Praful Patel on Sanjay Raut : संजय राऊतांनी माझ्या नादी लागू नको, Xगडा करीन म्हणताच प्रफुल्ल पटेलांकडून फक्त तीन शब्दात पलटवार; नेमकं काय म्हणाले?
Praful Patel on Sanjay Raut : प्रफुल्ल पटेल सारखे लोक दलाल आहेत. तुम्हाला दाऊदचा हिरवा रंग लागला आहे. माझ्या नादी लागू नको, Xगडा करीन, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.

Praful Patel on Sanjay Raut : वक्फ विधेयकावरून (Waqf Amendment Bill 2025) राज्यसभेत चर्चा सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्यात खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. तेव्हा बाबरी पाडण्याचे श्रेय अभिमानाने घ्यायचे आणि आमच्या शिवसैनिकांनी ते केले, असे म्हणायचे, पण आता सत्तेसाठी तिकडे गेले आहेत. पहिल्यांदा संजयभैय्यांचे भाषण नरोवा कुंजरोवा होते. रोज फाडफाड बोलत असतात. आज काय बोलू काय बोल नये, हे समजत नव्हते. संजयभैय्या तुम्ही रंग बदलू नका, असे म्हणत प्रफुल्ल पटेल यांनी संजय राऊत यांना डिवचले. तर तुम्ही भिऊन बाजू बदलली आहे. आम्ही भिऊन तिकडे गेलो नाही, असा पलटवार संजय राऊत यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर केला होता. यानंतर संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत प्रफुल्ल पटेल यांच्या तोफ डागली. प्रफुल्ल पटेल सारखे लोक दलाल आहेत. तुम्हाला दाऊद इब्राहिमचा हिरवा रंग लागला आहे. मी प्रफुल्ल पटेलला सांगतोय, माझ्या नादी लागू नको, Xगडा करीन, असे त्यांनी म्हटले. आता संजय राऊतांच्या टीकेवर प्रफुल्ल पटेलांनी तीन शब्दात उत्तर दिलंय.
प्रफुल पटेलांनी पुन्हा एकदा संजय राऊतांना डिवचलं
संजय राऊत यांनी टीका केल्यानंतर पुन्हा एकदा प्रफुल्ल पटेल यांनी अंगूर खट्टे है म्हणत संजय संजय राऊत यांना डिवचले आहे. प्रफुल्ल पटेल यांनी एक्सवर पोस्ट करत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय. आता प्रफुल्ल पटेल यांना संजय राऊत काय प्रत्युत्तर देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अंगूर खट्टे हैं...@rautsanjay61
— Praful Patel (@praful_patel) April 4, 2025
नेमकं काय म्हणाले होते संजय राऊत?
संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले की, ज्यांनी बापाच्या पाठीत खंजीर खुपसला तो माणूस रंग बदलला म्हणतोय. ज्या प्रफुल्ल पटेलांवर मोदींनी दाऊदचा हस्तक असल्याचा आरोप केला होता. त्यांच्यावर इडीची कारवाई झाली. त्यांच्या संपत्या जप्त झाल्या. तुरुंगात जाण्याची भीती असल्याने बचाव करण्यासाठी प्रफुल्ल पटेल दाऊदच्या संबंधांसह भाजपमध्ये गेले आणि राष्ट्रीय सुरक्षेची भाषा करणारे अमित शाह यांनी त्यांना आपल्या पक्षात ठेवून घेतले. प्रफुल पटेल संसदेत आहेत याची आम्हाला लाज वाटते. अजित पवार यांनी स्वतःचं अवमूल्यन करून घेतलं आहे. प्रफुल्ल पटेल सारखे लोक दलाल आहेत. कधी काँग्रेस पक्षाची दलाली करत होते, कधी राष्ट्रवादी शरद पवार पक्षासोबत होते. मग दाऊदची दलाली केली असे वाटते. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात आहोत. उद्धव ठाकरे यांच्या पक्षात आहोत. तुमचे रंग आधी पाहा. कोणता रंग आहे? तुम्हाला दाऊद इब्राहिमचा हिरवा रंग लागला आहे. मी प्रफुल्ल पटेलला सांगतोय, माझ्या नादी लागू नको, Xगडा करीन. हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. त्यांचा इतिहास काढला तर त्यांना महाराष्ट्र सोडून द्यावा लागेल, अशी टीका त्यांनी केली होती.
आणखी वाचा

























