एक्स्प्लोर

BLOG | लॉकडाऊन.. शुटिंग आणि कोल्हापूर!

ऑरेंज झोनमध्ये गेलेल्या कोल्हापुरातल्या काही रंगकर्मींनी ही चित्रिकरणं कोल्हापुरात करावीत असा आग्रह धरला आहे. किंबहुना ही चित्रिकरणं कोल्हापुरात करता यावीत त्यासाठी आवश्यक सर्व सुविधा-सोयी पुरवण्यावर त्यांनी भर दिला आहे.

जवळपास दोन महिने सगळी चित्रिकरणं थांबली आहेत. मालिका, नाटक आणि सिनेमे ही मनोरंजनाची तीनही माध्यमं बंद आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे आज घरबसल्या प्रत्येकाचं मनोरंजन होतं आहे. शिवाय जुन्या मालिका पुन्हा टीव्हीवर आल्यामुळे तसं फार काही अडत नाहीय कोणाचं. पण या इंडस्ट्रीला मोठा फटका बसला आहेच. संपूर्ण काम ठप्प असल्यामुळे स्टार कलाकारांपासून अगदी रोजंदारीवर जगणाऱ्या टेम्पोचालकापर्यंत सगळ्यांवर घरी गप्प बसण्याची वेळ आली आहे. अर्थात हा लॉकडाऊन उठेल अशी आशा सर्वांनाच मनातून वाटत असतानाच राज्यातला आणि मुंबईतला कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतोय. त्यामुळे हा लॉकडाऊन आणखी वाढेल असे संकेत मिळतायत.

तिसरा लॉकडाऊन सुरू करताना राज्याचे तीन झोनमध्ये भाग करण्यात आले. रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन. चित्रिकरणाची माय समजली जाणारी मुंबई अर्थातच रेड झोनमध्ये असल्यामुळे इथे नजिकच्या काळात शुटिंग्ज सुरू होण्याची शक्यता नाही. म्हणूनच ऑरेंज झोनमध्ये गेलेल्या कोल्हापुरातल्या काही रंगकर्मींनी ही चित्रिकरणं कोल्हापुरात करावीत असा आग्रह धरला आहे. किंबहुना ही चित्रिकरणं कोल्हापुरात करता यावीत त्यासाठी आवश्यक सर्व सुविधा-सोयी पुरवण्यावर त्यांनी भर दिला आहे. अर्थात हे कौतुकास्पद पाऊल आहे. यामध्ये कोल्हापूरचे आनंद काळे, स्वप्नील राजशेखर, सर्जेराव पाटील, मिलिंद आष्टेकर, अजय कुरणे आदी मंडळींचा सहभाग आहे. काही दिवसांपूर्वी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी काही कलाकारांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. या व्हर्चुलल बैठकीला कोल्हापूर-मुंबईतली अनेक मंडळी हजर होती. त्यानंतर मात्र या पर्यायाकडे कोल्हापूरकर गांभीर्याने पाहात असल्याचं दिसू लागलं. जोवर मुंबईत लॉकडाऊन आहे तोवर मुंबईतल्या मालिकांची चित्रिकरणं कोल्हापुरात करावीत. शक्य असेल तर सिनेमाची चित्रिकरणं सुरू करावीत असा पर्याय आहे. अभिनेते, निर्माते खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही या पर्यायाचा विचार केल्याबद्दल कोल्हापूरकरांचं अभिनंदन केलं आहे. पण खरंच या लॉकडाऊनच्या काळात चित्रिकरणाचं विकेंद्रीकरण करणं शक्य आहे का? कोल्हापूरच्या रंगकर्मींनी आणि इंडस्ट्रीशी संबंधित व्यावसायिकांनी दिलेला हा पर्याय स्वीकारार्ह आहे का?

