वाढता 'स्क्रीन टाईम'च्या जटिल समस्येवर रामबाण उपाय; पन्नास वर्षाच्या रंगभूमीवरील अनुभवानंतर संजय पेंडसे यांचा दावा; म्हणाले...
वाढता 'स्क्रीन टाईम' हा होय. मात्र या जटिल समस्येवर एक रामबाण उपाय हे नाटक, कला क्षेत्र ठरू शकतं, असं मत नागपुराती दिग्दर्शन, अभिनेता , निर्माता आणि निवेदक असलेले संजय पेंडसे यांनी व्यक्त केले आहे.

Nagpur News : मोबाईल आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक गोष्टी सजह साध्या झाल्या आहेत. मात्र मोबाईलचा अतिजास्त वापर हा अलीकडच्या काळात मानवी जीवनावर विपरीत परिणामकारक ठरत असल्याचे जाणकार सांगताय. त्यातील एक मुख्य समस्या म्हणजे वाढता 'स्क्रीन टाईम' हा होय. मात्र या जटिल समस्येवर एक रामबाण उपाय हे नाटक, कला क्षेत्र ठरू शकतं, असं मत नागपुराती दिग्दर्शन, अभिनेता , निर्माता आणि निवेदक असलेले संजय पेंडसे यांनी व्यक्त केले आहे. आपल्या पन्नास वर्षाच्या रंगभूमीवरील आयुष्यातल्या त्यांच्या व्यक्तिगत अनुभवातून त्यांनी हा दावा केला आहे. सोबतच नाटकांमुळे शैक्षणिक अभ्यासक्रमावर कुठलाही परिणाम होत नाही. उलट अभ्यासाची गोडी वाढते, असे त्यांनी उदाहरणासह पटवून दिलं आहे.
नागपुरातील बालरंजन कला मंचाच्या माध्यमातून गेल्या पन्नास वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जवळजवळ 5000 बालकलाकारांना रंगमंचावर येण्याची संधी रंजन कला मंदिर या संस्थेचा बाल विभाग म्हणजेच बालरंजन माध्यमातून मिळाली आहे. या संस्थेचा नुकताच पन्नासावा वर्षपूर्ती सोहळा संपन्न झाला. त्या अनुषंगाने ते abp माझाशी बोलत असताना त्यांनी आपला अनुभव व्यक्त करत ही माहिती दिली आहे.
बालरंजन ही बालनाट्यांची चळवळ, नाटकांमधून शिक्षण, जनजागृती
रंजन कला मंदिर या संस्थेचा बाल विभाग म्हणजेच बालरंजन ही होय. बालरंजन कला मंदिर ही संस्था ज्येष्ठ दिग्दर्शक नाटककार पुरुषोत्तम दारवेकर यांनी सुरू केली. त्यावेळी त्यांना असं लक्षात आलं की ही संस्था पुढेही चालू ठेवायची असेल तर कलाकारांचा ओघ सतत येत राहणं गरजेचं आहे. याच हेतूने त्यांनी पन्नास वर्षांपूर्वी या कला मंदिराचा बालविभाग म्हणजेच बालरंजन सुरू केले. बालरंजन ही बालनाट्यांची चळवळ उभी करणारी एक संस्था आहे. त्रास हे करत असताना निव्वळ नाटक करून चालणार नाही तर या नाटकांमधून शिक्षण, जनजागृती करू शकलो तर त्या अनुषंगाने देखील आम्ही विचार केला. त्यामुळे आम्ही संस्थेत चार वर्षाच्या मुलांपासून पुढे सहभागी करून घेतो. कारण नवी पिढी ही फार स्मार्ट आहे.
पन्नास वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 5000 बालकलाकारांना संधी
बालरंजन कला मंचाच्या माध्यमातून गेल्या पन्नास वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जवळजवळ 5000 बालकलाकारांना रंगमंचावर येण्याची संधी या माध्यमातून मिळाली आहे. कालांतराने अनेक मोठे कलाकार देखील या माध्यमातून घडले आहेत. बदल हेच भविष्य या युक्तीप्रमाणे आम्ही काम करत आलो आहोत. करत असताना आम्ही ठरवले की लोक आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यामुळे आपण न थांबता आपण लोकांपर्यंत गेलं पाहिजे. असे अनेक प्रयोग आम्ही यशस्वीपणे राबवल्याची माहिती देखील संजय पेंडसे यांनी दिली.
