एक्स्प्लोर

बस खरेदीवरुन वादंग, परिवहनमंत्र्यांकडून 1287 ई-बसचे टेंडर रद्द; ST महामंडळ अध्यक्षांच्या पत्राला स्थगिती

विजेवरिल बसच्या प्रकल्पाचे उद्घाटन राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 13 फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात आले.

मुंबई : महाराष्ट्र एसटी महामंडळानं 5,150 विजेवरील बस (Bus) कंत्राटी पद्धतीने घेण्याचा करार इव्हे ट्रान्स कंपनीशी केला असून सदर कंपनी दर महिन्याला 215 बसेस देणार होती. पण वेळेत बसेस पुरविण्यात आल्या नाहीत. ठरलेल्या मुदतीत बसेस न पुरविणाऱ्या कंत्राटदार कंपनीवर कारवाई करण्यावरून आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap sarnaik) व एसटीचे अध्यक्ष संजय सेठी यांच्यात बेबनाव दिसत असून सरकार कंपनीवर कारवाई करण्यास घाबरत आहे का? असा सवाल महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सरकारला विचारला आहे.

विजेवरील बसच्या प्रकल्पाचे उद्घाटन राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 13 फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात आले. परंतु मार्च 24 ते मार्च 25 या कालावधीत पुरवठादार कंपनीकडून एसटीला 9 मिटर लांबीच्या 138 व 12 मिटर लांबीच्या 82 अश्या एकूण 220 बसेस पुरविण्यात आल्या आहेत. कराराचा भंग करणाऱ्या कंपनीचं कंत्राट यापूर्वीच रद्द करायला हवे होते. मध्यंतरी मुख्यमंत्री कार्यालयातील प्रिन्सिपल सेक्रेटरीकडून वेळेत बसेस न पुरविणाऱ्या डिफॉल्टर कंपनीची प्रलंबित बिले देण्यासाठी एसटी प्रशासनावर दबाव आणला. व देय असलेल्या बिलाची काही रक्कम चुकती करण्यास भाग पाडले. त्यानंतर परिवहन विभागाने अपर मुख्य सचिव व एसटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी सदर कंपनीला बस पुरविण्याबाबतीत नवीन वेळापत्रक जारी केले व मे 25 पर्यंत 1287 बस पुरविण्यात याव्यात अशा इशाराचे पत्र देण्यात आले. त्याची मुदत संपण्यापूर्वीच आता काल पुन्हा या प्रकरणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सदर कंपनीचे कंत्राट रद्द करण्याची घोषणा केली असून परिवहन मंत्री व एसटीचे अध्यक्ष यांच्यात एकवाक्यता नसल्याचे दिसून येत आहेस, असेही बरगे यांनी म्हटले आहे.

एसटीचे अधिकारी संभ्रमात!

एकंदर घटना क्रम पाहिला तर या प्रकरणी सरकारमधील अधिकारी व परिवहन मंत्री यांच्यात एकवाक्यता नसल्याचे दिसून येत असून एसटीचे अध्यक्ष व परिवहन मंत्री याचे परस्पर विरोधी आदेश पाहिले तर नक्की कुणाचे ऐकायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या मुळे 
ज्या पुरवठादार कंपनीने वेळेत बसेस पुरविल्या नाहीत व बसेस अभावी महामंडळाचे नुकसान होऊन प्रवाशांची गैरसोय झाली त्यांच्यावर कारवाई करण्यात सरकार मधील अधिकारी व मंत्री यांच्यात एकवाक्यता नसणे हे अडचणीतील एसटीला घातक  असल्याचेही बरगे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा

... तर 3 वर्षात महावितरण बंद पडेल; वीज दर कपातीच्या निर्णयावरुन उडाले खटके; विश्वास पाठक यांचा खळबळजनक दावा

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde VIDEO : बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदे म्हणाले, ही कार्यकर्त्यांची भावना असू शकते!
बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदे म्हणाले, ही कार्यकर्त्यांची भावना असू शकते!
Amravati Election :अमरावती महापालिकेत कोण सत्ता स्थापन करणार? महापौर कोणाचा होणार? युवा स्वाभिमानला सोबत घेऊनही भाजप मॅजिफ फिगरपासून दूर
अमरावतीत महापौर कोणाचा होणार? युवा स्वाभिमानला सोबत घेऊनही भाजप मॅजिफ फिगरपासून दूर
मुंबईत बिहार भवन होऊ देणार नाही; मनसेच्या नवनिर्वाचित नगरसेवकाने थोडपले दंड, थेट विरोध
मुंबईत बिहार भवन होऊ देणार नाही; मनसेच्या नवनिर्वाचित नगरसेवकाने थोडपले दंड, थेट विरोध
मुंबईत भाजप शिंदे गटाचा गुंता वाढला असतानाच आता वर्षा गायकवाडांच्या भूमिकेनं भूवया उंचावल्या! गरज पडल्यास ठाकरेंच्या मदतीला धावणार की नाही?
मुंबईत भाजप शिंदे गटाचा गुंता वाढला असतानाच आता वर्षा गायकवाडांच्या भूमिकेनं भूवया उंचावल्या! गरज पडल्यास ठाकरेंच्या मदतीला धावणार की नाही?

