Philadelphia Plane Crash : विमानाने उड्डाण करताच अवघ्या 30 सेकंदात घनदाट लोकवस्तीवर कोसळले; भीषण दुर्घटनेत विमानातील सर्व मृत्यूमुखी पडल्याची भीती
Philadelphia Plane Crash : पेनसिल्व्हेनिया शहरातील दाट लोकवस्तीच्या रुझवेल्ट मॉल या तीन मजली शॉपिंग सेंटरजवळ हा अपघात झाला. ज्या ठिकाणी विमान पडले त्या ठिकाणी अनेक घरे आणि दुकाने आहेत.

Philadelphia Plane Crash : दोन दिवसांपूर्वी हवेत हेलिकाॅप्टर आणि विमानाची धडक होऊन नदीत कोसळल्याची घटना ताजी असतानाच आता अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया राज्यातील फिलाडेल्फियात (Philadelphia Plane Crash) आज शनिवारी सकाळी एक छोटे वैद्यकीय विमान कोसळले. वृत्तसंस्था एपीने दिलेल्या माहितीनुसार, फिलाडेल्फियाहून मिसूरीला जाणाऱ्या विमानात 6 जण होते. यामध्ये दोन डॉक्टर, दोन पायलट, एक रुग्ण आणि एका कुटुंबातील सदस्यांचा समावेश होता. या दुर्घटनेत सर्व जण ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
Another plane crash just now in Philadelphia; we can't rush to judgment until we know if the pilot is black or white.pic.twitter.com/7zSG1n0rn1
— Alex Cole (@acnewsitics) January 31, 2025
फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (FAA) नुसार, Learjet 55 नावाच्या या विमानाने नॉर्थ-ईस्ट फिलाडेल्फिया विमानतळावरून संध्याकाळी 6:30 वाजता (स्थानिक वेळेनुसार) उड्डाण केले. फक्त 30 सेकंदांनंतर, ते 6.4 किलोमीटर (4 मैल) अंतरावर कोसळले. एएफपीने स्थानिक माध्यमांच्या हवाल्याने सांगितले की, विमान निवासी भागातील घरांवर पडले, त्यामुळे परिसरातील अनेक इमारतींना आग लागली. बचाव पथकाने आग आटोक्यात आणली आहे.
Wow! This is the most insane close-up dashcam video of the plane crash in Philadelphia. Turn up the sound; you can literally hear and see debris hitting their car. pic.twitter.com/xZfaUlRDUE
— Vince Langman (@LangmanVince) February 1, 2025
कोणीही वाचण्याची शक्यता नाहीच
फिलाडेल्फियाच्या महापौर चेरिल पार्कर यांनी सांगितले की, या अपघातात अनेक घरांचे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत किती लोकांचा मृत्यू झाला याबाबत अद्याप स्पष्ट माहिती नाही. विमान चालवणारी एअर ॲम्ब्युलन्स कंपनी जेट रेस्क्यूने सांगितले की, यावेळी आम्ही कोणाच्याही जीविताची पुष्टी करू शकत नाही. जोपर्यंत कुटुंबीयांना माहिती दिली जात नाही तोपर्यंत कोणतीही नावे जाहीर केली जाणार नाहीत, असे कंपनीने म्हटले आहे.
NEW: Dashcam video shows the plane crash in Philadelphia.
— BNO News Live (@BNODesk) February 1, 2025
At least 6 dead, multiple victims on the ground pic.twitter.com/PuPE6pgB8G
दाट लोकवस्तीच्या परिसरात विमान कोसळले
पेनसिल्व्हेनिया शहरातील दाट लोकवस्तीच्या रुझवेल्ट मॉल या तीन मजली शॉपिंग सेंटरजवळ हा अपघात झाला. ज्या ठिकाणी विमान पडले त्या ठिकाणी अनेक घरे आणि दुकाने आहेत. सोशल मीडियावर शेअर होत असलेल्या या घटनेच्या व्हिडीओमध्ये असे दिसते की विमान अपघातग्रस्त होताच खूप वेगाने खाली आले आणि आकाशात आगीचा मोठा गोळा उठला. अमेरिकेचे परिवहन सचिव सीन डफी यांनी सांगितले की, अपघातानंतर विमानातील लोक बाहेर पडू शकले की नाही हे सध्या स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जमिनीवरही अनेक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन आणि ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड या अपघाताची चौकशी करत आहेत.
गुरुवारी विमान अपघातातून 40 मृतदेह बाहेर काढण्यात आले
दोन दिवसांपूर्वी अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये प्रवासी विमान आणि हेलिकॉप्टरची टक्कर झाली होती. अपघातानंतर दोघेही पोटोमॅक नदीत पडले. विमानात 4 क्रू मेंबर्ससह 64 लोक होते. हेलिकॉप्टरमध्ये ३ जण होते. त्या सर्वांचा मृत्यू झाला होता. आतापर्यंत या विमान अपघातातील 40 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अपघातानंतर अमेरिकन एअरलाइन्सचे विमान पोटोमॅक नदीत तीन तुकडे पडलेले आढळले. विमान आणि हेलिकॉप्टर दोन्हीचे फ्लाइट डेटा रेकॉर्डर (एफडीआर किंवा ब्लॅक बॉक्स) सापडले आहेत. रोनाल्ड रेगन विमानतळाजवळ ही घटना घडली. यूएस एअरलाइन्सचे CRJ700 Bombardier जेट आणि लष्कराचे ब्लॅक हॉक (H-60) हेलिकॉप्टर यांच्यात हा अपघात झाला. अमेरिकन एअरलाईन्सचे विमान कॅन्सस राज्यातून वॉशिंग्टनला येत होते.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
