एक्स्प्लोर

PM Kisan : पीएम किसानसाठी नव्यानं नोंदणी कशी करायची? 20 व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळवण्यासाठी 'या' स्टेप्स फॉलो करा

PM Kisan : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 19 हप्त्यांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना आता 20 व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.

नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारनं फेब्रुवारी/ मार्च 2019 मध्ये सुरु केली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना आतापर्यंत 19 हप्त्यांची रक्कम देण्यात आली आहे. 19 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात बिहार राज्यातील एका कार्यक्रमावेळी पाठवण्यात आली. आता शेतकऱ्यांना नव्यानं नोंदणी करायची असल्यास ऑनलाईन आणि ऑफलाइन या दोन पद्धतींचा वापर करता येईल. पीएम किसानच्या लाभासाठी पात्र असलेल्या पण आतापर्यंत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यास त्यांना येणाऱ्या 20 व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळू शकतात. 

नव्यानं नोंदणीसाठी काय करायचं?

पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हप्त्यांमध्ये 2000 रुपयांप्रमाणं दरवर्षी 6000 रुपये पाठवले जातात. आता नव्यानं नोंदणी करायची असल्यास पहिल्यांदा या योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी कोणत्या अटी शेतकऱ्यांनी पूर्ण करणं आवश्यक आहे ते जाणून घेऊयात. छोटे शेतकरी या योजनेसाठी अर्ज करु शकतात. शेतकऱ्यांकडे शेती करण्यासारखी जमीन असणं आवश्यक आहे. शेतकऱ्याचं नाव राज्य आणि केंद्र सरकारच्या कागदपत्रांमध्ये असणं आवश्यक आहे. अर्जदार शेतकऱ्याचं आधार कार्ड, बँक खाते आणि मोबाईल नंबर योजनेशी जोडलेले असणं आवश्यक आहे. 


ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया 

स्टेप 1 : सर्वप्रथम योजनेची अधिकृत वेबसाईट https://pmkisan.gov.in या वेबसाईटला भेट द्या.
स्टेप 2 : नवीन शेतकरी नोंदणी  (New Farmer Registration) वर क्लिक करा. 
स्टेप 3 : आता तुम्ही तुमचा 12 अंकी आधार क्रमांक नोंदवा. 
स्टेप 4 : तुम्हाला 10 अंकी मोबाईल क्रमांक नोंदवावा लागेल. 
स्टेप 5 : आता तुम्ही राज्याची निवड करा. 
स्टेप 6 : स्क्रीनवर दिसत असलेला कॅप्चा क्रमांक नोंदवा, मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी क्रमांक नोंदवा. 
स्टेप 7 : आधार कार्ड, बँक पासबूक, जमिनीशी संबंधित कागदपत्रं अपलोड करा. 
स्टेप 8 : सर्वा माहिती भरल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा, अर्जाची प्रक्रिया पूर्ण होईल. 

ऑफलाईन नोंदणी प्रक्रिया कशी असते?

तुम्हाला जर पीएम किसान साठी ऑनलाईन नोंदणी करायची नसेल तर ऑफलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया देखील उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या सीएससी  केंद्रावर जा आणि अर्ज भरुन द्या. केंद्रावरील अधिकारी तुमच्या अर्जाची पडताळणी करेल, पात्रता तपासेल आणि कागदपत्रं बरोबर आहेत का तपासून पाहिल. जर तुम्ही योजनेला पात्र असाल तर तुमचा अर्ज जमा केला जाईल.


पीएम किसानचा लाभ विना अडथळा मिळावा म्हणून काय करावं?

जर तुम्हाला कोणताही खंड न पडता पीएम किसानच्या हप्त्याची रक्कम मिळावी, असं वाटत असेल तर तुम्ही देखील काही गोष्टींची पूर्तता करणं आवश्यक आहे. प्रथम शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्ण करणं आवश्यक आहे. ही प्रक्रिया सीएससी सेंटर किंवा पीएम किसान पोर्टलवरुन पूर्ण करता येईल. जमीन पडताळणी देखील करणं आवश्यक आहे. तुमचा बँक खाते क्रमांक आधार क्रमांकासोबत लिंक असणं आवश्यक आहे. याशिवाय डीबीटी पर्याय सुरु असणं आवश्यक आहे. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

तुमचं खातं कोणत्या बँकेत? HDFC बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा, व्याजदरात केली कपात
तुमचं खातं कोणत्या बँकेत? HDFC बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा, व्याजदरात केली कपात
वर्षभरात साखरेच्या दरात 20 टक्के वाढ, साखर कंपन्यांच्या शेअर्समध्येही तेजी, दरात आणखी वाढ होणार का?
वर्षभरात साखरेच्या दरात 20 टक्के वाढ, साखर कंपन्यांच्या शेअर्समध्येही तेजी, दरात आणखी वाढ होणार का?
सर्वाधिक सुट्ट्या मिळणाऱ्या भारतातील सरकारी नोकऱ्या कोणत्या? जाणून घ्या सविस्तर माहिती 
सर्वाधिक सुट्ट्या मिळणाऱ्या भारतातील सरकारी नोकऱ्या कोणत्या? जाणून घ्या सविस्तर माहिती 
Gold Silver Rate Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ; पुन्हा गाठला दीड लाखांचा टप्पा, चांदीमध्येही तेजी, जाणून घ्या आजचे दर
सोन्याच्या दरात मोठी वाढ; पुन्हा गाठला दीड लाखांचा टप्पा, चांदीमध्येही तेजी, जाणून घ्या आजचे दर

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget