MP Budget 2022 : मध्यप्रदेश सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा; प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज, 22 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची घोषणा
Healthcare Sector MP Budget 2022 : मध्यप्रदेश सरकारनं (MP Budget 2022) नुकतंच आपलं बजेट सादर केलं. यात सर्वात महत्वाची एक घोषणा केली ती म्हणजे मेडिकल कॉलेज संदर्भात.
Healthcare Sector MP Budget 2022 : महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी काल (11 मार्च) विधीमंडळात वर्ष 2022-23 वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अजितदादांनी आरोग्य क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. दुसरीकडे मध्यप्रदेश सरकारनं (MP Budget 2022) देखील नुकतंच आपलं बजेट सादर केलं. यात सर्वात महत्वाची एक घोषणा केली ती म्हणजे मेडिकल कॉलेज संदर्भात. राज्यात 22 नवीन मेडिकल कॉलेजेस सुरु करणार असल्याची घोषणा मध्यप्रदेशचे अर्थमंत्री जगदीश देवडा यांनी केली. एकाच वेळी एवढ्या वैद्यकीय महाविद्यालयांची घोषणा होण्याची ही राज्यातील पहिलीच वेळ असावी.
मध्यप्रदेशचे अर्थमंत्री जगदीश देवडा यांनी राज्याचं बजेट सादर केलं. यात 22 नवी वैद्यकीय महाविद्यालयं सुरु करणार असल्याचं म्हटलं आहे. ही मेडिकल कॉलेज श्योपुर, राजगड, मंडला, सिंगरौली, सिवनी, नीमच, मंदसौर, दमोह, छतरपूर या जिल्ह्यात सुरु करण्यात येतील. सोबतच राज्यात MBBSच्या जागा 3250 इतक्या होतील. आरोग्य क्षेत्रासाठी तब्बल 13 हजार 642 कोटी रुपयांचं बजेट प्रस्तावित केलं आहे.
गुलाम नबी अझाद केंद्रीय मंत्री असताना प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्यकीय महाविद्यालय असे धोरण जाहीर झाले होते. त्याच अनुषंघाने मध्यप्रदेशात आता प्रत्येक जिल्ह्यात एक मेडिकल कॉलेज होणार आहे.
महाराष्ट्रातील आरोग्य क्षेत्रासाठी अजित पवार यांनी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा
- 8 मोबाईल कर्करोग निदान वाहने - 8 कोटी खर्च
- नांदेड, अमरावती, जालना, भंडारा, अहमदनगर आणि सातारा या ठिकाणी प्रत्येकी 50 खाटांची प्रथम दर्जाची ट्रॉमा केअर युनिट उभारण्यासाठी भांडवली खर्चासाठी 100 कोटी रुपये आणि आवर्ती खर्चासाठी 18 कोटींचा निधी
- सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी महिला रुग्णालये - हिंगोली, यवतमाळ, सांगली, सातारा, धुळे, सिंधुदुर्ग, रायगड आदी जिल्ह्यांत प्रत्येकी 100 खाटांची स्त्री रुग्णालये उभारणार
- ग्रामीण भागातील रुग्णांना किडनी स्टोन काढण्यासाठी लिथोट्रिप्सी उपचारपद्धती उपलब्ध करुन देणार, 200 खाटांच्या सर्व रुग्णालयांमध्ये तीन वर्षात सुरु करणार, त्यासाठी 17 कोटी 60 लाखांची तरतूद
- 60 शासकीय रुग्णालयांमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेची उपचारपद्धती
- आनंदीबाई जोशी यांना स्मरुण देशातील होतकरु विद्यार्थ्यांना इथेच प्रवेश मिळावा. मुंबईत सेंट जॉर्ज, नाशिक आरोग्य विज्ञान संस्था, नागपूरमध्ये बाबासाहेब आंबेडकर संस्था उभारणार
- पुणे शहरात 300 एकर जागेत इंद्रायणी मेडिसिटी उभारणार, सगळ्या उपचार पद्धती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार
- जालना इथे 365 खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय उभारण्यात येणार आहे, या रुग्णालयाच्या बांधकामासाठी अंदाजे 60 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
- प्रत्येक जिल्हा रुग्णालयात टेलीमेडिसिन केंद्र स्थापन करण्यात येतील. पुढे ही सेवा उपजिल्हा रुग्णालयातही उपलब्ध होईल.