एक्स्प्लोर

Pune crime news : दुबईहून सोन्याची तस्करी; पुणे विमानतळावर तब्बल 6 किलोचं सोनं जप्त

पुणे विमानतळ सोने तस्करीचा अड्डा बनत असल्याचं मागील काही दिवसांत झालेल्या कारावाईतून समोर आलं आहे. त्यातच आता पुन्हा एकदा  दुबईहून तस्करी करून आणलेले 6 किलो 912 ग्रॅम सोनं जप्त करण्यात आलं आहे.

पुणे : पुणे विमानतळ सोने तस्करीचा अड्डा बनत असल्याचं  (Pune Crime news)  मागील काही दिवसांत झालेल्या कारावाईतून समोर आलं आहे. त्यातच आता पुन्हा एकदा  दुबईहून तस्करी करून आणलेले 6 किलो 912 ग्रॅम सोने महसूल गुप्तचर संचलनालयाने (डीआरआय) पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर जप्त केले. सोने तस्करी प्रकरणात एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली. या सोन्याची ककिंमत साधारण साडेतीन कोटी आहे. 

दुबईहून सोन्याची तस्करी करून एक महिला पुणे विमानतळावर येणार असल्याची माहिती डीआरआय मिळाली होती. त्यानुसार पथकाने विमानतळावर सापळा लावला होता. दोघांची तपासणी केली असता त्यांच्याकडे सोने आढळून आले. त्यानुसार महिलेसह तिच्याबरोबर असलेल्या अटक करण्यात आली. आरोपींनी 6 किलो 912 ग्रॅम वजन असलेल्या सोन्याची पावडर केली होती. ती पावडर त्यांनी पट्टा आणि पाकिटात लपवून ठेवली होती. 

पुणे विमानतळ सोने तस्करीचा अड्डा? 

काहीच दिवसांपूर्वी पुणे विमानतळावर सोन्याची भुकटी (Pune Crime News) असलेली कॅप्सुल गुप्तांगात लपवून तस्करी करण्याचा प्रकार समोर आला होता. केंद्रीय सीमाशुल्क विभागाने हा प्रकार उघडकीस आणला होता.  पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोघांना पडकलं होतंआणि त्यांच्याकडून 33 लाख 33 हजार रुपयांची 555 ग्रॅम सोन्याची भुकटी जप्त केली होती. चक्क सोन्याची भुकटी असलेली कॅप्सुल गुप्तांगात लपवून नेत असल्याने अधिकाऱ्यांनीदेखील आश्चर्य व्यक्त केलं होतं.  या प्रकरणी अटक केलेले दोघंही दुबईहून पुण्यातील लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले होते. वेळी त्यांची हालचाल संशयास्पद आढळून आली होती. ते घाईघाईने विमानतळाच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. याच सगळ्या हालचाली कस्टमच्या अधिकाऱ्यांनी टिपल्या. हे सगळं लक्षात येताच कस्टमच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करायला सुरुवात केली होती. त्यांनी तात्काळ दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र त्यानंतर कस्टमच्या अधिकाऱ्यांनी त्यांची सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी तपासणी केली असता.  गुप्तांगात सोन्याची भुकटी असलेल्या कॅप्सुल  लपवून ठेवल्याचं लक्षात आलं. जप्त केलेल्या सोन्याची किंमत 33 लाख 33 हजार रुपये असल्याची माहिती कस्टमच्या अधिकाऱ्यांनी दिली होती. 

 कस्टम विभागाकडून धडाधड कारवाई 

मागील काही दिवसांपासून कस्टम विभागाने धडाधड कारवाई करायला सुरुवात केली आहे. पुण्यात 5 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले होते. अंमली पदार्थ विरोधी आणि कस्टम विभागाची संयुक्त कारवाई करण्यात आली होती. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली होती. मेथॅम्फेटामाइन हे अंमली पदार्थ जलद आणि दीर्घकाळ टिकणारे प्रभाव असलेले कृत्रिम औषध, उत्तेजक म्हणून बेकायदेशीरपणे वापरले जाते. पुणे पोलिसांचं अंमली पदार्थ विरोधी पथक आणि कस्टम विभागाने संयुक्त कारवाई करतात.

इतर महत्वाची बातमी-

Pune Crime News : पुण्यात नेमकं चाललंय काय? तरुणीला मारहाण केली, कपडे फाडले अन्...; सात जणांवर गुन्हा दाखल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

BIg Fight West Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रातील प्रचारानंतरचा विचार, प्रचारानंतर कोणता मु्द्दा गजला?ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 18 November 2024Maharashtra Assembly Update :विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्याBig Fight Vidarbh : प्रचारानंतरचा विचार काय? पश्चिम विदर्भात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Embed widget