एक नवा पर्याय म्हणून आपण याकडे पाहायला काहीच हरकत नाही. कोल्हापुरात चित्रपटांची परंपरा होतीच. भालजी पेंढारकर, अनंत माने, दादा कोंडके आदी अनेक मंडळी कोल्हापुरात चित्रिकरण करत. अर्थात तो झाला इतिहास. कोल्हापुरात लोकेशन्स आणि आवश्यक साधनसामग्री मिळत असल्यामुळे सिनेमांची चित्रिकरणं सुरू असतातच. शिवाय तिथे आताशा मालिकांची चित्रिकरणंही सुरू झाली. आज कोल्हापूर आणि परिसरात जवळपास पाच मालिकांची चित्रिकरणं सुरू आहे. म्हणजे मालिकांच्या चित्रिकरणाला लागणारी सामग्री शहरात आहे. कलाकारांची राहायची सोय. लोकेशन.. खान-पान आदी सगळ्या सुविधा बजेटमध्ये बसल्याशिवाय मालिकांचे निर्माते तिथे येणार नाहीत. ही अत्यंत महत्वाची आणि अभिनंदनीय गोष्ट आहे. आता आपल्या एकूणच जीवनशैलीचे दोन भाग करण्याची गरज आहे. अगदी सर्वांनाच हे लागू असेल. लॉकडाऊन आधीची शैली आणि लॉकडाऊन नंतरची शैली.

लॉकडाऊननंतर सर्वंच इंडस्ट्रीजचा चोहरामोहरा बदलणार आहे. त्याला मनोरंजनसृष्टीही अपवाद नाही. मुंबईतल्या अनेक निर्मात्यांशी.. चॅनलमध्ये अत्यंत महत्वाच्या पदांवर असलेल्या व्यक्तींशी गेले आठवडाभर बोलल्यानंतर काही निष्कर्ष समोर आले आहेत. लॉकडाऊन काळात मुंबईतल्या मालिका कोल्हापुरात हालवणे जवळपास अशक्य आहे. याची दोन कारणं. पहिलं कारण कलाकारांना मुंबईतून कोल्हापुरात नेणं हा मोठा टास्क असेल. शिवाय प्रत्येक मालिकेचं नेपथ्य म्हणजे मालिकेतलं घर.. वाडा.. हे त्या मालिकेतलं एक कॅरेक्टर असतं. ते हालवणं किंवा तात्पुरती दुसरी सोय करणं हे वाहिन्यांना अशक्य आहे. त्याचवेळी उद्या असा पर्याय निघाला तरी मुंबईतून (रेड झोन) कोल्हापुरात (ऑरेंज झोन) गेल्यानंतर क्वारंटाईन व्हावं लागणार आहेच. कोल्हापूरच्या आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार रेड झोनमधून कोणीही आलं तरी त्याला 14 दिवस संस्थांत्मक विलगीकरण कक्षात ठेवलं जाणार आहे आणि त्यानंतर गृह विलगीकरणात ठेवलं जाणार आहे. म्हणजे कोल्हापुरात आल्यानंतर 28 दिवस केवळ बसून जाणार असतील तर मुंबईत थांबलेलं काय वाईट असा प्रश्न काही निर्माते उपस्थित करतात. शिवाय, आवश्यक युनिट (मालिकेसाठी काम करणाऱ्या टीमला युनिट म्हणतात) कोल्हापुरात आलं तरी कोल्हापूरकर त्याचं स्वागत करणार का हा प्रश्नही त्यांच्या मनात आहे.

दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो फीड पाठवण्याचा. म्हणजे, मालिकेचं दिवसभराचं शूट झालं की झालेलं चित्रिकरण एका हार्ड डिस्कमध्ये साठवलं जातं. त्यानंतर रात्री चॅनलचा किंवा निर्मात्यांचा एक माणूस ते फीड घेऊन मुंबईला येतो. मुंबईत ते सगलं एडिट होतं आणि त्यानंतर चॅनलकडे दिलं जातं. बऱ्याचदा एडिट सेटअप सेटवर असतो. त्यानंतर तयार फीड हार्डडिस्कवर घेऊन तो इसम चॅनलकडे येतो. लॉकडाऊनमध्ये या माणसाचं जाणं येणं बंद होईल. मालिकेसाठी वापरले जाणारे कॅमेरे हे अत्याधुनिक असतात. त्याची क्वालिटीही ठरवून दिलेली असते. त्यामुळे इतक्या मोठ्या फाईल्स या इमेल द्वारे येणं शक्य नसतं म्हणून त्याला माणूस लागतो.

