IPL 2025 Mumbai Indians: सूर्यांश शेडगे-सूर्याच्या उदयाची प्रतीक्षा

IPL 2025 Mumbai Indians: स्थळ बंगलोर तारीख १५ डिसेंबर... मुंबई विरुद्ध मध्य प्रदेश .. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी मधील अंतिम सामना... मुंबईला जिंकण्यासाठी 175 धावा पाहिजेत... पंधराव्या षटकापर्यंत मुंबईची अवस्था 130 धावा आणि पाच बळी .. पृथ्वी . अजिंक्य रहाणे श्रेयस अय्यर शिवम दुबे, सूर्यकुमार यादव इत्यादी मोहरे तंबूत परतलेले आहेत.. पुढील पाच षटकात 45 धावांचा आव्हान समोर आहे..आणि एक तरुण उमदा खेळाडू मैदानात येतो..नाव सूर्यांश शेडगे....आणि हा उमदा तरुण वेंकटेश अय्यर च्या गोलंदाजीवर तुटून पडतो...एक लेंथ बॉलवर एक षटकार वसूल करतो आणि ऑफ स्टम्प च्या बऱ्याच बाहेरील एक चेंडूवर हा स्लॉग स्वीप मारतो...३६ धावा आणि त्या सुद्धा केवळ १५ चेंडूत..सामना मुंबई जिंकते आणि सामानवीरचा बहुमान जातो सूर्यांश शेडगे यास..
सूर्यांश शेडगे मुंबई क्रिकेटच्या आकाशगंगेतील हा एक तारा आहे... ज्याला स्वतःचे तेज आहे...मुंबई क्रिकेट मधील खडूसपणा, आक्रमकता, जिद्द आणि संपूर्ण समर्पण हाच सूर्यांश याचा डी एन ए आहे..आणि हा डी एन ए त्यांनी तेराव्या वर्षीच गाईल्स शील्ड स्पर्धेत १३७ चेंडूत ३२६ धावा ठोकून काढल्या तेव्हाच त्याने तो डीएनए दाखवून दिला आहे..गुजरात विरुद्धच्या सामन्यात त्याने पंजाब कडून पदार्पण केले पण त्यावेळेस त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही... काल लखनऊ विरुद्धच्या सामन्यात देखील त्याला तशी संधी मिळाली नाही..पण जेव्हा त्याला तशी संधी मिळेल तेव्हा तो एक उत्तम फिनिशर म्हणून आय.पी. एल च्या नभांगणात चमकून जाईल एवढे मात्र नक्की.... कारण दबावाखाली त्याचा खेळ किती बहरतो हे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी मध्ये दिसून आलेल आहे..सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी च्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेश विरुद्ध 15 चेंडू 36 धावा आणि आपल्या गोलंदाजीने एक बळी अशी कामगिरी करून त्याने सामनावीराचा बहुमान मिळवीला...त्या आधी आंध्र विरुद्धच्या सामन्यात आठ चेंडू 30 धावा ठोकून काढल्या.. श्रीकांतच्या गोलंदाजीवर त्याने जवळजवळ आठव्या यष्टी वरचा चेंडू डीप स्क्वेअर लेग वरून सीमारेषे बाहेर पाठवला.. आणि तसाच एक चेंडू त्याने डीप एक्स्ट्रा कव्हर वरून फेकून दिला... हे दोन्ही षटकार त्याने बनवले.
गोव्याविरुद्धच्या सामन्यात जेव्हा इतर गोलंदाज सरासरी 10 आणि 15 च्या सरासरीने धावा देत होते तेव्हा सूर्यांश दोन षटकात फक्त 18 धावा देऊन दोन बळी मिळवतो... बडोदा विरुद्धच्या सामन्यात दोन षटकात तो केवळ 11 धावा दोन बळी मिळवतो... यावरून तो एक उपयुक्त अष्टपैलू खेळाडू म्हणून पंजाब कडून चमकेल यात काही शंका नाही.... पंजाब संघाचे प्रशिक्षक रिकी पॉंटिंग आणि कर्णधार श्रेयस अय्यर आहे या दोघांनाही चांगली गुणग्राहकता आहे...सय्यद मुश्ताक अली मध्ये त्याचा स्ट्राईक रेट २५१.९ इतका होता यावरून त्याच्या खेळीचा मॅग्नीट्यूड समजून येतो...सूर्यांश याच्या नावात सूर्य आहे ...आणि हा सूर्य आयपीएल मधील सूर्योदयाच्या प्रतीक्षेत आहे... आपली सर्वांची ही प्रतीक्षा लवकरच संपेल अशी आशा करूया...




















