एक्स्प्लोर

Pune News: अ‍ॅडव्हान्स मागितल्याच्या रागातून दिशाभूल करणारी तक्रार, गर्भवती मृत्यूप्रकरणी मंगेशकर रुग्णालयाच्या तज्ज्ञ समितीचा अहवाल समोर

Pune News: पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणाची चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी असे आदेश देण्यात आले आहेत, अशातच रुग्णालयाने तज्ञांची समिती स्थापन केली आहे.

पुणे: पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital) प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. प्रसूतीचा त्रास होत असणाऱ्या तनिषा भिसे यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital) दाखल करण्यासाठी आणण्यात आले होते. मात्र उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाने (Dinanath Mangeshkar Hospital) रुग्णाला दहा लाख रुपयांची मागणी केली.दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने पैशांच्या हव्यासापोटी उपचारात अडवणूक केल्याने एका महिलेला आपला जीव गमावावा लागला. या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे. या रूग्णालयाच्या समोर आंदोलन केलं जात आहे. त्याचबरोबर या रूग्णालयाची या घटनेनंतर चौकशी सुरू आहे. अशातच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तज्ञांची समिती स्थापन केली आहे. त्याचबरोबर आता त्यांचा अहवालही समोर आला आहे.(Dinanath Mangeshkar Hospital)

तज्ञांची समिती स्थापन करून अहवाल तयार

याप्रकरणी रुग्णालयाने खालील तज्ञांची समिती स्थापन करून अहवाल तयार केलेला आहे . 
1. वैद्यकीय संचालक डॉ धनंजय केळकर
2. डॉक्टर अनुजा जोशी वैद्यकीय
3. डॉक्टर समीर जोग अतिदक्षता विभाग प्रमुख
4. श्री सचिन व्यवहारे प्रशासक

काय म्हटलं आहे अहवालात?

१. सौ. भिसे ईश्वरी सुशांत (वृत्तपत्र व वाहिन्यांवर प्रसारित झालेले नाव सौ तनिषा सुशांत भिसे) MRD १०५३७६३. या २०२० पासून रुग्णालयात वेळोवेळी उपचार व सल्ला घेण्यासाठी येत होत्या. 

२. सदर महिला रुग्णाची २०२२ साली दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये ५०% चॅरिटीचा लाभ घेऊन शस्त्रक्रिया झाली होती. 

३. २०२३ साली या रुग्णाला रुग्णालयातर्फे सुखरूप गर्भारपण व प्रसूती होण्याची शक्यता नसल्याने मूल दत्तक घेण्या विषयी सल्ला देण्यात आला होता. 

४. सर्व रुग्णालयामध्ये असा संकेत असतो कि आई व बाळाच्या सुरक्षिततेसाठी प्रसूतीपूर्व तपासणी (ANC) कमीत कमी 3 वेळा करून घेणे आवश्यक असते. तो त्यांनी या रुग्णालयात केला नाही व त्याची या रुग्णालयास माहिती नाही. 

५. १५ मार्च रोजी इंदिरा IVF चे रिपोर्ट घेऊन त्या डॉक्टर घैसास यांना भेटल्या. अतिशय जोखमीच्या व धोकादायक pregnency बद्दल डॉक्टर घैसास यांनी त्यांना माहिती दिली. दर ७ दिवसांनी तपासणीस बोलावले. त्याप्रमाणे त्यांनी २२ तारखेस येणे अपेक्षित होते. परंतु तेव्हाही त्या आल्या नाहीत.

६. २८ मार्च २०२५ शुक्रवार रोजी सकाळी ११.३० वाजला सदर रुग्ण, पती व नातेवाईक डॉक्टर पैसास यांच्या बाह्यरुग्ण विभागात आले. ते Emergency किंवा Labour Room मध्ये आले नव्हते, याची कृपया नोंद घ्यावी. 

डॉक्टर घैसास यांनी तिची तपासणी केली. ती पूर्णपणे नॉर्मल होती व तिला कुठल्याही तातडीच्या उपचाराची गरज नव्हती. परंतु जोखमीची अवस्था लक्षात घेता observation साठी भरती होण्याचा सल्ला दिला. त्याच बरोबर pregnancy a caesarean section मधील धोक्याची माहिती देण्यात आली. तसेच नवजात अर्भक कक्षाच्या (NICU) डॉक्टरांशी त्यांची भेट करून देण्यात आली. कमी वजनाची, ७ महिन्याची जुळी मुले, जुन्या आजाराची गुंतागुंत व कमीत कमी २ ते २.५ महिने NICU चे उपचार लागतील हे समजावून सांगितले व रुपये १० ते २० लाख खर्च एकंदर येऊ शकतो याची कल्पना देण्यात आली. त्यावर रुग्णाच्या नातेवाईकांनी तुम्ही भरती करून घ्या व मी प्रयत्न करतो असे सांगितले. 

