एक्स्प्लोर

मॉडेलच्या हत्यानं राजधानी हादरली, BMW मधून आरोपींनी नेला मृतदेह, गँगस्टरच्या एन्काऊंटर प्रकरणात साक्षीदार

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीजवळील गुरुग्राममधील एका हॉटेलमध्ये 27 वर्षीय तरुणीच संशयास्पदरित्या हत्या झाल्याची घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीजवळील गुरुग्राममधील एका हॉटेलमध्ये 27 वर्षीय तरुणीच संशयास्पदरित्या हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. दिव्या पाहुजा असे मृत महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिव्या पाहुज्या मॉडेलिंग करात होती. त्याशिवाय दिव्या पाहुजा ही गुंड संदीप गडोली एन्काऊंटर प्रकरणातील प्रमुख साक्षीदार होती. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी दिव्याचा मृतदेह घेऊन  बीएमडब्ल्यूमधून (BMW) पसार झाले. पोलिसांनी याप्रकरणी हॉटेल मालक अभिजीत सिंह, प्रकाश आणि इंद्रराज यांना बेड्या ठोकल्या आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉडेल दिव्या पाहुजा ही गुरुग्राममधील बलदेवनगर येथील रहिवासी आहे. हॉटेल मालक अभिजीत आणि त्याच्या साथीदारांनी दिव्याची हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी साथीदारांना 10 लाख रुपये दिले. खूनातील आरोपी अभिजीत सिंह याच्या दोन साथीदारांनी निळ्या रंगाच्या BMW DD03K240 या कारच्या ट्रंकमध्ये दिव्याचा मृतदेह टाकून घटनास्थळावरून पळ काढला. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री हॉटेलमध्ये दिव्या पाहुजा हिची गोळी झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.

गुरुग्राम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मॉडेल दिव्या पाहुजा ही हत्या झालेल्या गुंड संदीप गडोलीची कथित मैत्रीण होती. गडोली यांची फेब्रुवारी 2016 मध्ये मुंबईतील एका हॉटेलमध्ये हत्या करण्यात आली होती. त्यानंतर दिव्या पाहुजा, त्याची आई आणि  पाच गुरुग्राम पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिव्या पाहुजाची हत्या गुरुग्रामच्या बसस्थानकाजवळील सिटी हॉटेलमध्ये मंगळवारी रात्री घडली.पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून चौकशी करत आहेत. गुरुग्राम पश्चिम पोलिस स्टेशनमधील डीसीपी भूपेंद्र सिंह सांगवान यांनी सांगितले की, आम्ही मृत दिव्या पाहुजा हिच्या हत्येप्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

गँगस्टर संदीप गडोलीची बहिणीने मॉडेल दिव्या पाहुजा हिच्या हत्येप्रकरणी संशय व्यक्त केला आहे. दुसरीकडे, दिव्याच्या हत्येप्रकरणी गुरुग्राममधील सिटी पॉइंट हॉटेलच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतलेय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  सिटी पॉइंट हॉटेलचा मालक अभिजित याच्यासोबत दिव्या गेल्याची माहिती दिव्याच्या कुटुंबीयांकडून मिळाली होती. त्यांचा मोबाईल बंद असल्याचेही कुटुंबियांनी सांगितलं. त्यानंतर आम्ही अभिजीत याचं हॉटेल गाठलं अन् सीसीटीव्ही फुटेज तपासलं. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. हॉटेल मालकाविरोधात गुन्हा दाखल केलाय. त्याला ताब्यातही घेतले. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
Embed widget