एक्स्प्लोर
'फोन'च्या दुनियेतील 'स्मार्ट' माणूस
ग्राहम बेलला श्रद्धांजली म्हणून अवघ्या अमेरिकेने तेव्हा एक मिनिट टेलिफोन बंद ठेवले होते. बेलला यापेक्षा मोठी श्रद्धांजली काय असू शकत होती?
सध्याचं युग 'डिजिटल युग' आहे. अनेकांच्या हातात स्मार्टफोन दिसतो. संवाद क्षेत्रात अनेक संशोधनं होत असतात, रोज नवनवे यंत्र बनवले जात आहेत. मात्र संवादयंत्राच्या या साऱ्या शोधाचा जनक आहे ग्राहम बेल नावाचा अवलिया. 'टेलिफोन'चा शोध लावणाऱ्या ग्राहम बेल यांनी आपल्या आयुष्यत अनेक चढ-उतार पाहिले. या माणसाचा प्रवास रंजक आणि थरारक आहे...
आईला कानाचा त्रास. दोन भावांचा फुफ्फुसाच्या आजाराने मृत्यू. पत्नीही कर्णबधीर. चार मुलं. त्यात दोन मुली आणि दोन मुलं. दोन्ही मुलांचा अकाली मृत्यू.... इतकं सारं भयानक जगणं. मानसिकरित्या खचवणारं. मात्र आपल्या अफाट ज्ञानाच्या, सृजन कल्पकतेच्या आणि अखंड सचोटीच्या जोरावर त्या अवलियाने जगाचे दोन कोपरे आवाजाने जोडण्याच्या यंत्राचा शोध लावला. त्यांच नाव – अलेक्झांडर ग्राहम बेल!
ग्राहम बेलबद्दल अनेक इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. सर्वच सांगता येत नाहीयेत. पण जितक्या मला माहितीयेत. जितक्या माझ्या वाचनात आल्या आहेत, त्या सांगतो. मुळात ग्राहम बेल ज्याला आपण म्हणतो, त्याचं मूळ नाव अलेक्झांडर. वयाच्या दहाव्या वर्षी आपल्या इतर भावांप्रमाणे नाव आणि आडनावाच्या मधे नाव लावण्याचं वडिलांना सूचवलं, वडिलांनी परवानगी दिली आणि तेव्हापासून अलेक्झांडरचा ‘अलेक्झांडर ग्राहम बेल’ झाला. पुढे ग्राहम बेल म्हणूनच परिचित झाले.
अलेक्झांडरचं वैयक्तिक आयुष्य प्रचंड खडतर राहिलं. मेंटल लेव्हलला. घरी तशी फार खाच-खळग्यांची स्थिती नव्हती. पण समस्यांचीही कमी नव्हती. टेन्शन्स काही कमी नव्हते. आई कर्णबधीर होती. दोन भाऊ होते. मेल्विले जेम्स बेल आणि एडवर्ड चार्ल्स बेल. मेल्विले मोठा. त्याचा जन्म 1845 चा आणि एडवर्डचा 1867 चा. तर ग्राहमचा जन्म 1847. दोन्ही भावांचा अकाली निधन झाला. दोघांनाही फुफ्फुसाचा आजार झाला आणि त्यातच त्यांचा अंत झाला. मेल्विले वयाच्या 23 व्या वर्षी, तर एडवर्ड वयाच्या 19 व्या मृत्यू पावला. आता अलेक्झांडर मेल्विल्ले बेल आणि एलिजा ग्रेस या दाम्पत्याचं एकच मुल जिवंत होतं, ते म्हणजे अलेक्झांडर ग्राहम बेल.