अनेक राज्यात नाटक करून भाषेच्याही मर्यादा ओलांडल्या
कोरोना काळाला त्यावेळी देखील आम्ही असे नवनवीन प्रयोग केले. कोरोना काळात लहान मुलांची कुठलीही चूक नसताना त्यांना घरात अडकून पडावं लागलं. त्यावेळी इसमे हमारी क्या गलती या अशाच एक नाटक आम्ही केलं. तर आरोग्याचे महत्त्व पटवून देणारे आरोग्य दिंडी या माध्यमातून आम्ही लहानांनी मोठ्यांना धडे दिले अशा थाटणीचं नाटक केलं. हे केवळ महाराष्ट्र पुरता मर्यादित राहिले नाही तर याने अनेक राज्यात नाटक करून भाषेच्याही मर्यादा ओलांडल्या. असेही संजय पेंडसे म्हणाले.
पूर्वी नाटकांच्या प्रेक्षक वर्गामध्ये लहान मुलांची देखील गर्दी असायची. मात्र हल्लीच्या स्पर्धात्मक युगात आणि शिक्षणाच्या दडपणाखाली ही गर्दी कमी होते आहे. त्यासाठी आम्ही शाळांमध्ये जाऊन देखील नाटक करतो. प्रामुख्याने मोठ्यांना घेऊन लहान मुलांचे प्रयोग करत असतो. पण नाटक हे करतोच, असेही संजय पेंडसे म्हणाले.
नाटकामुळे अभ्यासाची गोडी वाढते
अलीकडे आमच्या कला मंदिराचा पन्नासावा वर्षपूर्ती सोळा संपन्न झाला. त्यात अनेक क्षेत्रात कार्यरत असलेले आणि नाटकातून नावारूपास आलेले कलाकार प्रामुख्याने उपस्थित होते. त्यातील अनेकांनी अशी प्रतिक्रिया दिली की, अभ्यासावर नाटकाचा कुठलाही परिणाम होत नाही. उलट जो मुलगा वर्गात चांगलं उत्तर देतो त्याला प्रश्न विचारले जातात. विचारले जातात म्हणून तो. म्हणुन नाटकामुळे अभ्यासाची गोडी वाढते हे त्यानी त्यावेळी सांगितलंय.
नाटक हे नकळत शिकणारे माध्यम, ते कुठे वाचून शिकता येत नाही- संजय पेंडसे
हल्ली प्रत्येकाच्या हातात मोबाईल असून स्क्रीन टाईम ही मोठी जटील समस्या आहे. बरेचदा स्क्रीनला बघितल्याशिवाय जेवण देखील करत नाही असे उदाहरण आहेत. हा स्क्रीन टाईम कमी करायचा असेल तर पालकांनी आपल्या मुलांना नाटकाकडे वळवलं पाहिजे. नाटक दोन गोष्टी शिकवतो, त्यात बोलायचं कसं आणि वागायचं कसं? या दोन गोष्टींमुळेच समाजात आपली ओळख निर्माण होते. आणि या दोन गोष्टी शिकण्यासाठी स्कूल कोड मध्ये याचा कुठे उल्लेख नाही. बोलायचं कसं हे कुठल्याही शाळा शिकवत नाही. आम्ही नाटकामध्ये अभ्यासाशिवाय शिकवतो. जेणेकरून व्यक्तिमत्व विकास कसा घडेल याकडे आमचे अप्रत्यक्षरीत्या लक्ष असतं, असेही संजय पेंडसे म्हणाले. नाटक हे नकळत शिकणारे माध्यम आहे. ते कुठे वाचून शिकता येत नाही. म्हणूनच त्याला दृकश्राव्य म्हणतात असेही ते म्हणाले.
हे ही वाचा





















