Dombivli Crime : चपलेमुळे 40 तोळे सोन्याची चोरी उघडकीस, बहिणीचे दागिने चोरणारी मावस बहीण गजाआड
Dombivli Crime : कार्यक्रमादरम्यान महिलेच्या पर्समधून घराची आणि तिजोरीची चावी चोरली आणि त्या चावीच्या सहाय्याने दोन तासाच्या आत घरात घुसून 40 तोळे सोन्याचे दागिने चोरले. मानपाडा पोलिसांनी चोरट्या मावस बहीणला तिच्या चप्पलच्या आधारे अटक केली
Dombivli Crime : कार्यक्रमादरम्यान महिलेच्या पर्समधून घराची आणि तिजोरीची चावी चोरली आणि त्या चावीच्या सहाय्याने दोन तासाच्या आत घरात घुसून 40 तोळे सोन्याचे दागिने (Jewellery) चोरले. मात्र ही चोरी लपू शकली नाही. कोणताही पुरावा नसताना अथक तपास करत डोंबिवलीतील (Dombivli) मानपाडा पोलिसांनी चोरट्या मावस बहीणला तिच्या चप्पलच्या आधारे अटक केली आणि 40 तोळे सोने हस्तगत केले आहे. प्रिया सक्सेना डोंबिवली इथल्या खोनी पलावा परिसरात राहतात. त्या नवी मुंबई इथल्या कामोठे (Kamothe) इथे कार्यक्रमात गेल्या होता. त्यावेळी त्यांची मावस बहीण सिमरन पाटील यांनी ही चोरी केली.
कामोठेमधील कार्यक्रमात घराची आणि लॉकरची चावी चोरीला
12 जानेवारीला प्रिया सक्सेना आपल्या एका नातेवाईकाच्या कार्यक्रमासाठी नवी मुंबई येथील कामोठे परिसरात गेल्या होत्या. त्यांच्या घराला कुलूप होते. कार्यक्रमा दरम्यान त्यांनी आपली पर्स पाहिली असता पर्समधून घराची आणि लॉकरची चावी गायब होती. त्या घरी आल्या असता त्यांना घरातील दागिने देखील चोरीस गेल्याचे लक्षात आले. चावीची ही चोरी कार्यक्रमादरम्यान झाली असल्याने कोणावर संशय घ्यायचा म्हणून तिने मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार नोंदवली.
चपलेमुळे 40 तोळे सोन्याची चोरी उघडकीस
मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसात अधिकारी अविनाश वनवे यांच्या पथकाने तपास सुरु केला. या संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्यात आले. याच दरम्यान एक महिला संशयितरित्या आढळून आली. पोलिसांनी जेव्हा या महिलेची चप्पल पाहिली तेव्हा ती प्रिया सक्सेना यांची मावस बहीण सिमरन पाटील हिची असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सिमरनला ताब्यात घेत विचारपूस केली असता तिने केलेला गुन्ह्याची कबुली दिली. मानपाडा पोलिसांनी तिच्याकडून चोरी केलेले चाळीस तोळे सोने हप्तगत केले आहे.
काही दिवसांपूर्वी घराची रेकी
सिमरनने आधी पर्समधून चावी चोरली. त्यानंतर नवी मुंबई इथून ती खोनी पलावा इथे आली. चावीच्या साहाय्याने प्रिया सक्सेना यांच्या फ्लॅटचा दरवाजा उघडून तिने दागिने चोरी केले. नंतर पर्समध्ये चावी ठेवायला ती कामोठे येथे कार्यक्रमात देखील पोहोचली मात्र तिला चावी ठेवता आली नाही. सिमरन काही दिवसांपूर्वी प्रिया हिच्या घरी राहण्यास आली होती, तेव्हाच तिने या घराची रेकी केली होती.
हेही वाचा
Dombivli Crime : बहिणीला छेडले एकाने, भावाने मारले भलत्यालाच; संतापाच्या भरात तरुणावर चाकूने हल्ला