Gadchiroli Crime : स्वत:ची बंदुक हाताळताना 8 राऊंड फायर झाले, 3 गोळ्या छातीत घुसल्या, न्यायालयात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसाने जीव गमावला
Gadchiroli Crime : अनावधानाने स्वत:च्या बंदुकीतून गोळी सुटल्याने पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय.
Gadchiroli Crime : गडचिरोली (Gadchiroli Crime) येथील जिल्हा न्यायालयात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसाकडून स्वत:ची बंदुक असताना 8 राऊंड फायर झाले. त्यातील 8 पैकी 3 गोळ्या स्वत:च्या छातीत घुसल्याने पोलीस कर्मचाराचा मृत्यू झालाय. सुरक्षेसाठी तैनात असलेला पोलीस (Police) गाडीत बसलेला असताना ही घटना घडली आहे.
अनावधानाने गोळी झाडली गेली, अन् पोलीस कर्मचाऱ्याने जीव गमावला
अधिकची माहिती अशी की, जिल्हा न्यायालयाच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांच्या बंदुकीतून गोळी सुटली आणि स्वत:लाच लागली. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय. जिल्हा पोलीस दलात नेमणुकीस असलेले पोवालदार उमाजी होळी, हे जिल्हा न्यायाधीश गडचिरोली यांचे एस्कॉर्ट ड्युटीकरीता कर्तव्यावर हजर होते. जिल्हा न्यायालय गडचिरोली येथील आवारात गाडीत बसलेले होते. यावेळी त्यांच्या स्वत:च्या ताब्यातील बंदुक हाताळताना हत्यारातून गोळी झाडली जाऊन 8 पैकी 3 गोळ्या छातीत लागल्याने ते जखमी झाले होते. त्यांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी होळी यांना मृत घोषित केले आहे. प्रथमदर्शनी होळी यांचेकडून अनावधानाने गोळी झाडली गेल्याचे दिसून येते, असं पोलिसांनी सांगितले आहे.
कारने 50 फूट फरफटत नेले, अजिंठा बुलढाणा मार्गावर झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातल्या धावडा येथे अजिंठा बुलढाणा मार्गावर मध्यरात्री झालेल्या कार अपघातात एका 23 वर्षीय युवकाचा मृत्यू झालाय. दिलीप सनासे असे मयत युवकाचे नाव असून, पायी चालत असताना पाठीमागून येणाऱ्या स्विफ्ट कारने जोरदार धडक दिल्याने 50 फूट फरफटत गेल्याने या युवकाचा जागीच मृत्यू झाला. सबंधित कार बुलढाणा जिल्ह्यातील शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाची असल्याची माहिती आहे. या प्रकरणी अद्याप ही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही,दरम्यान या अपघाताची दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या