रुग्णाच्या नातेवाईकांनी वेद्रद्यकीय संचालक डॉक्टर केळकर यांना फोन केला व आपली अडचण सांगितली. त्यावर डॉक्टर केळकरांनी जमतील तेवढे पैसे भरा (नातेवाईकांप्रमाणे रुपये २ ते २.५ लाख), म्हणजे मी डॉक्टर घैसास यांना सांगतो, असे सांगितले. 

असाच सल्ला एका दूरच्या नातेवाईकांना श्री सचिन व्यवहारे यांनी फोनवर दिला. रुग्णाचा कोणीही नातेवाईक प्रशासन अथवा चॅरिटी डिपार्टमेंट इथे प्रत्यक्ष भेटला नाही याची कृपया नोंद घ्यावी. जेव्हा डॉक्टर केळकर यांचे ऑपेरेशन संपले व त्यांनी डॉक्टर घैसास यांना फोन केला तेव्हा त्यांनी रुग्ण न सांगता निघून गेल्याचे कळवले. 

डॉक्टर घैसास ह्यांना असे वाटत होते की रुग्ण पैश्याची तजवीज करत आहे. तशी तजवीज न झाल्यास रुग्णाच्या पतीला ससून येथे जाण्याचा सल्ला दिला होता. जेणेकरून आईची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया व होणाऱ्या अपुऱ्या वाढीच्या गर्भाची शुश्रूषा ससून येतील NICU मध्ये व्यवस्थित होईल. दरम्यानच्या काळात एका नर्सने रुग्ण /नातेवाईक आपली बॅग उचलून चालत गेल्याचे सांगितले. थोड्या वेळाने रुग्णाच्या नातेवाईकांकडून काहीच हालचाल न झाल्याने डॉ. पैसास यांनी रुग्णाच्या पतीला फोन केला, तो त्यांनी उचलला नाही. त्यामुळे २८ मार्च च्या दुपारनंतर रुग्णाचे काय झाले याबद्दल डॉ. घैसास व रुग्णालय प्रशासन यांना काहीच कल्पना नव्हती. 

यानंतर Daily Mirror मध्ये आलेल्या बातमीनंतर सर्वांना कळले की रुरणाचा सिझेरियनमध्ये झालेल्या गुंतागुंतीमुळे मृत्यू झाला. वृत्तपत्रातील माहिती प्रमाणे, २८ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता सूर्या हॉस्पिटल वाकड़ रपये भरती झाली व २६ मार्च राजी सकाळी सिडोरियन झाले. दीनानाथमधून सदर रुग्ण ससून व तिथून सूर्या हॉस्पिटलमध्ये स्वतःच्या गाडीने गेला व सिझेरियन सुद्धा दुसऱ्या दिवशी झाले ह्याची नोंद घ्यावी. तसेच सूर्या हॉस्पिा ल मधील माहितीनुसार आधीच्या operation ची व कॅन्सर संबंधीची व तिच्या नातेवाईकांनी माहिती लपवून ठेवत की असे समजते.

सदर चौकशी अंती व रुग्णालयातील इतर सिनियर gynaecologist च्या opinion नुसार आमच्या समितीचा निष्कर्ष खालीलप्रमाणे : 

१. सदर रुग्णासाठी Twin Pregnancy धोकादायक होती. 

३. माहितीचे रुग्णालय असून सुद्धा ANC चेकअप पहिले सहा महिने रुग्णालयात आल्या नाहीत. 

४. Advance मागितल्याच्या रागातून सदर तक्रार केलेली दिसते. 

रुग्णालयाचे वैद्यकीय सल्ले जसे मानले नाहीत तसेच वैद्यकीय संचालकांनी जमेल तेवढे पैसे भरुन ऍडमिट होण्याचा सल्ला पण त्यांनी पाळला नाही. 