अलेक्झांडरचं कुटुब स्कॉटलँडमधलं. एडिनबर्ग हे त्याचं जन्मगाव. 16 साऊथ शेर्लोट स्ट्रिटवर त्याचं घर होतं. आता हा परिसर अलेक्झांडर ग्राहम बेलचं जन्मगाव म्हणून प्रसिद्ध आहे. ग्राहम बेलला टोपणनाव ‘अॅलेक’ होतं. ते फार कुणाला माहित नव्हतं. अत्यंत जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळीच टोपणनावाने हाक मारत. बाकी सगळे अलेक्झांडरच. पुढे टेलिफोनचा शोध लावल्यानंतर अलेक्झांडरवरुन ‘ग्राहम बेल’ म्हणूनच नाव प्रसिद्ध झालं.
ही सारी ग्राहम बेलची बेसिक माहिती. मला त्याच्या पुढच्या गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट होता. त्यासाठी अनेक लेख वाचले. संदर्भ शोधले. खूप मस्त, कुतुहलजनक माहिती मिळाली. ते कुठे साठवून न ठेवल्याने, जितकं आठवतंय, तेवढ्या माहितीवर सांगतो.
लहानपणापासून कर्णबधीरांबद्दल वेगळी आपुलकी होती. सहानुभूती होती. कदाचित स्वत:ची आईच त्या त्रासातून जात असावी म्हणून असेल. पुढे थोडा मोठा झाल्यावर तो कर्णबधीरांना शिकवू लागला. बोस्टन विद्यापीठात स्वरयंत्र या विषयावर तो लेक्चर घेत असे. तिथेच त्याला स्वरयंत्र तयार करण्याचं वेड लागलं. तो रोज स्वरयंत्र बनवण्याचे प्रयत्न करत असे.
तिथेच एक माबेल ह्युबार्ड नावाची विद्यार्थिनी होती. ग्राहम बेल यांना ती आवडू लागली. बेल यांच्या शोधाविषयी तिला कळल्यावर तिनेच ओठांच्या हालचालीतून वाचता येणं, हाच कर्णबधीरांसाठी उत्तम पर्याय असल्याचे सांगितले आणि बेल यांचा शोध त्या दिशेने गेला. टेलिफोनच्या शोधाच्या दिशेने टाकलेलं हे पहिलं पाऊल होतं. संवादाच्या जगात क्रांती घडवणारा तो क्षण होता.
आणि हो, माबेल हुशार होती, सुंदर-देखणी होती. ग्राहम बेल तिच्या प्रेमात पडले. माबेल श्रीमंत घरातली होती. त्यामुळे सुरुवातीला बेल यांची डेअरिंग झाली नाही. अर्थात प्रेमाबाबत ते सर्वसामान्यांसारखेच होते. त्यामुळे टेलिफोनच्या शोधानंतर जेव्हा ते रातोरात स्टार झाले, तेव्हाच त्यांनी तिच्या घरी मागणी घातली.
माबेल ही गिल्बर्ट होवे ग्रोस्व्हेनर यांची मुलगी. गिल्बर्ट हे कुणी साधेसुधे नव्हते. फोटो र्जनालिझमचे जनक त्यांना म्हटलं जातं. अगदी तुम्हा-आम्हाला कळेल, अशी ओळख सांगायची तर ते ‘नॅशनल जिओग्राफिक’चे पहिले पूर्ण वेळ संपादक होते. पुढे ते नॅशनल जिओग्राफिक सोसायटीचे अध्यक्षही झाले.
तर माबेल 5 वर्षांची असताना तिला स्कार्लेट फिव्हर झाला होता. म्हणजे 1862 साली. त्यात तिला कानाचा त्रास सुरु झाला आणि तिने ऐकणंच गमावलं. ती कर्णबधीर झाली. मात्र, तिच्यातील डिसिजनी तिच्यावर मोठा इफेक्ट झाला. रात्रीचं चालणं तिला मुश्किल व्हावं, असा त्रास सुरु झाला. म्हणजे बॅलन्स डिसऑर्डर. चालायला लागली की तोल जायचा. असं म्हणतात की, माबेल हीच ग्राहम बेलच्या टेलिफोन बनवण्यातल्या गतीमागची प्रेरणा होती. स्वरयंत्रापासून टेलिफोन बनवताना शोधाची दिशा बदलून टेलिफोनच्या दिशेने जाणं, तेही माबेलमुळे... हेही या प्रेरणेला दुजोरा देतं.
