साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
चांदशहावली दर्गा कंपाऊंड परिसरातून अटक केलेल्या आरोपीकडून पवई पोलिसांनी जवळपास साडे तेरा किलो वजनाच्या चरस अमली पदार्थासह एक गावठी कट्टा जप्त केला
मुंबई : पवई पोलिसांकडून 3.50 कोटी रुपयांच्या चरससोबत गावठी कटटा विकणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पवई चांदशहावली दर्गा कंपाउंड परिसरात पवई पोलिसांनी ही कारवाई केली. पवई पोलीस (Police) स्टेशनच्या हद्दीत चांदशहावली दर्गा कंपाउंड च्या बाजूला एक व्यक्ती चरस हा अमली पदार्थ विकण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती पवई पोलिसांना मिळाली होती. याच माहितीच्या अनुषंगाने पवई पोलिसांनी सापळा रचून आरोपी मोहम्मद सादिक हनीफ सय्यद (वय 46 वर्ष) या आरोपीला अल्टो कार सोबत रंगेहात अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे नालासोपारा येथे 31 लाख रुपयांच्या एमडी ड्रग्ससह (Drugs) पोलिसांनी एका विदेशी व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी, गुन्हा नोंद करुन पुढील तपास सुरू आहे.
चांदशहावली दर्गा कंपाऊंड परिसरातून अटक केलेल्या आरोपीकडून पवई पोलिसांनी जवळपास साडे तेरा किलो वजनाच्या चरस अमली पदार्थासह एक गावठी कट्टा जप्त केला आहे. या चरसचा बाजार भाव जवळपास साडेतीन कोटी असून या आरोपीवर मुंबई शहरात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये यापूर्वी देखील अमली पदार्थ विक्रीचा गुन्हा दाखल आहे. या आरोपीने मुंबई शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थासोबत गावठी कट्टा कुठून आणला होता, मुंबईत चरस आणि गावठी कट्टा कोणाला विकणार होता, याअनुषंगाने अटक आरोपीकडून पवई पोलीस अधिक तपास करत आहेत. तसेच, या अमली पदार्थ विक्रीचे रॅकेट कुठं आहे, याचाही शोध पोलीस घेत आहेत.
नालासोपारात विदेशी नागरिकाकडे 31 लाखांचं ड्रग्स
नालासोपारा पूर्वेकडील आचोळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका विदेशी नागरीकांकडून 31 लाख रुपयांचं अंमली पदार्थ मिळून आले आहे. गुन्हे शाखा क्रमांक 2 चे युनिट आचोळे येथे पेट्रोलींग करत असताना, एक विदेशी नागरीक पोलिसांना पाहून, पळताना दिसला. त्यावेळी, पोलिसांनी त्याचा पाठलाग करत, त्याला पकडलं आणि त्याच्याकडून 31 लाख 20 हजार रुपये किंमतीच एम.डी. ड्रग्स जप्त केलं. डेविड ओनियाका चिडालो असं आरोपीच नाव असून तो आफ्रिकेतील रहिवासी असल्याचं त्यानं सांगितलं आहे. हे ड्रग्स विदेशी नागरीकांकडे आले कुठून, आणि हे ड्रग्स कुणा कुणाला तो देत होता, याबाबत आता गुन्हे शाखा युनिट 2 तपास करत आहे.
हेही वाचा
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी