Nagpur Crime: क्रूरतेचा कळस... डोक्यात संशयाचं भूत, पत्नीसोबतच्या वादात दोन दिवसांच्या बाळालाच बापानं फरशीवर फेकलं
Nagpur Crime News: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत निर्दयी बापानं दोन दिवसांच्या बाळाला फरशीवर फेकलं. बाळाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
Maharashtra Nagpur Crime News: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत निर्दयी बापानं दोन दिवसांच्या बाळाला फरशीवर फेकल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. नागपूरच्या शासकीय रुग्णालयातील (Government Hospital Nagpur) घडलेल्या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. बाळाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, बाळाला फेकणारा गिरीश हा अमरावती (Amravti News) जिल्ह्यातील सावर्डीचा रहिवाशी आहे. याप्रकरणी निर्दयी बापाविरोधात नागपुरातील अजनी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत मारहाण करत गिरीश गोंडाणे या व्यक्तीनं दोन दिवसांपूर्वीच जन्मलेल्या चिमुकल्याला फरशीवर आपटलं. या क्रूर कृत्यामुळं बाळाला गंभीर इजा झाली असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गिरीश गोंडाणे असं निर्दयी बापाचं नाव असून तो अमरावती जिल्ह्यातील सावर्डीचा रहवाशी आहे.
गिरीश गोंडाणे आणि प्रतीक्षा गोंडाणे हे दोघेही एकाच गावात राहत असून त्यांचा प्रेमविवाह झाला होता. दोघांचा सुखी संसार सुरू होता. पण कालांतरानं दोघांच्या सुखी संसारात संशयाचं भूत शिरलं. त्यानंतर गिरीशनं पत्नीला मारहाण करण्यास सुरू केली. दररोज गिरीश पत्नीवर कोणत्या ना कोणत्या कारणानं संशय घ्यायचा आणि तिला मारहाण करायचा. प्रतीक्षा सगळं काही निमुटपणानं सहन करत होती. काही दिवसांनी प्रतीक्षाला दिवस गेले. अमरावतीहून तिला उपचारासाठी नागपुरात पाठवण्यात आलं.
31 डिसेंबर रोजी प्रतीक्षानं एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्याच दिवशी रात्री साडेसहा वाजताच्या सुमारास नागपूरच्या शासकीय रुग्णालयात गिरीश प्रतीक्षा असलेल्या बॉर्डमध्ये आला. त्यावेळीही संशयाचं भूत त्याच्या डोक्यात फिरत होतंच. वॉर्डमध्ये प्रतीक्षाजवळ जाऊन त्यानं विचारपूस करण्याऐवजी तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. दोघांमधील वाद विकोपाला गेला. त्यानंतर संताप अनावर झालेल्या गिरीशनं मोठमोठ्यानं प्रतिक्षाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तो एवढ्यावरच थांबला नाहीतर त्यानं दोन दिवसांच्या बाळाला उचललं आणि उचलून फरशीवर आपटलं.
निर्दयी बापानं चिमुकल्या बाळाला रागात उचलून कसलाही विचार न करता थेट फरशीवर आपटलं. बाळाची प्रकृती गंभीर असून त्याला गंभीर दुखापतही झाली आहे. प्रकृती गंभीर झाल्यानं बाळावर नागपुरच्या शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Nagpur 2022 : नागपुरात उद्योगांचा विकास; मोठ्या उत्पादन उद्योगांची अद्याप 'एंट्री' नाही