एक्स्प्लोर

Gangster Arun Gawli: अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी तुरुंगातून बाहेर येणार, 28 दिवसांचा फर्लो मंजूर, कोर्टातील युक्तिवाद अखेर कामी आला

Gangster Arun Gawli: डॉन अरुण गवळीला 28 दिवसांची रजा मंजूर; कारागृह महानिरीक्षकांच्या निर्णयाविरोधात घेतलेली न्यायालयात धाव, गवळीच्या नेमका काय केला युक्तीवाद?

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गँगस्टर अरुण गवळी याला 28 दिवसाची संचित रजा मंजूर केली आहे. काल (मंगळवारी) मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीला (Gangster Arun Gawli) 28 दिवसांची संचित रजा मंजूर करण्यात आली आहे. न्यायमूर्ती नितीन सांबरे व वृषाली जोशी यांनी याबाबतचा निर्णय दिला आहे. याआधी अरुण गवळी (Gangster Arun Gawli) याला कारागृह उपमहानिरीक्षक यांच्याकडे संचित रजेसाठी अर्ज केला होता तो नामंजूर केल्याने अरुण गवळी याने नायायालयात धाव घेतली होती.

गेल्या वर्षी 18 ऑगस्ट 2024 रोजी अरुण गवळीने केलेला अर्ज

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 28 दिवसांची संचित रजा म्हणजे फर्लो मंजूर केली आहे. गेल्या वर्षी 18 ऑगस्ट 2024 रोजी अरुण गवळीने (Gangster Arun Gawli) नागपूरच्या कारागृह महानिरीक्षक यांच्याकडे संचित रजेसाठी अर्ज केला होता. मात्र अरुण गवळीचा गुन्हेगारी जगतावरील प्रभाव पाहता आणि तो एकेकाळी गुन्हेगारी टोळीचा मोहरक्या असल्याचे कारण देत विधानसभा निवडणुकांच्या काळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी शक्यता लक्षात घेऊन कारागृह महानिरीक्षकांनी तो अर्ज फेटाळला होता.

गवळीच्या वकिलांचा युक्तीवाद काय?

कारागृह महानिरीक्षकांच्या त्याच निर्णयाच्या विरोधात अरुण गवळीने (Gangster Arun Gawli) आपल्या वकिलांच्या माध्यमातून नागपूर खंडपीठांमध्ये याचिका दाखल केली होती. त्याच्या याचिकेसंदर्भात नागपूर खंडपीठाने निर्णय घेत अरुण गवळीला 28 दिवसांची संचित रजा मंजूर केली आहे. या सुनावणीवेळी, गवळीचे वकील अ‍ॅड. मीर नगमान अली यांनी कारागृह उपमहानिरीक्षकांचा निर्णय अवैध असल्याचा दावा करत संचित रजा मिळावी अशी मागणी केली, यापूर्वी रजेवर सुटल्यानंतर गवळीने प्रत्येकवेळी कायदे व नियमांचे काटेकोर पालन केलेले आहे. परिणामी, यावेळीही रजा नाकारता येणार नाही, असे गवळीच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले आहे.

नागपूर खंडपीठाने विविध बाबी लक्षात घेवून गवळीची याचिका मंजूर करून कारागृह उपमहानिरीक्षकांचा वादग्रस्त आदेश रद्द केला. त्याचबरोबर, अरूण गवळीचा रजा मंजूर केली आहे. अरूण गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. ही घटना 2007 मध्ये घडली होती. अरुण गवळीसह इतर 11 जणांना 2012 मध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. 

फर्लो आणि पॅरोलमध्ये काय फरक आहे?

पॅरोल म्हणजे तुरुंगातून सूट. ही सूट तुरुंगात असलेल्या आणि शिक्षा भोगलेल्या कैद्याला मिळू शकते.पॅरोल मंजूर करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे आणि प्रत्येक राज्यात त्याचे नियम वेगळे आहेत. कैद्याला त्याच्या वागणुकीच्या आणि शिक्षा भोगण्याच्या पद्धतीच्या आधारावर पॅरोलची सुविधा दिली जाते. याद्वारे तो सामाजिक संबंध सुधारू शकतो आणि काही महत्त्वाची कामे पूर्ण करू शकतो.

