Washim Crime : वेडसर मुलाला 25 वर्षे जीवापाड जपलं, त्याच मुलाने बापाला डोक्यात दगड घालून संपवलं
Washim Crime : वेडसर मुलाने बापाच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याचा प्रकार वाशिम जिल्ह्यात घडलाय.
Washim Crime : पोटी जन्माला आलेलं अपत्य ते कोणत्याही माता पित्याला महत्त्वाचं असतं... ते मतिमंद, असो का वेडसर ,असो किंवा विकलांग, असो ते जन्मदात्यांना आपल्या जीवापेक्षाही जास्त प्रेम करत पालन पोषण करत त्याला मोठं करत संस्कार देण्याचा प्रयत्न करतात.. मात्र तेच अपत्य माता पित्याचे जीवावर कसं उठतं? याचं उत्तम उदाहरण आज वाशिमच्या रिसोड तालुक्यातील लोणी बुद्रुक गावात पाहायला मिळालं ...लोणी बुद्रुक गावातील वेडसर असलेल्या पोटच्या मुलानेच पित्याचा डोक्यात दगड घालून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय.
वेडसर मुलाने बापाच्या डोक्यात दगड घातला
अधिकची माहिती अशी की, लोणी गावात राहणाऱ्या पुंजाजी नरवाडे या 50 वर्षीय इसमाची त्यांच्याच 25 वर्षीय वेडसर मुलाने हत्या केली आहे. गणेश नरवाडे असं या वेडसर मुलाचे नाव आहे. 50 वर्षीय पुंजाजी नरवाडे आणि त्यांचा 25 वर्षीय मुलगा गणेश दोघे लोणी बुद्रुकमधील घरात राहत होते. दरम्यान, सोबत राहत असलेल्या आणि 25 वर्षीय जीवापाड जपलेल्या गणेशने त्याचे वडील असलेल्या पुंजाजी नरवाडे यांच्या डोक्यात दडग आणि विटाने वार केले. आज दुपारी दोन वाजताच्या दरम्यान गणेशने आपल्या जन्म दात्या पित्याच्या डोक्यावर दगड विटाने वार करत हत्या केल्याचा प्रकार उघड झालंय.. पित्याची हत्यानंतर ही वेडसर गणेश हा घटनास्थळीच बसून होता.. जेव्हा हत्येचा प्रकार शेजारी असलेल्या लोकांना कळाला त्या वेळेस रिसोड पोलिसांना या बद्दलची माहिती देण्यात आली. घटनास्थळी रिसोड पोलीस पोहचले असून घटनेचा तपास करत असून घटनेचं कारण मात्र अद्याप कळालेलं नाही...
पुण्यात PT तासावरुन आलेल्या मुलींचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग, कुंपणानेच शेत खाल्लं, शिपायाला बेड्या!https://t.co/x1tXof0JrW
— ABP माझा (@abpmajhatv) January 8, 2025
दरम्यान, कल्याण पश्चिम मधील लाल चौकी जवळ माय लेकाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय. शाळेतून घरी जात असताना अपघात झाला. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कचरा माती वाहणाऱ्या ट्रकच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडलीये. या अपघातात आई निशा अमित सोमेश्वर आणि मुलगा अंश अमित सोमेश्वर यांचा जागीच मृत्यू झालाय.
इतर महत्त्वाच्या बातम्या