व्हिडीओ

Imtiaz Jaleel Sambhajinagar डान्सबारमध्ये लोकं नोटा उधळतात, मी ते करत नाही; नोटा उधळण थांबवणार नाही
Vinayak Raut On Kalyan Dombivli : विनायक राऊत यांनी नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवल्याची प्राथमिक माहिती
Nandurbar Kalicharan Maharaj : राजकारणी हिंदूवादी नाहीत ते मुस्लिमांसमोर कुत्र्यासारखी शेपूट हलवतात
Satej patil On Shivsena : कोल्हापुरात काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येण्याची शक्यता
Manikarnika Ghat Special Report : मणिकर्णिका घाट पाडला, काँग्रेसची जहीर टीका, पुनर्विकासावरुन वादाची ठिणगी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde VIDEO : बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदे म्हणाले, ही कार्यकर्त्यांची भावना असू शकते!
बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदे म्हणाले, ही कार्यकर्त्यांची भावना असू शकते!
Amravati Election :अमरावती महापालिकेत कोण सत्ता स्थापन करणार? महापौर कोणाचा होणार? युवा स्वाभिमानला सोबत घेऊनही भाजप मॅजिफ फिगरपासून दूर
अमरावतीत महापौर कोणाचा होणार? युवा स्वाभिमानला सोबत घेऊनही भाजप मॅजिफ फिगरपासून दूर
मुंबईत बिहार भवन होऊ देणार नाही; मनसेच्या नवनिर्वाचित नगरसेवकाने थोडपले दंड, थेट विरोध
मुंबईत बिहार भवन होऊ देणार नाही; मनसेच्या नवनिर्वाचित नगरसेवकाने थोडपले दंड, थेट विरोध
मुंबईत भाजप शिंदे गटाचा गुंता वाढला असतानाच आता वर्षा गायकवाडांच्या भूमिकेनं भूवया उंचावल्या! गरज पडल्यास ठाकरेंच्या मदतीला धावणार की नाही?
मुंबईत भाजप शिंदे गटाचा गुंता वाढला असतानाच आता वर्षा गायकवाडांच्या भूमिकेनं भूवया उंचावल्या! गरज पडल्यास ठाकरेंच्या मदतीला धावणार की नाही?
Pimpri Chinchwad: पिंपरी-चिंचवडमधील ‘या’ शाळांना २० जानेवारीला सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, वाहतुकीतही बदल, नेमकं काय आहे कारण?
पिंपरी-चिंचवडमधील ‘या’ शाळांना २० जानेवारीला सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, वाहतुकीतही बदल, नेमकं काय आहे कारण?
मुंबई मनपात चकीत करणारं गणित, ठाकरेंकडे दोन हुकूमी एक्के, महापौर आरक्षण सोडतीने धाकधूक वाढवली! 
... तर ठाकरेंचाच महापौर होऊ शकतो, मुंबई मनपात चकीत करणारं गणित, ठाकरेंकडे दोन हुकूमी एक्के, महापौर आरक्षण सोडतीने धाकधूक वाढवली! 
Thane Mayor: शिंदे मुंबईमध्ये हटून बसल्याची चर्चा पण आता ठाण्यामध्ये भाजपला काय काय हवं याची यादी समोर आली!
शिंदे मुंबईमध्ये हटून बसल्याची चर्चा पण आता ठाण्यामध्ये भाजपला काय काय हवं याची यादी समोर आली!
PCMC Election 2026: पिंपरी चिंचवडकरांनो! हे आहेत तुमच्या महापालिकेत 132 नवनिर्वाचित नगरसेवक, कोणत्या पक्षाने किती जागांवर मिळवला विजय, वाचा एकाच क्लिकवर
पिंपरी चिंचवडकरांनो! हे आहेत तुमच्या महापालिकेत 132 नवनिर्वाचित नगरसेवक, कोणत्या पक्षाने किती जागांवर मिळवला विजय, वाचा एकाच क्लिकवर
Embed widget