लॉकडाऊनच्या काळात केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊन पाळण्याचं आवाहन केलं असताना मालिकेसाठी मुंबईतून उठून कोल्हापुरात जाणं हे जवळपास सर्वच चॅनल्सना अमान्य आहे. अशाने कलाकारांच्या जिवीताला धोका आहेच. पण मुंबईतून कलाकार कोल्हापुरात गेल्यानंतर कोल्हापूरकरांच्याही जीवाशी खेळ कशाला असा सवाल ही मंडळी विचारतात. त्यापेक्षा दोन महिने थांबलो आहे तर आणखी काही दिवस थांबू असा विचार चॅनल आणि निर्माते करू लागले आहेत. मुंबईतून उठून कोल्हापुरात जायचा प्रश्न आहेच. पण उद्या तिथे जाणं झालं तरी लॉकडाऊन उठल्यानंतर पुन्ही मुंबईत यावं लागेल. कारण मालिकेची लांबी लक्षात घेऊन लोकेशन्सची भाडी भरून ठेवलेली असतात. मग ही जा ये करण्यापेक्षा मुंबईत थांबलेलं उत्तम असं काही कलाकारांनीही बोलून दाखवलं आहे.

कोल्हापूर पर्याय कुणासाठी? मुंबईनंतर कोल्हापूर हा पर्याय उत्तम आहेच. चित्रिकरण स्थळांचं विकेंद्रीकरण होण्यासाठी कोल्हापूर हा चांगला पर्याय आहे. कोल्हापूरला चित्रनगरी आहेच. शिवाय, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी त्यात रस दाखवल्यामुळे आवश्यक सोयीसुविधाही इथे उपलब्ध करून दिल्या जातील. असं असेल तर लॉकडाऊननंतर कोल्हापूर हे शुटिंग डेस्टिनेशन ठरू शकतं. इथल्या परिसरात नव्याने काही मालिका येऊ शकतात. निर्माते-चॅनलला हव्या त्या गोष्टी त्यांच्या बजेटमध्ये आल्या तर कोल्हापूर हे नव्या मालिकांचं डेस्टिनेशन ठरूच शकतं. पण हे केवळ मोजक्या रंगकर्मींनी वा केवळ कलाकारांनी ठरवण्याची गोष्ट नाही. राजाश्रय लाभत असेल तर हॉटेल इंडस्ट्री, ट्रॅव्हल इंडस्ट्री, फूड इंडस्ट्री आदी सर्वांनी एकत्र येऊन हे डेस्टिनेशन बनवायला हवं. गेल्या काही वर्षांपासून अनेक मालिका कोल्हापुरात दाखल होऊ लागल्या आहेत. यावरून काही छोट्या गावांत झगड्याचे प्रकारही घडले आहेत. अशाने कोल्हापूरची प्रतिमा डागाळते. परिसरातल्या ग्रामपंचायतींना विश्वासात घेऊन मास्टर प्लॅन आखणं आवश्यक आहे. कोणतीही लालसा वा हेतू न ठेवता त्याची जबाबदारी खमक्या कलाप्रेमी द्रष्ट्या राज्यकर्त्याने घ्यायला हवी. ती घेतली गेली तर कोल्हापूरचं पुन्हा एकदा कलापूर होईल.

कारण, मघाशी म्हटल्याप्रमाणे एक महत्वाची गोष्ट ध्यानात घ्या. लॉकडाऊननंतर आता जगाचे दोन भाग होणार आहे. एक लॉकडाऊन आधीचं जग आणि लॉकडाऊननंतरचं जग.