असो. काहीही असो. कुणीही प्रेरणा देवो. पण ज्या प्रेरणेतून, कल्पकतेतून ग्राहम बेलने टेलिफोनचा शोध लावला, तेही अफाट आहे. त्या शोधाबाबतही काही रंजक असे किस्से आहेत.
मुळात टेलिफोनच्या शोधाचा दिवसही अफलातून होता. खरंतर टेलिफोनचा शोध अमूक-तमूक दिवशी, अगदी तारखेसह आपण सांगत असलो, तरी त्यामागे अनेक दिवसांची मेहनत होती. तीही अविरत.
10 मार्च 1876 चा दिवस. ग्राहम बेल एका खोलीत आणि दुसऱ्या खोलीत त्यांचे मित्र वॉट्सन होते. दोघेही आपापल्या संशोधनात गुंतले होते. दोघेही यंत्रांची जोडणी वगैरे करत होते. त्यावेळी पहिलं यश मिळालं. त्याचेही वेगळे किस्से सांगितले जातात. त्यात किती तथ्य हे माहित नाही. मात्र, दुसऱ्या खोलीत बसलेल्या वॉट्सनशी पहिलं वाक्य बोलले, ते होतं – “Mr. Watson... come here... I want to see you.”... हे वाक्य जगाच्या इतिहासातलं पहिलं वाक्य, जे टेलिफोनवर बोललं गेलं.
बस्स... जगातल्या तंत्रज्ञानाधारित संवादक्रांतीचं हे पहिलं पाऊल. टेलिफोनचा जन्म आणि त्यावरील संभाषण हे असं होतं. पुढे 1915 मध्ये जेव्हा अमेरिकेच्या पूर्व आणि पश्मिम समुद्रकिनाऱ्यांना जोडणाऱ्या टेलिफोन लाईनच्या उद्घाटनासाठी ग्राहम बेल गेले होते. कार्यक्रम न्यूयॉर्कमध्ये होता. त्यावेळी त्यांना टेलिफोनवर बोलूनच उद्घाटन करण्यास सांगितले गेले. त्यावेळीही त्यांनी वॉट्सन या आपल्या सहकारी मित्रालाच फोन केला आणि म्हणाले, “Mr. Watson, come here, I want you.”. तेव्हा समोरुन वॉट्सन हे हसले. वॉट्सन त्यावेळी सॅन फ्रान्सिस्कोला होते. अडीच ते तीन हजार किलोमीटर अंतरावर. अफाट दूर असलेले दोन ठिकाणं आवाजानं जोडण्याचं काम ग्राहम बेल यांनी केलं.
अरे हो.. याताल वॉट्सन म्हणजे नक्की कोण, असाही तुम्हाला प्रश्न पडला असेल ना? तर तेही सांगतो. तोही काही ऐरागैरा नव्हता. त्याचाही इतिहास मोठा आणि प्रसिद्ध असाच आहे.
वॉट्सनचं पूर्ण नाव थॉमस जॉन वॉट्सन सिनियर. अमेरिकन उद्योगपती. तुम्हा-आम्हाला ती IBM कंपनी माहितीय ना? तीच ओ.. इंटरनॅशनल बिझनेस मशिन्स. येस.. त्या कंपनीचा 1914 ते 1956 या काळात वॉट्सन हे चेअरमन आणि सीईओ होते. वॉट्सन यांचाही आणखी वेगळा आणि रंजक इतिहास आहे. हा माणूसही मोठा होता. असो.
