एक्स्प्लोर

पुढे जाताना... मागे पाहताना....

गेल्या वर्षात आपल्याला साथ दिली, मग ते नातेवाईक, मित्रपरिवार किंवा ऑफिसमधले सहकारी असोत. म्हणून त्यांचे आताच्या घडीला आपण धन्यवाद मानूया. त्यांच्या विना हा प्रवास कठीण झाला असता. तसंच संकटकाळी जे छातीचा कोट करुन पाठीशी उभे राहिले, त्यांनाही दंडवत करुया.

आपल्या आयुष्यातलं आणखी एक वर्ष सरलं. 2018 जाऊन आपण पाऊल ठेवतोय, 2019 मध्ये. भारताचा विचार केल्यास निवडणुकांच्या वर्षात. पण, आताच्या या संवादात मी त्याबद्दल अधिक काहीच सांगत नाहीये, किंबहुना तो माझा हेतूच नाहीये. आता मला फक्त मागच्या वर्षात काय झालं, किंवा काय करायचं राहिलं. याचा जमाखर्च मांडून पुढच्या वर्षात काय करायचंय याची आखणी करायचीय. म्हणजे आपल्यापैकी अनेकांच्या मनात याच विचारांची मालिका सुरु असेल. पर्सनली असं वाटतं, की झालेल्या गोष्टींवर आपण कमी विचार करावा, किंवा बोलावं. त्याने फायदा असा होईल नव्या संकल्पनांवर आपण अधिक भर देऊ शकू. तरीही आपल्या आयुष्यातले बहुमोल क्षण मागे सरलेत, त्यावर मंथन व्हायलाच हवं. ज्यांनी गेल्या वर्षात आपल्याला साथ दिली, मग ते नातेवाईक, मित्रपरिवार किंवा ऑफिसमधले सहकारी असोत. म्हणून त्यांचे आताच्या घडीला आपण धन्यवाद मानूया. त्यांच्या विना हा प्रवास कठीण झाला असता. तसंच संकटकाळी जे छातीचा कोट करुन पाठीशी उभे राहिले, त्यांनाही दंडवत करुया. ज्यांनी नि:स्वार्थपणे आपल्यावर प्रेम केलं, मनस्वीपणे आपल्या भल्याचाच विचार केला, ज्यांनी फक्त आपल्याला देण्याचाच प्रयत्न केला, तोदेखील आपल्याकडून अपेक्षा, मनीषा ठेवता... तसेच जे पुढेही सोबत असणार आहेत, अशा सर्वांनाच मनापासून नमन करुया. यामध्ये अगदी लहान मूलही असू शकतं. म्हणजे ते आपलं नात्यातलं किंवा ओळखीतलंच पाहिजे असं नाही. तर, ज्याच्या एखाद्या कृतीने, अल्लडपणाने, अतरंगी वृत्तीने आपल्या चेहऱ्यावर हसू फुललं तर तोही आपल्याकरता आनंदपीठ ठरु शकतो. त्या क्षणापुरता... याच वेळी ज्यांनी मावळत्या वर्षात आपल्याला वेदना दिल्या, कदाचित काही वेळा अपमानास्पद बोलूनही गेले असतील काही. त्यांनाही थँक्यू म्हणू, कारण या मंडळींमुळेच वर उल्लेख केलेल्या लोकांचं मोल आपल्याला कळलं. म्हणजे उन्हाचे चटके सोसल्यानंतर सावलीचा आल्हाद मिळतो तसं. दुसरीकडे आपल्याबाबतीतही आपण हा विचार करुया. की, आपण कुणाच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं आणि कुणाच्या मनाला नख लावलं. पहिल्या कॅटेगरीत आपण असू, तर चांगलंच. मात्र कळत नकळतपणे वागून दुसऱ्या कॅटेगरीत गेलो असू, तर ज्यांना आपण दुखावलंय, त्यांना खुल्या दिलाने आणि मनाने सॉरी किंवा माझं चुकलंच, असं म्हणायलाच हवं. किंबहुना येत्या वर्षात दुसऱ्या वर्गात न जाण्याचाच जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायलाच हवा. हे झालं सरत्या काळाबद्दल. आता उगवत्या वर्षाबद्दल बोलू थोडंसं. म्हणजे संकल्प वगैरे असं काही वैचारिक काही सांगणार नाही. तरीही येणाऱ्या वर्षात काही गोष्टी करण्याचं ध्येय मनी