BLOG | चिंटूसाब.. काळापुढचा कपूर!

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये
विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये
'नाद' खुळा... दारुच्या एका बॉटलवर एक फ्री, दुकानांबाहेर ऑफर्सचे बोर्ड; ग्राहकांची गर्दी, बॉक्स भरुन नेले
'नाद' खुळा... दारुच्या एका बॉटलवर एक फ्री, दुकानांबाहेर ऑफर्सचे बोर्ड; ग्राहकांची गर्दी, बॉक्स भरुन नेले
चकमकीत तीन नक्षलवादी ठार, 25 लाख बक्षीस असलेल्या मुरलीचा खात्मा; बस्तर फायटरची मोठी कारवाई
चकमकीत तीन नक्षलवादी ठार, 25 लाख बक्षीस असलेल्या मुरलीचा खात्मा; बस्तर फायटरची मोठी कारवाई
Nanded turmeric cooker Blast: आष्टीत हळद शिजवताना कुकरचा भीषण स्फोट, दाबामुळे 600 फूटापर्यंत पार्ट उडाले, 4 शेतकरी जखमी
आष्टीत हळद शिजवताना कुकरचा भीषण स्फोट, दाबामुळे 600 फूटापर्यंत पार्ट उडाले, 4 शेतकरी जखमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 7PM 25 March 2025Majha Mudda EP 06 : औरंगजेबची कबर ते वाघ्या कुत्रा प्रकरण, महत्वाच्या मुद्द्यांपासून नेते भरकटतायत?Waghya Dog Controversy : रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा, संभाजीराजे छत्रपतींची मागणी, राजेंच्या मागणीनंतर ओबीसी समाज आक्रमकTop 50 Superfast News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 March 2025 : 6 PM : ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये
विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये
'नाद' खुळा... दारुच्या एका बॉटलवर एक फ्री, दुकानांबाहेर ऑफर्सचे बोर्ड; ग्राहकांची गर्दी, बॉक्स भरुन नेले
'नाद' खुळा... दारुच्या एका बॉटलवर एक फ्री, दुकानांबाहेर ऑफर्सचे बोर्ड; ग्राहकांची गर्दी, बॉक्स भरुन नेले
चकमकीत तीन नक्षलवादी ठार, 25 लाख बक्षीस असलेल्या मुरलीचा खात्मा; बस्तर फायटरची मोठी कारवाई
चकमकीत तीन नक्षलवादी ठार, 25 लाख बक्षीस असलेल्या मुरलीचा खात्मा; बस्तर फायटरची मोठी कारवाई
Nanded turmeric cooker Blast: आष्टीत हळद शिजवताना कुकरचा भीषण स्फोट, दाबामुळे 600 फूटापर्यंत पार्ट उडाले, 4 शेतकरी जखमी
आष्टीत हळद शिजवताना कुकरचा भीषण स्फोट, दाबामुळे 600 फूटापर्यंत पार्ट उडाले, 4 शेतकरी जखमी
Stock Market Update : शेअर बाजारातील तेजीला सातव्या दिवशी ब्रेक, गुंतवणूकदारांचे 350000 कोटी बुडाले, घसरणीच्या काळात कोणत्या शेअरमध्ये तेजी?
शेअर बाजारातील तेजीला सातव्या दिवशी ब्रेक, गुंतवणूकदारांचे 350000 कोटी बुडाले, कारण समोर
अलीकडचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे राहिले नाहीत, पाया पडू नका; अजित पवारांचा मोलाचा सल्ला
अलीकडचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे राहिले नाहीत, पाया पडू नका; अजित पवारांचा मोलाचा सल्ला
लग्नापूर्वी शारिरीक संबंध ठेवणे योग्य की अयोग्य? ऐश्वर्या रायचं उत्तर चर्चेत
लग्नापूर्वी शारिरीक संबंध ठेवणे योग्य की अयोग्य? ऐश्वर्या रायचं उत्तर चर्चेत
Mumbai : मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
Embed widget