IPL 2025 RCB vs GT: दुखावलेल्या सिराजचा गुजरातला आशिष

IPL 2025 RCB vs GT: काल बंगलोर इथे झालेल्या गुजरात विरुद्ध बंगलोर सामन्यात बंगलोर चा अश्वमेध रोखला गेला..नाणेफेकीचा कौल गुजरातच्या बाजूने गेल्यावर गिल ने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले..या मैदानावर या हंगामातील ही पहिलीच लढत.आणि तसे ही चिन्नास्वामी ची सीमारेषा कमी असल्यामुळे तुम्हाला धावांचा पाठलाग सोपा जातो...पण ही खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक असेल हा अंदाज सिराज ने फोल ठरविला..अर्शद ने विराट ला शॉर्ट आर्म पुलच्या मोहात अडकविले आणि विराट डीप स्क्वेअर लेगला झेल देऊन परतला..आक्रमक सुरुवात करणाऱ्या पडिकल आणि सॉल्ट ला सिराज ने त्रिफळाचित करून तंबूत पाठविले...आज सिराज ने त्याच्या गोलंदाजी मधील इंटेन्सिटी जरा ही कमी होऊ दिली नाही...त्याने जितका चांगला इन स्विंग टाकला तितकाच चांगला आउट स्विंग टाकला...गेले काही दिवस त्याच्या व्हाईट बोल संदर्भात येणाऱ्या चर्चा तो वाचत नसेल असे नाही... घाव त्याच्या वर्मी बसला आहे आणि तो स्वतःला सिद्ध करण्यासाठी मैदानात उतरला आहे हे त्याच्या प्रत्येक हावभावावरून दिसून येते....तो दुखावला गेला आहे पण दुप्पट आवेशाने गोलंदाजी करीत आहे.... अहमदाबाद मध्ये त्याने टाकलेल्या रोहित शर्मा साठी चेंडू हा देखील खास असाच होता...आणि आज सुद्धा त्याने अप्रतिम गोलंदाजी केली...यासाठी आशिष नेहरा याला श्रेय द्यावे लागेल..त्याचा आशिष असल्याशिवाय ही गोष्ट शक्य नाही..गुजरातकडून दोन साई मोलाची कामगिरी करीत आहेत.. साई किशोर अत्यंत बुद्धिमान गोलंदाज आहे..गुजरातच्या डावातील त्याने १० वे १३ वे नंतर डेथ मध्ये १५ वे आणि १७ वे अशी षटके टाकली आणि त्याने धावा दिल्या त्या फक्त २२ यावरून त्याचा दर्जा सिद्ध होतो...गुजरात व्यवस्थापन त्याला वॉशिंग्टन सुंदर ,मानव सुतार..जयंत यादव..च्या अगोदर खेळवीतो ....
बंगलोरकडून लिविंग स्टोन जतीन शर्मा याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे प्रयत्न अपुरे पडले..नेहमीप्रमाणे टीम डेव्हिड एक छोटी आणि उपयुक्त खेळी करून गेला...धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या गुजरात संघाला गिल च्या विकेट नंतर चिंता वाटली पण सुदर्शन इतका सुंदर खेळतो की तो बाद होईल असे वाटत सुद्धा नाही( अपवाद पहिल्या २ षटकांचा)..त्याचे तंत्र त्याला मोठी खेळी करण्यासाठी पुरक ठरते.. ६ षटकानंतर गुजरात आणि बंगलोर यांच्या धावसंख्येत फारसा फरक नव्हता त्यामुळे स्थिरावलेला. बटलर कोणावर तरी हल्ला चढवेल हे उघड होतं आणि त्यात रसिक सलाम सापडला..यष्टिरक्षणात आपल्याकडून दोन मोठ्या चुका झाल्यात याची जाणीव बटलर ला असेल आणि आपण जेव्हा अहमदाबाद इथे आलो तेव्हा आपले स्वागत किती मोठे केले होते याची सुद्धा त्याला जाणीव होती...बटलर ला आज या सर्वांची परतफेड करायची होती..आणि तो तसाच खेळला..३९ चेंडूत ७३ धावा आणि ६ षटकार मारून तो नाबाद राहिला आणि गुजरातचा विजय सुकर केला..शेवटी त्याला रुदरफोर्ड ने साथ दिली..आज बटलर आणि सिराज लव आणि कुश ठरले त्यांनी बंगळूरचा अश्वमेध रोखला...

























