Suraj Chavhan Film Zapuk Zupuk: तांबडी चामडीनंतर 'डीजे क्रेटेक्स'च्या तालावर गोलिगत सूरज चव्हाणचा भन्नाट डान्स; 'झापुक झुपूक'चं शीर्षक गीत प्रदर्शित
Suraj Chavhan Film Zapuk Zupuk: 'झापुक झुपूक' सिनेमाच्या टीझरला प्रेक्षकांकडून भरपूर चांगला प्रतिसाद मिळाला आणि आता या सिनेमाचं पहिलं गाणं प्रदर्शित झालं आहे. ज्याला यावर्षीचं पार्टी साँग म्हणता येईल.

Suraj Chavhan Film Zapuk Zupuk: जिओ स्टुडिओज (Jio Studios) आणि केदार शिंदे (Kedar Shinde) यांच्या 'झापुक झुपूक' या सिनेमाचा टीझर (Zhapuk Zhapuk Movie Teaser) नुकताच रिलीझ झाला आहे. बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi) सीझन 5 चा विनर सूरज चव्हाण (Suraj Chavhan) या सिनेमाच्या माध्यमातून मराठी सिनेश्रुष्टीत पदार्पण करतोय. टीझरला प्रेक्षकांकडून भरपूर चांगला प्रतिसाद मिळाला आणि आता 'झापुक झुपूक' या सिनेमाचं पहिलं गाणं प्रदर्शित झालं आहे. ज्याला यावर्षीचं पार्टी साँग म्हणता येईल.
या गाण्याचे संगीतकार मराठी रॅप आणि हिप-हॉप संगीत बनवणारा, मराठमोळा कृणाल घोरपडे (Krunal Ghorpade) उर्फ क्रेटेक्स आहे. तांबडी चामडीच्या यशानंतर, क्रेटेक्स आणखी एक ग्रूव्ही ट्रॅक घेऊन आला आहे. जो पुन्हा एकदा गाण्याच्या तालावर थिरकायला भाग पाडणार आहे. 'पट्या द डॉक' (Patya the Doc) यांनी हे गाणं गायलं आहे. तर गीतकार प्रतीक संजय बोरकर आहेत.
कृणाल विजय घोरपडे (डीजे क्रेटेक्स) 'झापुक झुपूक' सिनेमातल्या नव्या गाण्याबाबत म्हणाला की, तांबडी चांबडी गाण्याप्रमाणे, मला खात्री आहे की, प्रेक्षकांना माझं हे झापूक झुपूक गाणं सुद्धा नक्की आवडेल. माझं काम अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची संधी दिल्याबद्दल मी जिओ स्टुडिओज आणि केदार शिंदे यांचा खूप आभारी आहे. झापूक झुपूक चित्रपटाच्या या शीर्षक गाण्यात मराठी तडका तर आहेच पण एक जल्लोष आणि उत्साह आहे, जो तरुणांना आणि श्रोत्यांना गाण्याच्या तालावर थिरकायला नक्कीच भाग पाडेल. सामाजिक इव्हेंट्स, क्लब्स आणि पार्टीजमध्ये तांबडी चांबडी प्रमाणेच, झापूक झुपूक हे गाण ही वाजत या वर्षीचे मराठीतंल 'पार्टी साँग ऑफ द ईयर' ठरण्याची अपेक्षा नाकारता येत नाही. कारण 'आता वाजतंय मराठी, गाजतंय मराठी, पेटलाय मराठीचा डंका'
आकर्षक हुक स्टेप, उत्साही संगीत, कमालीची ऊर्जा आणि उत्तम चित्रीकरणामुळे हे गाणं आणखी रंजक ठरलय जे नेहमीच चाहत्यांना लक्षात राहील. ह्या अगोदर सुद्धा निर्माते केदार शिंदे ह्यांना आपल्या चित्रपटातील सुपरहिट गाण्यांसाठी प्रेक्षकांकडून नेहमीच दाद मिळाली आहे आणि आता झापुक झुपूक मधून ते पुन्हा एकदा चाहत्यांसाठी अनोख्या संगीताची खास भेट घेऊन येत आहेत.
'झापुक झुपूक' या चित्रपटात मनोरंजना सोबतच भरपूर काही अनुभवयाला मिळणार आहे. सिनेमा मध्ये सूरज सोबत मराठी कलाकार जसे जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी आणि दीपाली पानसरे हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.
जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित, निर्माती ज्योती देशपांडे आणि सौ. बेला शिंदे यांचा केदार शिंदे दिग्दर्शित "झापुक झुपूक" हा सिनेमा येत्या 25 एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्रतील सिनेमागृहांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
पाहा व्हिडीओ :
























