एक्स्प्लोर

New Income Tax Bill : नवं प्राप्तिकर विधेयक संसदेत सादर होण्याची शक्यता, कर किती द्यावा लागणार? नेमकं काय बदलणार?

New Income Tax Bill : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर करताना नवं प्राप्तिकर विधेयक आणणार असल्याची घोषणा केली होती.  

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी 1 फेब्रुवारी 2025 रोजी अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी नवं कर विधेयक आणणार असल्याची घोषणा केली होती. नवं कर विधेयक आज संसदेत सादर केलं जाईल. नव्या अर्थसंकल्पात कराची रक्कम जितकी भरावी लागते त्यामध्ये कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. कॅपिटल्स गेन्ससह प्राप्तिकराच्या दरात देखील बदल करण्यात आलेली नाही. मात्र, नव्या कर विधेयकातील भाषा सोपी करण्यात असेल,  या विधेयकातील शब्दावली सर्वसामान्यांचा संभ्रम दूर करणारी असेल. म्हणजेच असेसमेंट ईयर पेक्षा टॅक्स इयर अशा शब्दांचा वापर करण्यात आला आहे. 

नव्या प्राप्तिकर विधेयकात 622 पानं असून 536 विभाग आहेत. प्राप्तिकर कायदा 1961 लागू झाला तेव्हा 880 पेजेस होती आणि सब सेक्शन आणि क्लॉज अशी मिळून त्याची संख्या 911 होती. सध्याच्या कायद्यात 14 शेड्यूल आहेत तर नव्या कायद्यात 16 शेड्यूल असतील. स्टँडर्ड डिडक्शन, ग्रॅच्युटी, रजा रोखीकरण यासह पगारातून कपात होणाऱ्या सर्व डिडक्शनसाठी एक सेक्शन ठेवण्यात आला आहे. एकूण उत्पन्नापेक्षा वेगळ्या उत्पन्नाला शेड्यूलमध्ये  ठेवण्यात आलं आहे. टीडीएस, प्रिझम्प्टिव टॅक्सेशन, पगार आणि कपातीची टेबल देण्यात आली आहेत. 

क्रिप्टोसह वर्च्युअल डिजिटल असेटसवर देखील लक्ष ठेवण्यात आलं आहे. रोख रक्कम, सोने चांदी, दागिने, यासह  कोणत्याही अघोषित संपत्तीच्या संदर्भातील सर्च ऑपरेशनसाठी वर्च्युअल डिजिटल असेटसशी संबंधित व्यवहारांना तरतुदीमध्ये ठेवण्यात आलं आहे. नव्या विधेयकात 47  वेळा डिजिटल  शब्दाचा वापर करण्यात आला आहे. 

नवं कर विधेयक संसदेत सादर केल्यानंतर स्थायी समितीकडे पाठवलं जाण्याची शक्यता आहे. हे विधेयक संसदेनं मंजूर केल्यापासून एप्रिल 2026 पासून लागू केलं जाऊ शकतं. 

घर भाड्यानं दिल्यानंतर जे उत्पन्न मिळतं त्यासंदर्भातील बाबी टॅक्सेशन क्लॉज 20 मध्ये आहेत. क्लॉज 22 मध्ये वार्षिक किंमतीवर 30 टक्के  स्टँडर्ड डिडक्शन असेल. तर, गृहकर्जाच्या व्याजावरील डिडक्शनची मर्यादा 2 लाखांपर्यंत ठेवण्यात आली आहे. 

नव्या प्राप्तिकर विधेयकात शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स कालावधी आणि त्याच्या रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 12 महिन्यांचा कालावधी आणि रेट 20 टक्के जसाच्या तसा आहे. लाँग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स दरात देखील कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 

नव्या कररचनेत किती कर द्यावा लागतो? 

0 ते 4 - Nil 
4 ते 8 - 5 टक्के
8 ते 12 लाख - 10 टक्के
12 ते 16 लाख - 15 टक्के
16  ते 20 लाख - 20 टक्के
20 ते 24 लाख - 25 टक्के
24 लाखांपुढे - 30 टक्के

इतर बातम्या :