बाळगूया. यातली प्राधान्यक्रमाने करण्याची गोष्ट म्हणजे तब्येतीवर लक्ष अर्थात फिटनेस. म्हणजे आपल्या घरातील आजूबाजूच्या ज्येष्ठ मंडळींची काळजी तर घ्यायलाच हवी. पण, जी पिढी आता वर्किंग प्रोफेशनमध्ये आहे, शाळा-कॉलेजमध्ये शिकतेय, त्यांच्याही फिटनेसवर भर द्यायला हवा. सर्दी-खोकल्यासारखे फोफावलेले किडनीचे विकार, हृदयविकार, मनोविकार हे टाळायचे असतील तर आपलं खाण्यापिण्याचं वेळापत्रक फार काटेकोरपणे पाळू. हेल्दी फूड खाऊया. म्हणजे इथेही झाडाचं उदाहरण घेऊया. झाडाची मूळं घट्ट हवीतच, त्यासोबतच फांद्याही डवरलेल्या, बहरलेल्या असाव्या. मूळं म्हणजे अर्थात आपल्याला उभं करणारे आपले आईवडील, आजीआजोबा, घरातली वडिलधारी मंडळी. तर, त्यांच्या फांद्या म्हणजे आपण. दोन्ही छान असावे, मग त्या झाडाचं सौंदर्य आणखी बहरेल. सुंदर दिसण्यापेक्षा सुंदर असणंही तितकंच महत्त्वाचं नाही का. सुंदर दिसणं हे आपल्या हातात नसतं, ते गिफ्टेड असतं. पण, सुंदर असणं हे तर सर्वस्वी आपल्याच हातात आहे. तेव्हा आधी तब्येतीने, मग कर्तृत्वाने सुंदर होऊया. शरीराची निगा राखता राखता आपल्या परिसराचीही निगा राखू. तो स्वच्छ ठेवू. अगदी बेसिक गोष्टींपासून सुरुवात करु. म्हणजे बसमधून किंवा ट्रेनमधून उतरल्यावर तिकीट केराच्या टोपलीत जाईल याची दक्षता घेऊ. इथपासूनच सुरु केलं, तर देश स्वच्छ राहायला वेळ लागणार नाही. मोठ्यांची जबाबदारी इथे जास्त अशासाठी की, तुमच्यातून या सवयी लहानांमध्ये झिरपतील, सो टेक केअर. जाता जाता आणखी तीन गोष्टी अगदी सहज मनात आल्या म्हणून सांगतो. आपण म्हणजे जी नोकरी किंवा उद्योगव्यवसायात असलेल्या लोकांसाठी खास करुन मला कळकळीने सांगावंसं वाटतं. यातली पहिली म्हणजे प्रत्येक अर्निंग मेंबरने, म्हणजे ज्याला ज्याला शक्य आहे त्याने एका नातेवाईक किंवा मित्र नसलेल्या गरजूला थोडक्यात अनोळखी तरीही गरजू असलेल्याला मदत करायची. मग ती पैशाची, कपड्यांची, शिक्षण साहित्य अगदी कसलीही. त्याचं आपल्याशी थेट नातं नसलं तरी माणुसकीचं नातं आणखी घट्ट व्हावं, म्हणून मी अनोळखी म्हटलं. साथी हाथ बढाना, किंवा ज्योत से ज्योत.... ही गीतं आपण अक्षरश: जगू शकतो, त्यासाठी थोडं मन मोठं करुया. दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येकाने किमान एक झाड लावण्याचा किंवा लावलेलं झाड जगवण्याचा प्रयत्न करुया. जेणेकरुन पर्यावरण रक्षणासाठी आपलाही खारीचा वाटा त्यात असेल. तिसरी गोष्ट म्हणजे येत्या वर्षात एक तरी चांगलं पुस्तक वाचूया. जे मेंदूला, बुद्धीला काहीतरी खुराक देईल असं. गरजूंना मदत केल्याने त्यांचं आयुष्य टवटवीत, प्रफुल्लित होईल, झाडं जगवल्याने वातावरण आणि पुस्तक वाचल्याने मन..... विविधतेने नटलेल्या एकसंध अशा या भारताच्या या प्रगतीत आपण इतका वाटा नक्की उचलू शकतो. भूतकाळाच्या पटलावरुन भविष्याकडे पाहताना वर्तमानात हे भान पाळलं तर अशक्य असं काहीच नाही, खरं ना ? जाता जाता सर्वांना नववर्षासाठी सुखसमृद्धीच्या आणि उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा.