रुग्णाच्या मृत्यूमुळे आलेली निराशा व advance मागितल्यामुळे आलेल्या रागातून ही दिशाभूल करणारी तक्रार करण्यात आली आहे असे समितीचे मत आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jain Muni Nilesh Chandra Maha Katta:Video: 'पण तुम्ही चापट मारणार असाल, तर आम्ही मारवाडी...' जैन मुनी निलेश चंद्र राज ठाकरेंना मराठीच्या वादावर काय काय म्हणाले?
Video: 'पण तुम्ही चापट मारणार असाल, तर आम्ही मारवाडी...' जैन मुनी निलेश चंद्र राज ठाकरेंना मराठीच्या वादावर काय काय म्हणाले?
Video : हातात पेट्रोल घेऊन आला, बाॅयफ्रेंडनं नर्स गर्लफ्रेंडसमोर स्वतःला पेटवलं, जळत्या अवस्थेत रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारल्यानंतही जिवंत जळत राहिला
Video : हातात पेट्रोल घेऊन आला, बाॅयफ्रेंडनं नर्स गर्लफ्रेंडसमोर स्वतःला पेटवलं, जळत्या अवस्थेत रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारल्यानंतही जिवंत जळत राहिला
Ramraje Naik Nimbalkar :  प्रोटोकॉल बाजूला ठेवून आलो,  मी कोणत्या पार्टीत यावर मुंबईत चर्चा होईल, त्यांना एकच सांगेन... : रामराजे नाईक निंबाळकर
मी कोणत्या पार्टीत यावर मुंबईत चर्चा होईल, त्यांना एकच सांगेन... : रामराजे नाईक निंबाळकर
Imran Khan: इम्रान खान जिवंत आहे की नाही? पहिल्यांदा पुरावे द्या! मुलाचा पाकिस्तानात आक्रोश, पोलिसांनी समर्थक मुख्यमंत्र्याला रस्त्यात चोपलं
Video: इम्रान खान जिवंत आहे की नाही? पहिल्यांदा पुरावे द्या! मुलाचा पाकिस्तानात आक्रोश, पोलिसांनी समर्थक मुख्यमंत्र्याला रस्त्यात चोपलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nilesh Chandra Maha Katta : कबुतरांमुळे मराठी-मारवाडी वाद का? जैन मुनी निलेश चंद्र यांचा सवाल
Nilesh Chandra Maha Katta : ...तर आम्ही मराठी बोलणार नाही, जैन मुनी नेमकं काय म्हणाले?
Akshay Laxman Majha Maha katta : माईंड रिडरची लाईव्ह कार्यक्रमात ज्ञानदा कदमवर जादू,पुढे काय झालं?
Nilesh Chandra Maha Katta : फडणवीसांच्या सरकारमध्ये गद्दार नेते; योगी आदित्यनाथांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री बनवा
Sandesh Kulkarni Majha Maha Katta : मराठी कलाकारांना हिंदीमध्ये कमालीचा आदर असतो

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jain Muni Nilesh Chandra Maha Katta:Video: 'पण तुम्ही चापट मारणार असाल, तर आम्ही मारवाडी...' जैन मुनी निलेश चंद्र राज ठाकरेंना मराठीच्या वादावर काय काय म्हणाले?
Video: 'पण तुम्ही चापट मारणार असाल, तर आम्ही मारवाडी...' जैन मुनी निलेश चंद्र राज ठाकरेंना मराठीच्या वादावर काय काय म्हणाले?
Video : हातात पेट्रोल घेऊन आला, बाॅयफ्रेंडनं नर्स गर्लफ्रेंडसमोर स्वतःला पेटवलं, जळत्या अवस्थेत रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारल्यानंतही जिवंत जळत राहिला
Video : हातात पेट्रोल घेऊन आला, बाॅयफ्रेंडनं नर्स गर्लफ्रेंडसमोर स्वतःला पेटवलं, जळत्या अवस्थेत रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारल्यानंतही जिवंत जळत राहिला
Ramraje Naik Nimbalkar :  प्रोटोकॉल बाजूला ठेवून आलो,  मी कोणत्या पार्टीत यावर मुंबईत चर्चा होईल, त्यांना एकच सांगेन... : रामराजे नाईक निंबाळकर
मी कोणत्या पार्टीत यावर मुंबईत चर्चा होईल, त्यांना एकच सांगेन... : रामराजे नाईक निंबाळकर
Imran Khan: इम्रान खान जिवंत आहे की नाही? पहिल्यांदा पुरावे द्या! मुलाचा पाकिस्तानात आक्रोश, पोलिसांनी समर्थक मुख्यमंत्र्याला रस्त्यात चोपलं
Video: इम्रान खान जिवंत आहे की नाही? पहिल्यांदा पुरावे द्या! मुलाचा पाकिस्तानात आक्रोश, पोलिसांनी समर्थक मुख्यमंत्र्याला रस्त्यात चोपलं
India Q2 GDP : भारताचा दुसऱ्या तिमाहीचा GDP दर RBI चा अंदाज मागं टाकत 8.2 टक्क्यांवर, केंद्राकडून आकडेवारी जाहीर
भारताचा दुसऱ्या तिमाहीचा GDP दर RBI चा अंदाज मागं टाकत 8.2 टक्क्यांवर, केंद्राकडून आकडेवारी जाहीर
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा HDFC बँकेला दणका, 91 लाख रुपयांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा HDFC बँकेला दणका, 91 लाख रुपयांचा दंड, कारण समोर
Uddhav Thackeray: निवडणुकांमध्ये पैशाचा धूर निघतोय, हा मतांचा लिलाव आहे का? भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक झालाय; उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
निवडणुकांमध्ये पैशाचा धूर निघतोय, हा मतांचा लिलाव आहे का? भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक झालाय; उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरातील तेजी सुरुच, जीएसटीसह सोनं 1 लाख 30 हजारांवर, जाणून घ्या चांदीचे दर...
सोने आणि चांदीच्या दरातील तेजी सुरुच, जीएसटीसह सोनं 1 लाख 30 हजारांवर, जाणून घ्या चांदीचे दर...
Embed widget