तर पुढे टेलिफोनचा शोध लागल्यानंतर ग्राहम बेल यांनी गिल्बर्ट यांना म्हणजे माबेलच्या वडिलांकडे माबेलसाठी मागणी घातली. त्यावेळी ग्राहम बेल प्रसिद्धीच्या शिखरावर होते. जगभर त्यांच्या नावाची चर्चा होती. त्यामुळे गिल्बर्ट यांनी नकार देणं अशक्यप्रायच गोष्ट होती. पुढे लग्न झालं. लग्नावेळी माबेल ही ग्राहम बेल यांच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान होती. माबेल आणि ग्राहम बेल यांना एकूण चार मुलं झाली. त्यात दोन मुलं आणि दोन मुली. मात्र, दोन मुलं जन्मानंतर मृत्यू पावली.
तर वैयक्तिक आयुष्यातले खाच-खळगे पेलत त्यांनी पुढेही संशोधन सुरु ठेवलं. आपण त्यांना फक्त टेलिफोनचा शोधकर्ता म्हणून ओळखतो. मात्र, ग्राहम बेल यांनी आणखीही अत्यंत महत्त्वाचे शोध लावले. त्यामध्ये, मेटल डिटेक्टर, फोटोफोन वगैरेही संशोधन त्यांचंच. अंगभूत अफाट संशोधनवृत्ती असलेला हा माणूस होता.
एकंदरीतच ग्राहम बेल यांचं आयुष्य प्रचंड चढ-उताराचं, तितकंच प्रेरणेचं, तितकंच दु:खाचं, तितकंच आनंदाचं असं खूप काही होतं.
आणि काळाचा तो दिवस आलाच. 2 ऑगस्ट 1922. रात्रीचे 2 वाजले होते. आजाराने त्रस्त झालेले ग्राहम बेल अंथरुणावर पडले होते. थकवा, श्वास घेण्यास त्रास अशा नाना त्रासांसह ते विव्हळत होते. बाजूला माबेल बसली होती. एका क्षणी माबेल म्हणाली, “Don't leave me.”. दुसऱ्या क्षणाला ग्राहम बेलने नकारार्थी मान डुलवली आणि तिसऱ्या क्षणाला त्याने प्राण सोडला. जग एका महान शोधकर्त्याला मुकला.
ग्राहम बेलला श्रद्धांजली म्हणून अवघ्या अमेरिकेने तेव्हा एक मिनिट टेलिफोन बंद ठेवले होते. बेलला यापेक्षा मोठी श्रद्धांजली काय असू शकत होती?
टेलिफोनचा शोध लावणाऱ्या अलेक्झांडर ग्राहम बेलच्या एका इन्स्पिरेशन वाक्याने समारोप करायला आवडेल. तो म्हणतो, “Concentrate all your thoughts upon the work at hand. The sun's rays do not burn until brought to a focus.”... हे वाक्य कुणा मजेत कसं जगावं, हसत कसं राहावं, अशी पुस्तकं लिहिणाऱ्याने सांगितलेलं नाही. तर ते सांगितलंय, जगाच्या दोन कोपऱ्यांना जोडण्याचा अखंड ध्यास घेऊन ‘टेलिफोन’ नावाच्या यंत्राचा शोध लावणार्या माईलस्टोन व्यक्तिमत्त्वाचं... अर्थात ग्राहम बेलचं.
विनम्र अभिवादन ग्राहम बेल!
नामदेव अंजना यांचे याआधीचे ब्लॉग :
अजात... जातीअंताच्या लढाईचे एक अज्ञात पर्व
लालराणीचा राजा उपाशी
आय लव्ह यू सनी लिओनी!
फिडेल कॅस्ट्रो : अमेरिकेचा झंझावात रोखणारं वादळ
प्रिय गुरुजी...
ब्लॉग : शांतीलाल नावाचा जाणिवांचा झरा!
मोदींचा परतीचा प्रवास सुरु?
बुकशेल्फ : श्रेय ज्याचे त्यास द्यावे..
बुकशेल्फ : आय अॅम अ ट्रोल
बुकशेल्फ : शहर आत्महत्या करायचं म्हणतंय..!
बुकशेल्फ : लेनिन, यशवंतराव आणि जॉन रीड्सचं पुस्तक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
शिक्षण
व्यापार-उद्योग
Advertisement