Sagar Karande Cheated Of Rs 61 Lakh: चला हवा येऊ द्या फेम सागर कारंडेला 61 लाखांचा चुना; एक पोस्ट लाईक केली आणि फसला
Sagar Karande cheated of Rs 61 lakh : एका महिलेनं सागरला तब्बल 61 लाखांचा चुना लावला आहे. एका ऑनलाईन गुंतवणूक योजनेत सागरची फसवणूक झाली आहे.

Sagar Karande cheated of Rs 61 lakh : मराठी रंगभूमी, सिनेसृष्टी गाजवणारा 'चला हवा येऊ द्या' फेम मराठमोळा अभिनेता सागर कारंडे (Sagar Karande) आपल्या हटके आणि क्लासी विनोदीशैलीसाठी ओळखला जातो. पण, आपल्या विनोदांनी प्रेक्षकांना खळखळवून हसवणाऱ्या सागर कारंडेवर आता रडण्याची वेळ आली आहे. सागर कारंडे सायबर क्राईमचा बळी ठरला आहे. मनोरंजन जगतात प्रसिद्ध असलेला सागर कारंडे एका महिलेच्या जाळ्यात अडकला असून ऑनलाईन प्रॉडला बळी पडला आहे. या महिलेनं सागरला तब्बल 61 लाखांचा चुना लावला आहे. एका ऑनलाईन गुंतवणूक योजनेत सागरची फसवणूक झाली आहे. या धक्कादायक घटनेनंतर मराठी चित्रपटसृष्टीत चिंतेचं वातावरण आहे.
सागर कारंडेला एका महिलेनं व्हॉट्सअॅपवर संपर्क केला, ज्यामध्ये त्याला इन्स्टाग्राम पेज लाईक केल्यानंतर पैसे मिळतील, असं आमीष दाखवलं गेलं. सुरुवातीला त्याला एका पेजला लाईक करण्यासाठी 150 रुपये देण्याचं आश्वासन दिलं गेलं. महिलेनं सागरला सुरुवातीला काही पेजच्या लिंक पाठवून त्याला लाईक करायला सांगितलं. सागरनं ते पेज लाईक केल्यानंतर त्याला त्याबदल्यात पैसे दिले गेले. पण, नंतर गुंतवणुकीची स्किम देऊन त्यात अडकवलं गेलं. आपली फसवणूक झाल्याचं समजताच सागर कारंडेनं तात्काळ पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली.
सागर कारंडेनं पोलिसांत धाव घेत आपल्यासोबतची आपबिती सांगितली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेत तपास सुरू केला आहे. पोलिसांनी याप्रकरणाची माहिती देताना लोकांना आवाहनही केलं आहे. अलिकडच्या काळात अशा ऑनलाईन घोटाळ्यांमध्ये झपाट्यानं वाढ झाली आहे, त्यामुळे लोकांनी सतर्क राहण्याची गरज आहे, असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
प्रकरण नेमकं काय?
फेब्रुवारी 2025 मध्ये एका अनोळखी महिलेनं सागरला एक व्हॉट्सअॅप मेसेज केला. व्हॉट्सअॅपवरून सागर कारंडे आणि तिच्यात बोलणं झालं. त्यावेळी महिलेनं त्याला एक स्किम सांगितली. तिनं इन्स्टाग्रामवरील काही पोस्ट 'लाईक' करण्याचं काम देऊ केलं आणि प्रत्येक लाईकसाठी 150 रुपये मिळतील, असं सांगितलं आहे. दिवसाला साधारण 6,000 रुपये कमावता येतील, असंही तिनं नमूद केलेलं. सागरनं तिला होकार दिला आणि तिथेच तो फसला. तब्बल 61 लाख रुपयांचा गंडा घातला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :


















