(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LPG Cylinder : 500 रुपयांत मिळणार गॅस सिलेंडर, राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; महाराष्ट्राला दिलासा कधी?
Ashok Gehlot on LPG Cylinder : राजस्थान सरकार दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) आणि उज्ज्वला योजनेत नाव नोंदवलेल्या नागरिकांना 500 रुपयांत एलपीजी सिलिंडर देणार असल्याची मोठी घोषणा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली आहे.
LPG Gas Cylinder Price : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर राजस्थानचे (Rajasthan) मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी मोठी घोषणा केली आहे. 500 रुपयांत LPG गॅस सिलेंडर (LPG Cylinder) देणार असल्याची मोठी घोषणा अशोक गेहलोत यांनी सोमवारी केली आहे. राजस्थान सरकार दारिद्र्यरेषेखालील (BPL) आणि उज्ज्वला योजनेत नाव नोंदवलेल्या नागरिकांना 500 रुपयांत एलपीजी सिलिंडर (LPG Gas Cylinder) देणार असल्याची मोठी घोषणा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली आहे. दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना वर्षभरात 12 सिलेंडर मिळणार असल्याचं सांगितलं आहे. यासोबतच नागरिकांना 'रसोई किट'मध्ये स्वयंपाकघरातील सामानही देण्यात येणार असल्याची मोठी घोषणा गेहलोत यांनी केली आहे. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधीही उपस्थित होते.
500 रुपयांमध्ये मिळणार सिलेंडर : गेहलोत
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी घोषणा करत सांगितलं आहे की, ही नवीन योजना 1 एप्रिल 2023 पासून लागू करण्यात येईल. राजस्थानच्या जनतेला महागाईच्या संकटातून बाहेर करण्याचा हा प्रयत्न आहे. यासाठी सरकार नवीन योजना सुरु करणार आहे. या नव्या योजने अंतर्गत दारिद्र्यरेषेखालील (BPL) आणि उज्ज्वला योजनेतील नागरिकांना 500 रुपयांमध्ये गॅस सिलेंडर देण्यात येईल. या योजनेअंतर्गत वर्षाला 12 सिलेंडर दिले जातील. सरकारचं लक्ष्य गरीब आणि गरजू लोकांना योजनांमध्ये पूर्णपणे सामावून घेऊन त्यांना अधिक लाभ देणे हा आहे.
अशोक गेहलोत यांनी भारत जोडो यात्रेमध्ये जनसंबोधन करताना सांगितलं की, 'सध्या अर्थसंकल्पाची तयारी सुरु आहे. मी यावेळी जाहीर करतो की दारिद्र्यरेषेखालील (BPL) आणि उज्ज्वला योजनेशी संबंधित लोकांना आहेत 1 एप्रिलनंतर 500 रुपये किमतीत गॅस सिलेंडर दिले जातील. गरीबांना वर्षभरात 12 सिलेंडर 500 रुपयांमध्ये मिळतील, या सिलेंडर सध्या 1040 रुपयांन उपलब्ध आहेत.'
अशोक गेहलोत यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, 'राज्य सरकार गरिबांना जास्तीत जास्त दिलासा देण्यासाठी सातत्याने लोककल्याणकारी निर्णय घेत आहे. यासाठी राज्य सरकार गरिबांना स्वस्त दरात सिलेंडर देण्याची योजना आणणार आहे.'
देशातील प्रमुख शहरांमध्ये गॅस सिलेंडरचे दर
देशाची आर्थिक राजधानी मुंबईत 14.2 किलो एलपीजी गॅस सिलेंडर दर 1052.50 रुपये आहे. देशाची राजधानी दिल्लीत 14.2 किलो घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 1053 रुपये आहे. तर, कोलकातामध्ये 14.2 किलो एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 1079 रुपये तर, चेन्नईमध्ये 14.2 किलो गॅस सिलेडरची किंमत 1068.50 रुपये इतकी आहे.