IPL 2025 : कमिंडू मेंडिसची एकाच ओव्हरमध्ये दोन्ही हातानं गोलंदाजी, अर्धशतक झळकावणाऱ्या रघुवंशीचा टप्प्यात कार्यक्रम Video
KKR vs SRH : आयपीएलच्या 2024 च्या हंगामातील फायनलिस्ट संघ आज आमने सामने आले आहेत. सनरायजर्स हैदराबादनं पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

कोलकाता : आयपीएलच्या 18 व्या हंगामात सतराव्या हंगामातील अंतिम फेरीतील दोन संघ आमने सामने आले आहेत. कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात कोलकाता येथील ईडन्स गार्डन्स मैदानावर सामना सुरु आहे. हैदराबादनं प्रथम टॉस जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. यामुळं कोलकाताच्या संघाला पहिल्यांदा फलंदाजी करावी लागली. अंगकृष रघुवंशी, व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे आणि रिंकू सिंग यांच्या दमदार खेळीमुळं केकेआरनं 200 धावांचा टप्पा पार केला. मात्र, अर्धशतक झळकावणाऱ्या अंगकृष रघुवंशीची विकेट लक्षात ठेवण्यासारखी आहे. कारण, सनरायजर्स हैदराबादचा फिरकीपटू कमिंडू मेंडिस यानं दोन्ही हातानं गोलंदाजी एकाच ओव्हरमध्ये केली अन् केकेआरचा डाव सावरणाऱ्या रघुवंशीचं लक्ष विचलित झालं आणि तो बाद झाला.
कमिंडू मेंडिसची खेळी सक्सेसफूल, रघुवंशी जाळ्यात अडकला
सनरायजर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या कमिंडू मेंडिसनं केकेआरचा डाव सावरणाऱ्या अंगकृष रघुवंशीविरुद्ध जाळं लावलं. त्यामध्ये तो अलगद अडकला. कमिंडू मेंडिस तेराव्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत होता. त्यानं व्यंकटेश अय्यरला उजव्या हातानं गोलंदाजी केली. तर अंगकृष रघुवंशीला डाव्या हातानं गोलंदाजी केली. याच ओव्हरमध्ये अंगकृष रघुवंशीचं अर्धशतक पूर्ण झालं होतं. त्यामुळं मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात रघुवंशी बाद झाला. मात्र, कमिंडू मेंडिसची दोन्ही हातानं होणारी गोलंदाजी फलंदाजांचं टेन्शन वाढवताना दिसून येतेय. रघुवंशीनं केकेआरसाठी 50 धावांची खेळी केली. त्यानंतर मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न करण्याच्या बाद झाला. मेंडिसची गोलंदाजी सुरु असताना हर्षल पटेलनं यांनी डोळ्याचं पारणं फेडणारा कॅच घेत केकेआरला धक्का दिला.
KAMINDU MENDIS BOWLS RIGHT ARM AND LEFT ARM IN A SINGLE OVER. 🪄
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 3, 2025
- Gets a wicket as well. 😄pic.twitter.com/rt4kfHpNeS
हैदराबादसमोर किती धावांचं आव्हान
गेल्या वर्षीच्या आयपीएलचे दोन्ही संघ आजच्या सामन्याच्या निमित्तानं पहिल्यांदा समोर आले. यावेळी केकेआरच्या संघात बदल झाले. अजिंक्य रहाणे, अंगकृष रघुवंशी, व्यंकटेश अय्यर आणि रिंकू सिंग यांच्या फलंदाजीच्या जोरावर केकेआरनं 20 ओव्हरमध्ये 200 धावा केल्या. अंगकृष रघुवंशी बाद झाल्यानंतर केकेआरच्या संघाकडून जोरदार फटकेबाजीची जबाबदारी व्यंकटेश अय्यरनं केली. त्यानं 29 बॉलमध्ये 60 धावा केल्या. याशिवाय कॅप्टन अजिंक्य रहाणे आणि रिंकू सिंग यांनी जोरदार फलंदाजी करत 200 चा टप्पा पार करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली.
हैदराबाद पराभवाचा वचपा काढणार?
कोलकाता नाईट रायडर्सनं सनरायजर्स हैदराबादचा गेल्या वर्षीच्या आयपीएलच्या अंतिम फेरीत पराभव करत विजेतेपद मिळवलं होतं. आजच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद त्या पराभवाचा वचपा काढण्याचा प्रयत्न करेल. सामन्यात नेमकं काय घडतं ते पाहावं लागेल.





