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Share Market Crash : अमेरिका-इस्त्रायल आणि इराण युद्धाचा फटका,सेन्सेक्स 1100 अंकांनी कोसळला, एका दिवसात गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी बुडाले
शेअर मार्केट क्रॅश, सेन्सेक्स 1100 अंकांनी कोसळला, एका दिवसात गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी बुडाले
SIP : शेअर बाजारात दोन दिवसात 11 लाख कोटी स्वाहा, विदेशी गुंतवणूकदारांची विक्री सुरुच, SIP बंद करावी की सुरु ठेवावी? 
शेअर बाजारात दोन दिवसात 11 लाख कोटी स्वाहा, विदेशी गुंतवणूकदारांची विक्री सुरुच, SIP बंद करावी की सुरु ठेवावी? 
EPFO : ईपीएफओ स्वत:हून 1.33 लाख खातेदारांच्या बँक खात्यात पैसे पाठवणार, पायलट प्रोजेक्टला मंजुरी, 1000 रुपयांपर्यंतची रक्कम खात्यात येणार
ईपीएफओ स्वत:हून 1.33 लाख खातेदारांच्या बँक खात्यात पैसे पाठवणार, पायलट प्रोजेक्टला मंजुरी, खात्यात 1000 रुपयांपर्यंत रक्कम येणार
Iran- Israel War : इराणकडून होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे बंद, LPG च्या पुरवठ्यावर संकट, युरोपियन गॅसचे दर 50 टक्के वाढले, गॅसचे दर वाढण्याची शक्यता? 
इराणकडून होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे बंद, कतारनं LNG चं उत्पादन थांबवलं, युरोपियन गॅसचे दर 50 टक्के वाढले

व्हिडीओ

Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?
Jayant Patil on NCP Merger : विलिनीकरणाची चर्चा थांबली, ज्यांच्याशी चर्चा केली ते दादाच नाहीत
Sanjay Raut Mumbai PC : जे काय होईल ते एकमतानेच होईल सातवी जागा मविआ म्हणूनच जिंकू
Raj Thackeray MNS On BMC Ward Committees Election:उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran Israel Conflict : पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
Who is Ali Larijani: अवघं नेतृत्व संपलं, मृत्यू अवघा छाताडावर नाचत असतानाही अमेरिका- इस्रायलला 'कधीही न विसरता येण्यासारखा धडा' शिकवणारा पडद्यामागचा इराणी 'सेनापती'
अली लारीजानी: अवघं नेतृत्व संपलं, मृत्यू अवघा छाताडावर नाचत असतानाही अमेरिका- इस्रायलला 'कधीही न विसरता येण्यासारखा धडा' शिकवणारा पडद्यामागचा इराणी 'सेनापती'
मुंबई विमानतळावर कस्टमची कारवाई, स्मग्लिंगचा माल पकडला, विदेशी चलन, सोनं, माणिक, ड्रग्स जप्त
मुंबई विमानतळावर कस्टमची कारवाई, स्मग्लिंगचा माल पकडला, विदेशी चलन, सोनं, माणिक, ड्रग्स जप्त
मोठी बातमी! शरद पवारच राज्यसभेचे उमदेवार, सुप्रिया सुळेंकडून घोषणा; काँग्रेस अन् ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा
मोठी बातमी! शरद पवारच राज्यसभेचे उमदेवार, सुप्रिया सुळेंकडून घोषणा; काँग्रेस अन् ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील सेमी फायनल मॅचचं तिकीट मिळवण्याची शेवटची संधी? एका तिकिटासाठी किती रुपये मोजावे लागणार?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील सेमी फायनल मॅचचं तिकीट मिळवण्याची शेवटची संधी? एका तिकिटासाठी किती रुपये मोजावे लागणार?
तहसिलदार मॅडम पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या! 'तो' व्हिडिओ व्हायरल होताच मुख्य सचिवांकडून थेट चौकशीचे आदेश
तहसिलदार मॅडम पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या! 'तो' व्हिडिओ व्हायरल होताच मुख्य सचिवांकडून थेट चौकशीचे आदेश
Share Market Crash : अमेरिका-इस्त्रायल आणि इराण युद्धाचा फटका,सेन्सेक्स 1100 अंकांनी कोसळला, एका दिवसात गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी बुडाले
शेअर मार्केट क्रॅश, सेन्सेक्स 1100 अंकांनी कोसळला, एका दिवसात गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी बुडाले
Ayatollah Ali Khamenei: इस्त्रायलनं कधीकाळी खिशातील पेजर हॅक करून स्फोट घडवल्यानंतर CIA च्या मदतीनं कार्यालयात ये-जा करणाऱ्या अयातुल्ला अली खोमेनींचा माग कसा काढला?
इस्त्रायलनं कधीकाळी खिशातील पेजर हॅक करून स्फोट घडवल्यानंतर CIA च्या मदतीनं कार्यालयात ये-जा करणाऱ्या अयातुल्ला अली खोमेनींचा माग कसा काढला?
Embed widget