IPL 2025 PBKS vs LSG: श्रेयसचे शेर ए पंजाब

IPL 2025 Lucknow Super Giants vs Punjab Kings: लखनौ इथे झालेल्या सामन्यात पंजाब ने लखनौ संघाला कोणती ही दया दाखविली नाही..नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय पंजाब च्या गोलंदाजांनी सार्थ ठरविला . अर्षदीप दिवसेंदिवस अधिक परिपक्व होत चालला आहे..त्याने टाकलेल्या एक चेंडूने अचानक उसळी घेतली आणि मिचेल मार्श शून्यावर बाद झाला..त्याच्यानंतर कर्णधार ऋषभ कडून खूप आशा होत्या पण आज तो एक बेजबाबदार फटका खेळून बाद झाला..नेहमीप्रमाणे पुरण मदतीला आला पण चहल ने त्याला बाद करीत लखनौ संघाला बॅकफूट वर ढकलले.
आज खऱ्या अर्थाने सुंदर फलंदाजी केली ती आयुष बदोनीने...तो किती खास फलंदाज आहे हे त्याने फर्ग्युसन याला मारलेल्या एक्स्ट्रा कव्हर वरून षटकाराने समजून येते...तो बाद झाल्यावर समद ने एक छोटी खेळी केली आणि संपूर्ण लखनौ संघ १७१ धावा काढू शकला...आजच्या पराभवानंतर गोयंका गुरुजींची शाळा पंत साहेबाना जड जाईल एवढे मात्र खरे..धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पंजाब संघाला लायसन्स टू किल दिले आहे या आवेशात प्रभसिमरण ने सुरुवात केली..त्याने उंच टोलेजंग फटके मारले.. स्वीप मारले..रिव्हर्स स्वीप मारले.. स्विच हिट मारले...इतकेच कशाला लगान सिनेमातील गुरंन सारखा एक फटका त्याने बिष्णोई च्या गोलंदाजीवर मारला.
३४ चेंडूत ६९ धावा काढून तो एका अप्रतिम झेलवर बाद झाला...पण तोपर्यंत सामना पंजाब चा झाला होता...या संपूर्ण स्पर्धेत श्रेयस अय्यर दृष्ट लागावी अशी फलंदाजी करीत आहे... त्याच्याकडे क्रिकेट मधील सर्व फटके आहेत... त्याचा मैदानातील वावर आणि फलंदाजी करीत असतानाच वावर विव रिचर्डची आठवण करून देतो..या आधी त्याच्यावर आखूड टप्प्याचे चेंडू खेळता येत नाहीत असा आरोप होत असे... पण शार्दुलच्या एका आखूड टप्प्याच्या चेंडूवर त्याने जो हुकचा फटका मारला यावरून त्याची आता किती तयारी झाली आहे हे दिसून येते... सामन्यातील विजयी फटका हा सुद्धा त्याच्याच बॅट मधून येऊन त्याने आपले अर्धशतक दिमाखात पूर्ण केले ...सलग दोन विजय मिळवून तो गुणतालिकेत वरच्या स्थानावर आहे...
यंदाची आय पी एल स्पर्धा संपेपर्यंत एक दिवसीय क्रिकेट मधील रोहित शर्मा चा वारसदार कोण याचे कदाचित उत्तर मिळून जाईल..आणि ही स्पर्धा गिल...श्रेयस..आणि हार्दिक यांच्यामध्ये असेल...या तिघांमधून जर एकाने ही स्पर्धा जिंकली तर त्याचे पारडे इतरांपेक्षा थोडे जड होईल.

























