Ghatkopar Accident : कुर्ल्यातील घटना ताजी असतानाच आता घाटकोपरमध्ये भरधाव टेम्पोने 5 ते 6 जणांना चिरडलं
Ghatkopar Accident : घाटकोपरमध्ये एका टेम्पोने 5 ते 6 जणांना चिरडल्याची घटना समोर आलीये.
Ghatkopar Accident : काही दिवसांपूर्वी कुर्ल्यात एका भरधाव बेस्ट बसने 12 ते 14 लोकांचा जीव घेतला असतानाच आता घाटकोपरमध्ये एका टेम्पोने 5 ते 6 जणांना चिरडल्याची घटना घडलीये. घाटकोपरमध्ये एका टेम्पोने (छोटा हत्ती) पाच ते सहा पादचाऱ्यांना चिरडलंय. यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झालाय. घाटकोपरच्या चिराग नगर मार्किट परिसरात ही घटना घडलीये. उत्तम बबन खरात (वय 25) असं या टेम्पो चालकाचे नाव आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय.
टेम्पो चालवत असताना स्टेरिंग वरील ताबा सुटल्याने रस्त्याने जाणारे पादचाऱ्यांना टेम्पोची धडक लागली. सदर अपघातामध्ये प्रीती रितेश पटेल (वय 35 वर्ष, राहणार भागीरथी चाळ, पारशीवाडी, घाटकोपर पश्चिम) या महिलेचा मृत्यू झालाय. 1)रेश्मा शेख वय 23 वर्ष, 2)मारूफा शेख वय 27 वर्ष, 3)तोफा उजहर शेख वय 38 वर्षे 4)मोहरम अली अब्दूल रहीम शेख वय 28 वर्षे सर्व जण राहणार - चिराग नगर, पारशीवाडी, मच्छी मार्केट , घाटकोपर पश्चिम मुंबई यांना मुके मार व किरकोळ दुखापती झाल्या असून त्यांना तात्काळ राजवाडी रुग्णालय येथे उपचाराकरीता दाखल केले आहे.
चालकाने मद्यपान केल्याचा स्थानिकांचा आरोप, एका महिलेचा मृत्यू
अधिकची माहिती अशी की, घाटकोपरमध्ये भरधाव टेम्पोने 5 ते 6 पादचाऱ्यांना चिरडलंय. घाटकोपरच्या चिरागनगर मार्केट परिसरातील ही घटना आहे. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झालेला आहे. घाटकोपरमधील चिराग नगरचा परिसर पाहिला तर इथं मोठं माशांचं आणि भाजी मार्केट आहे. यामधून हा टेम्पो नारायण नगरच्या दिशेने घाटकोपरच्या दिशेने भरधाव येत होता. दरम्यान, हा टेम्पो मार्केटमध्ये शिरला आणि येथे असणारे स्टॉल उडवत पुढे आला. यामध्ये रस्त्यावरुन चालणारी लोक किंवा खरेदी करण्यासाठी उभ्या असलेल्या लोकांना या टेम्पोने चिरडलंय. यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झालाय. तर 5 ते 6 जण गंभीर जखमी झालाय. दरम्यान, चालकाला घाटकोपर पोलिसांनी ताब्यात घेतलंय. चालकाने मद्यपान केले असल्याचे आरोप स्थानिकांकडून करण्यात येतोय.
Pune Crime : लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न, मुलींच्या ओरडण्याने उघड पडण्याची भीती, 2 बहिणींना ड्रममध्ये बुडवून मारलं; पुण्यातील धक्कादायक प्रकारhttps://t.co/vfzkqJlY7I
— ABP माझा (@abpmajhatv) December 27, 2024