरभ गंगवार हे नागरी सेवांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शिकवत आहेत. चौथ्या प्रयत्नात माझी निवड झाली. पण, मी कधीच संयम गमावला नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. तर महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद आणि गौतम बुद्ध हे त्यांचे प्रेरणास्त्रोत आहेत.
आणखी वाचा
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
