एक्स्प्लोर

UPSC Success Story: बँकेतील नोकरी सांभाळून अवघ्या काही तासांच्या अभ्यासाने गाठले मोठे यश; आईएएस अधिकारीचा असाही प्रेरणादायी प्रवास 

IAS Yashni Nagarajan Success Story: यशनी नागराजन यांनी केवळ वेळेचे योग्य नियोजन, परीक्षेच्या विषयांची योग्य निवड करत अवघ्या काही तासांच्या मेहनतीतून एकहाती यश खेचून आणले आहे.

UPSC Success Story: हल्लीच्या स्पर्धात्मक युगात यूपीएससी (UPSC) आणि त्या सारख्या स्पर्धापरीक्षा उत्तीर्ण करणे म्हणजे मोठे आव्हान मानलं जातं. किंबहुना या परीक्षेच्या तयारीसाठी दिवसातले कित्येक तास अभ्यासासाठी द्यावे लागतात, असा एक समाज आहे. मात्र या समजुतीला छेद देत एका विद्यार्थीनीने अशक्यप्राय गोष्ट आपल्या जिद्दीच्या जोरावर शक्य करून दाखवली आहे. महाराष्ट्राच्या 2019 च्या कैडर बॅचमधील यशनी नागराजन (IAS Yashni Nagarajan) यांची ही काहणी. त्यांनी केवळ वेळेचे योग्य नियोजन, परीक्षेच्या विषयांची योग्य निवड करत दररोजच्या अवघ्या काही तासांच्या मेहनतीतून एकहाती यश खेचून आणले आहे.

विशेष म्हणजे त्यांनी रिजर्व बँक ऑफ इंडियामध्ये आपली नौकारी पेक्षा सांबाळून ही यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. इतकेच नव्हे तर ऑल इंडियामध्ये 59वे स्थान देखील पटकावले आहे.सध्या आईएएस अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या आणि आगामी काळात केंद्रीय प्रतिनियुक्तीवर अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत असणाऱ्या यशनी नागराजन यांचा हा प्रेरणादायी प्रवास जाणून घेऊया. 

प्राथमिक शिक्षण केलं केंद्रीय विद्यालयातून पूर्ण 

आईएएस अधिकारी यशनीने तिचे सुरुवातीचे शिक्षण आंध्र प्रदेशातील नहरलागुन येथील केंद्रीय विद्यालयातून पूर्ण केलं. यानंतर त्यांनी 2014 मध्ये युपिया येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंगमधून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ग्रेड बी या पदावर अधिकारी म्हणून निवड झाली आणि त्या आयएएस होईपर्यंत तिथेच कार्यरत राहिल्या.

ना नोकरी सोडली, ना रजा घेतली, तरीही यश खेचून आणलं

यशनी यांची निवड लाखो तरुणांना सांगते की सध्याची नोकरी न सोडताही उत्तम वेळेचे व्यवस्थापन करून एकहाती यश मिळवता येते. RBI मध्ये काम करत असताना यशनी यांनी  UPSCची तयारी सुरू केली. दरम्यानच्या काळात अनेकांनी त्यांना नोकरी सोडण्याचा सल्ला दिला. मात्र त्यांनी तो मान्य केला नाही. स्वतःच्या बळावर यश मिळवण्याच्या ध्यासाने यशनी यांनी धीर सोडला नाही. योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर त्यांनी अखेर आपले स्वप्न पूर्ण केले आहे. 

नोकरी सांभाळून दरोरज 4-5 तास अभ्यास

यशनी यांनी आपली नोकरी करत असताना ऑफिसमधून घरी परतल्यावर परीक्षेच्या तयारीसाठी त्या दरोरज ठरवून दिलेल्या वेळेत चार ते पाच तास अभ्यास करत होत्या. सरकारी सुट्टीत त्या बारा ते चौदा तास अभ्यास करायच्या. यशनी यांचा असा विश्वास आहे की उत्तम वेळेचे व्यवस्थापन सर्वात मोठ्या आव्हानांना तोंड देण्यास मदत करतं. त्यांचे असे म्हणणे आहे की, काम करताना मनाची तयारी असेल तर परीक्षा आणि तयारीशी संबंधित ताण कमी होतो. नोकरी तुम्हाला खात्री देते की तुमच्या करिअरबद्दल काळजी करण्याची गरज नाही आणि तणावाशिवाय तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्यात तुम्हाला मदत होते.असेही त्या सांगतात. 

स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमचा आवडता विषय निवडा

यशनी या सांगतात की, परीक्षेची तयारी करण्यापूर्वी स्वतःवर आत्मविश्वास असणे गरजेचे आहे. अनेकदा लोक इतरांच्या सल्ल्याने असे विषय निवडतात जे त्यांना यशाचा मार्ग मोकळा करतात पण तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर नेतात. असेही त्या सांगतात. 

हे ही वाचा 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जुलै 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जुलै 2026 | शनिवार
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Maharashtra Breaking LIVE: सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतल्यावर CJP कडून देशभरात आंदोलन करण्याची हाक
Maharashtra Breaking LIVE: सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतल्यावर CJP कडून देशभरात आंदोलन करण्याची हाक
Aditi Tatkare: रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत आदिती तटकरेंचं महत्त्वाचं विधान; म्हणाल्या, 'भरत गोगावले पालकमंत्री झाले तरी...'
रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत आदिती तटकरेंचं महत्त्वाचं विधान; म्हणाल्या, 'भरत गोगावले पालकमंत्री झाले तरी...'

व्हिडीओ

Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
बदलापुरातील नारायणा स्कुल बेकायदेशीर, शाळेला शिक्षण विभागाचा झटका; अध्यक्षांसह मुख्याध्यापकावर गुन्हा
बदलापुरातील नारायणा स्कुल बेकायदेशीर, शाळेला शिक्षण विभागाचा झटका; अध्यक्षांसह मुख्याध्यापकावर गुन्हा
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी वेगळे विषय होत आहेत, देशविरोधी ताकद एकत्र येत आहे : धनंजय महाडिक
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी वेगळे विषय होत आहेत, देशविरोधी ताकद एकत्र येत आहे : धनंजय महाडिक
Mumbai Crime : कधी अमिताभकडून डॉक्टरेट तर कधी जॅकी श्रॉफसोबत फोटो! 10 वर्षे तो बनला बनावट DCP, 48 लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसालाच बेड्या!
कधी अमिताभकडून डॉक्टरेट तर कधी जॅकी श्रॉफसोबत फोटो! 10 वर्षे तो बनला बनावट DCP, 48 लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसालाच बेड्या!
Embed widget