फर्लो म्हणजे ही एक सूट आहे, जी तुरुंगातील कैद्याला स्वातंत्र्याच्या रूपात मिळते. काही काळ तुरुंगात राहून शिक्षा भोगलेल्या कैद्याचा हा अधिकार मानला जातो. सरकार किंवा तुरुंग अधिकारी कौटुंबिक अनुभव, कैद्यांचे वर्तन आणि तुरुंगातील अहवालांच्या आधारे फर्लो मंजूर किंवा नामंजूर करू शकतात. या सूटमुळे कैद्याला त्याच्या कुटुंबीयांना भेटण्याची आणि सामाजिक संबंध सुधारण्याची संधी मिळते.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सर्वात मोठ्या किडनी तस्करी टोळीचा पर्दाफाश; एकाच गावातील 40 टक्के लोकांची एक किडनी गायब! महिला सुद्धा बळी पडल्या
सर्वात मोठ्या किडनी तस्करी टोळीचा पर्दाफाश; एकाच गावातील 40 टक्के लोकांची एक किडनी गायब! महिला सुद्धा बळी पडल्या
NCP Pune Politics: पवार काका-पुतणे एकत्र येणार? पिंपरी चिंचवडमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं पहिलं पाऊल, अजितदादांचा पक्ष भाजपविरोधात आमच्यासोबत आला तर...
पवार काका-पुतणे एकत्र येणार? पिंपरी चिंचवडमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं पहिलं पाऊल, अजितदादांचा पक्ष भाजपविरोधात आमच्यासोबत आला तर...
Brazilian Model Video Rahul Gandhi:  Hello India...राहुल गांधींनी फोटो दाखवलेल्या ब्राझीलियन मॉडेलची पहिली प्रतिक्रिया, व्हिडीओमध्ये मनातलं सगळं बोलली!
Hello India...राहुल गांधींनी फोटो दाखवलेल्या ब्राझीलियन मॉडेलची पहिली प्रतिक्रिया, व्हिडीओमध्ये मनातलं सगळं बोलली!
Indian team to meet PM Modi : भारतीय महिला क्रिकेटपटूंनी विश्वचषक पुढे केला, पण PM मोदींनी हातही लावला नाही; दिल्लीत नेमकं काय घडलं?
भारतीय महिला क्रिकेटपटूंनी विश्वचषक पुढे केला, पण PM मोदींनी हातही लावला नाही; दिल्लीत नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Starlink in Maharashtra: 'दुर्गम भागात आता सॅटेलाइट इंटरनेट', सरकारचा मोठा करार
Pune Crime : भोंदू मांत्रिक Vedika Pandharpurkar चा 14 कोटींचा गंडा, उच्चशिक्षित कुटुंबाची फसवणूक
Mumbai Infra: विरार-उत्तन सागरी सेतू वाढवण बंदरापर्यंत वाढवणार, CM फडणवीसांच्या बैठकीत मोठा निर्णय
Real Estate Boom: 'दहा लाखांची जमीन कोटीला', Sambhajinagar मध्ये DMIC मुळे जमिनींना सोन्याचा भाव
Chhatrapati Sambhajinagar: 'एक कोटी वीस लाखाला एकर', Toyota मुळे संभाजीनगरमध्ये जमिनीला सोन्याचा भाव

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सर्वात मोठ्या किडनी तस्करी टोळीचा पर्दाफाश; एकाच गावातील 40 टक्के लोकांची एक किडनी गायब! महिला सुद्धा बळी पडल्या
सर्वात मोठ्या किडनी तस्करी टोळीचा पर्दाफाश; एकाच गावातील 40 टक्के लोकांची एक किडनी गायब! महिला सुद्धा बळी पडल्या
NCP Pune Politics: पवार काका-पुतणे एकत्र येणार? पिंपरी चिंचवडमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं पहिलं पाऊल, अजितदादांचा पक्ष भाजपविरोधात आमच्यासोबत आला तर...
पवार काका-पुतणे एकत्र येणार? पिंपरी चिंचवडमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं पहिलं पाऊल, अजितदादांचा पक्ष भाजपविरोधात आमच्यासोबत आला तर...
Brazilian Model Video Rahul Gandhi:  Hello India...राहुल गांधींनी फोटो दाखवलेल्या ब्राझीलियन मॉडेलची पहिली प्रतिक्रिया, व्हिडीओमध्ये मनातलं सगळं बोलली!
Hello India...राहुल गांधींनी फोटो दाखवलेल्या ब्राझीलियन मॉडेलची पहिली प्रतिक्रिया, व्हिडीओमध्ये मनातलं सगळं बोलली!
Indian team to meet PM Modi : भारतीय महिला क्रिकेटपटूंनी विश्वचषक पुढे केला, पण PM मोदींनी हातही लावला नाही; दिल्लीत नेमकं काय घडलं?
भारतीय महिला क्रिकेटपटूंनी विश्वचषक पुढे केला, पण PM मोदींनी हातही लावला नाही; दिल्लीत नेमकं काय घडलं?
India Test Squad vs South Africa 2025: पंत, जडेजा, पडिक्कल, आकाश IN, शमीकडे दुर्लक्ष; द. अफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाकडून कोणा कोणाला संधी, A टू Z माहिती
पंत, जडेजा, पडिक्कल, आकाश IN, शमीकडे दुर्लक्ष; द. अफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाकडून कोणा कोणाला संधी, A टू Z माहिती
Gajkesari Rajyog 2025: देव दिवाळी होताच 3 राशींचं नशीब चमकलं! 10 नोव्हेंबरला पॉवरफुल गजकेसरी राजयोग बनतोय, पैसा, नोकरी, विवाह..राजासारखं जीवन..
देव दिवाळी होताच 3 राशींचं नशीब चमकलं! 10 नोव्हेंबरला पॉवरफुल गजकेसरी राजयोग बनतोय, पैसा, नोकरी, विवाह..राजासारखं जीवन..
Bollywood Actress Life Story: साबणाच्या जाहिरातीत दिसलेली दिग्गज दिग्दर्शकाची गोड गोडुली चिमुकली; 90च्या दशकातली सुपरस्टार, सध्या इंडस्ट्रीपासून दूर, ओळखलं का कोण?
साबणाच्या जाहिरातीत दिसलेली दिग्गज दिग्दर्शकाची गोड गोडुली चिमुकली; 90च्या दशकातली सुपरस्टार, सध्या इंडस्ट्रीपासून दूर, ओळखलं का कोण?
Gadchiroli News: निवासी वस्तीगृहाच्या आड धर्मांतरणाचे धडे?; ख्रिश्चन मिशनरी वस्तीगृहाच्या संस्था चालकांचा मनमानी कारभार, गडचिरोलीच्या नागेपल्ली येथील धक्कादायक प्रकार
निवासी वस्तीगृहाच्या आड धर्मांतरणाचे धडे?; ख्रिश्चन मिशनरी वस्तीगृहाच्या संस्था चालकांचा मनमानी कारभार, गडचिरोलीच्या नागेपल्ली येथील धक्कादायक प्रकार
Embed widget