Pune Crime News : पुण्यात नेमकं चाललंय काय? तरुणीला मारहाण केली, कपडे फाडले अन्...; सात जणांवर गुन्हा दाखल
Pune Crime news : सोसायटीच्या कॉमन एरिया वापरण्याच्या कारणावरुन एका तरुणीला मारहाण करुन तिच्या अंगावरील कपडे फाडल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील वानवडी येथील केदारीनगर येथे हा प्रकार घडला आहे.
Pune Crime News : पुण्यात मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर (Pune Crime news) आला आहे. सोसायटीच्या कॉमन एरिया वापरण्याच्या कारणावरुन एका तरुणीला मारहाण करुन तिच्या अंगावरील कपडे फाडल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील वानवडी येथील केदारीनगर येथे हा प्रकार घडला आहे. शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात हा प्रकार घडल्याने सगळीकडून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
आरोपी आणि मुलगी हे दोघेही एकाच सोसायटीत राहतात. त्यामुळे या सगळ्यांमध्ये ओळखी होती. टेरेसवर मुलगी फिरत होती. त्यावेळी मुलांनी या मुलीला सोसायटीचा कॉमन परिसर वापरण्यास मनाई केली. याच कारणावरुन मुलीला शिवीगाळ केली आणि तिला हाताने मारहाण केली. त्यानंतर आरोपीने थेट या मुलीच्या अंगावरचे कपडे फाडले आणि तिला मारहाण केली. त्यानंतर तिच्या फोनचंदेखील चांगलंच नुकसान केलं आहे. याबाबत महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता. तक्रार अर्जाची चौकशी करुन गुन्हा दाखल आहे.
हा सगळा प्रकार पाहून या मुलीच्या आईने वानवडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रीत कौर, क्रिस्टोफर जॉन बॉस्को, श्वेता उमेश शेट्टी, गजेंद्र सिंग गोविंदसिंग, सचिन कदम, जयेश गिरीश माली व एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यात गुन्हेगारीत वाढ
पुण्यात गुन्हेगारीत वाढ झाली आहे. आजच एका गुन्ह्यात शारिरीक संबंध ठेवण्याला नकार दिल्याने तरुणीचा मॉर्फ केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील येवलेवाडी परिसरातून हा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी 19 तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावरुन प्रथमेश गुळवे याच्यावर आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणी आणि प्रथमेश गुळवे यांची सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या इंस्टाग्रामवर ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्या मैत्री वाढली. इंस्टाग्रामवर मैत्री झाल्यानंतर तरुणाने एकतर्फी प्रेमातून या प्रथमेश गुळवे याने अप्रत्यक्षरित्या तरुणीकडे शरिरसुखाची मागणी केली. आरोपीने फिर्यादीला कात्रज चौकात बोलावून शारीरिक सुखाची मागणी मागणी केली. त्यावेळी तिने त्याला विरोध केला असता आरोपीने तरुणीचा मॉर्फ केलेला अश्लील व्हिडिओ व्हॉट्सअॅप वर व्हायरल केला. यामुळे तरुणीच्या स्त्री मनास लज्जा निर्माण होऊन आरोपीने तिची बदनामी केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
इतर महत्वाची बातमी-