दुपारी १ च्या हेडलाईन्स ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 24 January 2025
ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 24 January 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्स
भंडाऱ्यातील आयुध निर्माण कारखान्यात भीषण स्फोट, आरडीएक्स बनवण्याच्या कच्चा मालाचा स्फोट, ५ जण गंभीर जखमी
राज्यात वाहन प्रवास महागला, एसटी तिकीट दरात आजपासून १५ टक्के वाढ तर रिक्षा आणि टॅक्सीचं किमान भाडे १ फेब्रुवारीपासून ३ रुपयांनी वाढणार, परिवहनमंत्र्यांची एबीपी माझाला EXCLUSIVE माहिती
महादेव मुंडेंची हत्या झालेल्या दिवशी वाल्मिक कराडच्या मुलानं पोलिसांना दीडशे फोन का केले, भाजप आमदार सुरेश धस यांचा सवाल, हत्येचा तपास क्राइम ब्रँचकडं देण्याची मागणी
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचं त्र्यंबकेश्वरमध्ये आगमन, मालेगावच्या सहकार परिषदेला जाण्यापूर्वी करणार महादेवाची पूजा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघेही सोबत..
ऑपरेशन शिवधनुष्य आणि ऑपरेशन टायगर सुरु, उदय सामंतांचं वक्तव्य, ठाकरेंच्या शिवसेनेचे साडेचारशे कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार
उदय सामंतांनी आधी स्वत:ला आणि त्यांच्या लोकांना सांभाळावं, ऑपरेशन धनुष्यबाणवरुन संजय राऊतांचा घणाघात, तर उद्योगमंत्री दावोसला गुंतवणूक आणायला गेले होते की पक्ष फोडायला, शरद पवारांचा सवाल.