Pune Crime : लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न, मुलींच्या ओरडण्याने उघड पडण्याची भीती, 2 बहिणींना ड्रममध्ये बुडवून मारलं; पुण्यातील धक्कादायक प्रकार
Pune Crime : लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न करत असताना मुलींच्या ओरडण्याने उघड पडण्याच्या भीतीने 54 वर्षीय नराधमाने दोन बहिणींना बुडवून मारल्याचा संतापजनक प्रकार पुण्यात घडलाय.
Pune Crime : पुण्यातील राजगुरुनगर म्हणजेच खेड तालुक्यातून एक संतापजनक प्रकार घडलाय. मुलीचे लैंगिक शोषण करत असताना तिच्या बहिणीच्या ओरडण्याने सर्व प्रकार उघडकीस येईल, या भीतीने पुण्यात 54 वर्षीय वृद्धाने दोन्ही मुलींची ड्रममध्ये बुडवून हत्या केली आहे. दरम्यान, मुली गायब असल्याने कुटुंबियांकडून त्यांचा शोध सुरु होता. पोलिसांकडे तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. मात्र, मुलींचे मृतदेह आरोपी राहत असलेल्या रुममध्ये पाण्याच्या ड्रममध्ये सापडले. अजय चंद्रमोहन दास असं या मुलींची क्रूरतेने हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. दरम्यान, हे संतापजनक कृत्य केल्यानंतर आरोपीने परराज्यात पळ काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवण्यात येणार, रुपाली चाकणकर यांची माहिती
दरम्यान, पुण्यातील हे प्रकरण कोर्टात फास्ट ट्रॅकवर चालवले जाणार असल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. अटक केल्यानंतर आरोपी वरती गुन्हे देखील त्या पद्धतीचे दाखल केलेले आहे. यामध्ये आरोपीला फाशी मिळेल यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करणार असल्याचेही चाकणकर म्हणाले आहेत.
राजगुरुनगर शहरातील दोन मुलींच्या हत्येनंतर पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी राजगुरुनगर पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन सुरु करण्यात आलं होतं. पीडित कुटुंब आणि आंदोलकांशी निलम गो-हेंनी संवाद केल्यानंतर आंदोलकांनी पीडित कुटुंबासाठी केलेल्या मागण्या मान्य झाल्यानंतर अखेर आंदोलन अखेर मागे घेण्यात आले. सातकरस्थळ ग्रामपंचायतीने पीडित कुटुंबाला घर,नोकरी आणि मुलांच्या शिक्षणाचे पालकत्व स्वीकारले आहे.
राजगुरूनगरमध्ये एका हैवानाने चिमुकल्या बहिणींवर अत्याचार करून अमानुषपणे हत्या केली. यानिमित्ताने मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याची कबुली विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोरेंनी दिली. गोरेंनी राजगुरूनगरमध्ये जाऊन नराधम आरोपी अजय दासच्या अटकेनंतर पोलीस तपासात आणखी काय-काय समोर आलंय, याची माहिती गोरेंनी घेतली. त्यानंतर पीडित कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. या कुटुंबाला आर्थिक मदत दिली जाईल, मात्र या मदतीमुळं त्या दोन्ही चिमुकल्या परत येणार नाहीत. त्यामुळं मुळतः ही विकृती ठेवण्याची गरज आहे. यासाठी सरकार कठोर पावले उचलेल, असा विश्वास गोरेंनी व्यक्त केला. आता यापुढं परप्रांतीयांच्या नोंदी ठेवण्याची गरज आहे. सोबतच ते ज्या राज्यातून येतायेत तिथली त्यांची पार्श्वभूमी पाहणं आवश्यक आहे. त्यासोबतच स्थानिकांनी भाडेकरूंच्या नोंदी ठेवण्यासाठी आग्रह धरायला हवा. असं गोरेंनी नमूद केलं. चिमुकल्या बहिणींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी व्हायला हवी, यासाठी आम्ही ही पाठपुरावा करू. असं म्हणतानाचं फास्टट्रॅक मध्ये चालणारे खटले पुढे ट्रॅकवर किती फास्ट चालतात, हे पाहणं आणि प्रलंबित प्रकरणं निकाली लावण्यासाठी न्यायालय दोन शिफ्टमध्ये करावीत, अशी मागणी करताना न्यायव्यवस्था सुबक करण्यावर सरकारने भर द्याव, असंही गोरेंनी नमूद केलं.
इतर महत्त्वाच्या बातम्या