मोठी बातमी! लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार पैसे, अजित पवारांनी केलं मोठं वक्तव्य
Ajit Pawar on Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेबात (Ladki Bahin Yojana) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

Ajit Pawar on Ladki Bahin Yojana : महिलांचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. लाडकी बहिण योजनवरुन (Ladki Bahin Yojana) आमच्यावर टीका केली जात आहे. ही योजना बंद होणार असे सांगतिले जात आहे. पण येत्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळणार असल्याचं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळं लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे.
लाडकी बहिण योजनेबाबत अजित पवार यांना मोठं वक्तव्य केलं आहे. कालच मी 3 हजार 500 कोटी रुपयांच्या चेकवर सही केली आहे. येत्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. एक रुपयात पिक विमा दिला मात्र त्याचे गैरप्रकार किती केले. गायरान जमीन शासकीय जमीन यावर पिक विमा काढण्यात आला आहे. कुठे फेडला हे पाप? योजनेचा योग्य फायदा घेतला पाहिजे असंही अजित पवार म्हणाले.
माजी आमदार सुरेश जेथलीया यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार याच्या पक्षात प्रवेश
जालना जिल्ह्यातील परतूरधील माजी आमदार सुरेश जेथलीया यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार याच्या पक्षात प्रवेश झाला. त्यानंतर अजित पवार बोलत होते. आज परतूरचे नेते सुरेश जेथलीया राष्ट्रवादी परिवारात सामील झाल्याबद्दल मी त्यांचे स्वागत करतो असे अजित पवार म्हणाले. आम्ही बेरजेचे राजकारण करतोय. हा शिव शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. तीच परंपरा आपल्याला टिकवायची आहे. जातीय सलोखा टिकला पाहिजे यासाठी आपण काम केले पाहिजे असेही अजित पवार म्हणाले. आम्ही यापुढे स्थानिक पदाधिकाऱ्यांना अधिकार देणार आहोत. जो सामाजिक बांधिलकी जपून काम करतोय अशा होतकरु तरुणांना जिल्हा परिषद नगर परिषदेत संधी द्या असे अजित पवार म्हणाले. महायुती मध्ये समन्वयक नेमले आहेत. आम्ही सर्वांना सांगितले आहे महामंडळ कुणाला कोणते हवेत ते घ्या अन सर्वांना संधी द्या. आपला महाराष्ट्र साधू संतांची भूमी असल्याचे अजित पवार म्हणाले.
आरोप प्रत्यारोप करुन सामन्यांचे प्रश्न सुटणार नाहीत
आज काय आपण बघतोय, टीव्ही लावला की हा आमका असा म्हणाला तो तसा म्हणवा. आरोप प्रत्यारोप करुन सामन्यांचे प्रश्न सुटणार नाहीत असेही अजित पवार म्हणाले. ब्रेकिंग न्यूज दाखवली जातायेत. सूत्र सूत्र अरे कुठे आहेत सूत्र. सर्वांना सांगतो या बातम्यावर विश्वास ठेवू नका असेही अजित पवार म्हणाले. माझा राजकारणात 1991 साली प्रवास सुरू झाला. मराठवाडा विदर्भ खानदेश राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या अभ्यास आम्हाला करायला भेटल्याचे अजित पवार म्हणाले. सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही जाणतो असंही अजित पवार म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

