Video : गल्ली क्रिकेटमध्ये पण अशा चुका कोणी करणार नाही; अभिषेक शर्मासोबत मैदानात नेमकं घडलं काय? ट्रेविस हेडवर भडकला
आयपीएल 2025 च्या दहाव्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघ दिल्ली कॅपिटल्सशी भिडत आहे.

DC VS SRH IPL 2025 : आयपीएल 2025 च्या दहाव्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघ दिल्ली कॅपिटल्सशी भिडत आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर सनरायझर्स हैदराबादचा संघ प्रथम फलंदाजी करायला आला. सनरायझर्स हैदराबादला वाटले असेल की, आज पहिल्यांदाच फलंदाजी करून 300 धावांचा टप्पा पार करू. पण दिल्ली संघाने पहिल्याच षटकात त्याच्या आशा धुळीस मिळवल्या.
अभिषेक शर्मासोबत मैदानात नेमकं घडलं काय?
सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजी संघाचा पहिला षटक मिचेल स्टार्क टाकण्यासाठी आला. स्टार्कच्या या षटकात ट्रॅव्हिस हेडने दोन चौकार मारून आपल्या संघाला तुफानी सुरुवात देण्याचा प्रयत्न केला. पण असे असूनही, हैदराबाद संघाला मोठा धक्का बसला. हा धक्का हेडचा सलामीचा साथीदार अभिषेक शर्मा होता. या सामन्यात अभिषेक स्वतःच्या चुकीमुळे धावबाद झाला.
SRH ನ ಮೊದಲ ವಿಕೆಟ್ ಪತನ 👏
— Star Sports Kannada (@StarSportsKan) March 30, 2025
ರನ್ ಔಟ್ ಮೂಲಕ Abhishek Sharma ತಮ್ಮ ವಿಕೆಟ್ ಕೈಚೆಲ್ಲಿದ್ದಾರೆ 👀
📺 ವೀಕ್ಷಿಸಿ | TATA IPL 2025 | #DCvSRH | LIVE NOW | ನಿಮ್ಮ JioHotstar & Star Sports ಕನ್ನಡದಲ್ಲಿ.#IPLOnJioStar #IPL2025 #TATAIPL pic.twitter.com/tKwl18nYPF
खरंतर असं झालं की, ट्रॅव्हिस हेडने षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण तो चुकला आणि चेंडू त्याच्या बॅटच्या कडेला लागला. हे घडताच, हेडने एक धाव मागितली. पण अभिषेक शर्माने हेडचे ऐकले नाही आणि धाव घेण्यास नकार दिला.
पण, येथे असे घडले की, अभिषेक नीट कॉल करू शकला नाही आणि हो नाही, हो नाही म्हणत क्रीजमधून बाहेर पडला. दरम्यान, पॉइंटवर उभ्या असलेल्या विप्राज निगमने चेंडू उचलला आणि थेट विकेटवर मारला. ज्यामुळे अभिषेक धावबाद झाला. आऊट झाल्यानंतर, अभिषेक ट्रॅव्हिस हेडवर खूप निराश दिसत होता.
दिल्लीच्या गोलंदाजांचा तांडव...
दिल्ली कॅपिटल्स संघाने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध शानदार गोलंदाजी केली. सामन्याच्या 5 षटकांनंतर, हैदराबाद संघाने 50 धावा केल्या होत्या आणि त्यांचे 4 स्टार फलंदाज बाद झाले. आऊट झालेल्या फलंदाजांमध्ये ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन आणि नितीश कुमार रेड्डी यांचा समावेश आहे. त्यानंतर हैदराबादकडून युवा अनिकेत वर्माने सर्वाधिक 74 धावा केल्या. ज्यामुळे सनरायझर्स हैदराबाद संघ 163 धावा करून शकला, पण 18.4 षटकांत ऑलआउट झाला. अनिकेतने 41 चेंडूंच्या खेळीत 5 चौकार आणि 6 षटकार मारले. अभिषेक शर्मा 01, ट्रॅव्हिस हेड 22, इशान किशन 02, नितीश कुमार रेड्डी 00 आणि हेनरिक क्लासेन 32 धावा काढून बाद झाले. दिल्लीकडून मिचेल स्टार्कने 35 धावा देत 5 बळी घेतले.





