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhaava Movie : 'छावा' पाहण्यासाठी महिलांची पारंपारिक वेशभूषा, चित्रपट संपताच पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या; संभाजी महाराजांचं बलिदान...
'छावा' पाहण्यासाठी महिलांची पारंपारिक वेशभूषा, चित्रपट संपताच पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या; संभाजी महाराजांचं बलिदान...
सरकारच्या आदेशाने EOW पथकाची नेमणूक; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ
सरकारच्या आदेशाने EOW पथकाची नेमणूक; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2025 | सोमवार
नाशिकमध्ये दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा, तोंडाला रुमाल बांधून दोघांनी सोन्याच्या दुकानात प्रवेश केला अन्...; शहरात खळबळ
नाशिकमध्ये दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा, तोंडाला रुमाल बांधून दोघांनी सोन्याच्या दुकानात प्रवेश केला अन्...; शहरात खळबळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07PM 17 February 2025100 Headlines :  शंभर हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवरABP Majha Marathi News Headlines 06PM TOP Headlines 06PM 17 February 2025ABP Majha Marathi News Headlines 05PM TOP Headlines 05PM 17 February 2025

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhaava Movie : 'छावा' पाहण्यासाठी महिलांची पारंपारिक वेशभूषा, चित्रपट संपताच पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या; संभाजी महाराजांचं बलिदान...
'छावा' पाहण्यासाठी महिलांची पारंपारिक वेशभूषा, चित्रपट संपताच पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या; संभाजी महाराजांचं बलिदान...
सरकारच्या आदेशाने EOW पथकाची नेमणूक; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ
सरकारच्या आदेशाने EOW पथकाची नेमणूक; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2025 | सोमवार
नाशिकमध्ये दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा, तोंडाला रुमाल बांधून दोघांनी सोन्याच्या दुकानात प्रवेश केला अन्...; शहरात खळबळ
नाशिकमध्ये दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा, तोंडाला रुमाल बांधून दोघांनी सोन्याच्या दुकानात प्रवेश केला अन्...; शहरात खळबळ
खुर्चीसाठी संघर्ष! विद्यमान खासदार मोहिते पाटील उभे तर माजी खासदार खुर्चीवर, सांगोल्यात नेमकं काय घडलं? 
खुर्चीसाठी संघर्ष! विद्यमान खासदार मोहिते पाटील उभे तर माजी खासदार खुर्चीवर, सांगोल्यात नेमकं काय घडलं? 
उद्धव ठाकरेंना कोकणात आणखी एक धक्का, 5 नगरसेवकांनी साथ सोडली; शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
उद्धव ठाकरेंना कोकणात आणखी एक धक्का, 5 नगरसेवकांनी साथ सोडली; शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
नियतीचा खेळ! जिथून केजरीवालांनी भाजपला देशात जमीन सुपीक करून दिली तिथूनच आता 'आप'चा पाडाव केलेला भाजप दिल्लीतही सत्तेचा श्रीगणेशा करणार!
नियतीचा खेळ! जिथून केजरीवालांनी भाजपला देशात जमीन सुपीक करून दिली तिथूनच आता 'आप'चा पाडाव केलेला भाजप दिल्लीतही सत्तेचा श्रीगणेशा करणार!
अकोल्यातील गावात दोन गट भिडले, दगडफेक अन् जाळपोळ; दुर्घटनेत 6 जखमी, 1 गंभीर
अकोल्यातील गावात दोन गट भिडले, दगडफेक अन् जाळपोळ; दुर्घटनेत 6 जखमी, 1 गंभीर
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.