एक्स्प्लोर

अमोल मिटकरींचं नशिब फळफळलं, महाराष्ट्राचे गृहमंत्री होणार; लवकरच नव्या 'भूमिके'त, म्हणाले, आवडेल मला

कधीकाळी राज्यात शिवव्याख्याते अशी ओळख असलेल्या अमोल मिटकरींना मे 2020 मध्ये अजितदादांनी रातोरात विधानपरिषदेचा आमदार करीत खळबळ उडवून दिली होती.

अकोला : प्रत्येक कार्यकर्त्याला आपण आमदार व्हावं अशी स्वप्नं कायम पडत असतात. तर प्रत्येक आमदाराला आपण मंत्री व्हावं अशी आस अन मनोमन ईच्छा असते. तर प्रत्येक मंत्र्याचा डोळा असतो तो 'मुख्यमंत्री' पदावर.  राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींना (Amol Mitkari) थेट कॅबिनेट मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे. अन तिही चक्क प्रत्येकाला हव्याहव्याशा असलेल्या गृहमंत्रीपदाची.... (Home minister)अमोल मिटकरी लवकरच 'गृहमंत्र्यां'च्या भूमिकेत दिसणार आहेत. मात्र, ही 'भूमिका' राजकारणाच्या 'रियल लाईफ'मधली नाही. तर ही भूमिका आहे चित्रपटाच्या 'रिल लाईफ'मधली. अमोल मिटकरी लवकरच एका मराठी चित्रपटात गृहमंत्र्यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. लवकरच येऊ घातलेल्या 'बिल्लोरी' या मराठी चित्रपटात अमोल मिटकरी गृहमंत्र्यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. ते या चित्रपटात आप्पासाहेब पाटील ही गृहमंत्र्यांची भूमिका साकारत आहेत. सदगृरु इंटरप्राजेस' निर्मित हा चित्रपट असून याचे निर्माते प्रशांत मानकर तर दिग्दर्शक सुनिल शिरसाठ आहेत.
 
अमोल मिटकरी बनलेत 'गृहमंत्री' : 
 
अमोल मिटकरी... राज्याच्या राजकारणातील राष्ट्रवादीची तोफ... अजित पवारांचा 'फायरब्रँड' नेता... कधीकाळी राज्यात शिवव्याख्याते अशी ओळख असलेल्या अमोल मिटकरींना मे 2020 मध्ये अजितदादांनी रातोरात विधानपरिषदेचा आमदार करीत खळबळ उडवून दिली होती. अमोल मिटकरींना लागलेल्या आमदारकीच्या 'लॉटरी'ने भल्याभल्या राजकीय पंडितांना चक्रावून सोडलं होतं. त्यानंतर आमदार अमोल मिटकरींनी सभागृहात, सभागृहाबाहेर, सभेच्या फडात अन् टीव्हीवरील चर्चेच आपल्या वक्तृत्वाची मोहोर उमटवली. महाविकास आघाडी अन नंतरच्या महायुतीच्या सरकारच्या काळात मंत्रिमंडळ विस्ताराच्या यादीत मिटकरींचं नाव चर्चेत यायला लागलं. 2024 मध्ये विधानसभेचे निकाल लागल्यानंतर त्यांचं नाव संभाव्य मंत्र्यांच्या यादीतही चर्चेत आलं. मात्र, आमदार मिटकरी इतर संभाव्य दावेंदारांसारखे 'वेटींग'वरच राहिलेत. मात्र, आज अमोल मिटकरींचं नशीब फळफळलंय. अन त्यांना थेट राज्याचं गृहमंत्रीपद मिळालं आहे. मात्र, ही 'भूमिका' राजकारणाच्या 'रियल लाईफ'मधली नाही. तर ही भूमिका आहेय चित्रपटाच्या 'रिल लाईफ'मधली. अमोल मिटकरी लवकरच 'बिल्लोरी' या मराठी चित्रपटात राज्याच्या गृहमंत्र्यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. ते या चित्रपटात आप्पासाहेब पाटील ही गृहमंत्र्यांनी भूमिका साकारत आहेत
 
'रियल लाईफ'मध्येही प्रत्यक्षात गृहमंत्री व्हायला आवडेल : आमदार अमोल मिटकरी 
 
'रियल लाईफ' मध्ये नसलं तरी 'रिल लाईफ'मधल्या या औटघटकेच्या गृहमंत्रीपदाच्या भूमिकेनं आमदार मिटकरींना आनंद झाला आहे. गाड्यांचा ताफा, पोलिसांचा कडक सॅल्युट असा मंत्रिपदाचा सर्व तामझाम त्यांना चित्रीकरणादरन्यान काही काळ सुखावून गेला. या चित्रपटाचं शुटींग मार्च 2024 मध्ये ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत झालं. अकोल्यातील 'श्री.शिवाजी महाविद्यालयात वर्षभरापूर्वी हे शुटींग पार पडलं. आता हा चित्रपट बनून तयार आहे. नुकताच या चित्रपटाच्या पोस्टर लॉन्चिंगचा कार्यक्रम अकोल्यात पार पडला. खऱ्या आयुष्यातही त्यांना गृहमंत्री बनायला आवडेल, असं आमदार अमोल मिटकरी 'एबीपी माझा'शी बोलतांना म्हणालेत. मात्र, आपल्यासारख्या एका सर्वसामान्य गरीब शेतकऱ्याच्या मुलाला अजितदादांनी आमदार केलं हेच आपल्यासाठी त्यांचे कधीच न फिटणारे उपकार असल्याचं आमदार मिटकरी म्हणाले.

हेही वाचा

Video: वो आये मेरी मजार पर... आधी आमदाराची फडणवीसांसाठी शायरी, मुख्यमंत्र्यांचाही शायराना अंदाज

गेल्या सोळा वर्षांपासून पत्रकारितेत. लेखक, कवी. समाज माध्यमांद्वारे प्रभावी लेखन. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Shiv Sena: शिवसेनेतील नाराजीनाट्य चव्हाट्यावर, एकनाथ शिंदेंचा शिलेदार महानगरप्रमुख, नगरसेवकपदाचा राजीनामा देणार; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले...
शिवसेनेतील नाराजीनाट्य चव्हाट्यावर, एकनाथ शिंदेंचा शिलेदार महानगरप्रमुख, नगरसेवकपदाचा राजीनामा देणार; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले...
तटकरे प्रदेशाध्यक्ष, प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष, त्यांनी जबाबदारीने पाऊल उचललं तर ते 'व्हिलन' कसे ठरू शकतात? हसन मुश्रीफांकडून दोघांची जोरदार पाठराखण
तटकरे प्रदेशाध्यक्ष, प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष, त्यांनी जबाबदारीने पाऊल उचललं तर ते 'व्हिलन' कसे ठरू शकतात? हसन मुश्रीफांकडून दोघांची जोरदार पाठराखण
Rohit Pawar and Ajit Pawar: अजितदादांची इच्छा पूर्ण होणार, पवार कुटुंब अन् राष्ट्रवादी एकत्र येणार का? रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
अजितदादांची इच्छा पूर्ण होणार, पवार कुटुंब अन् राष्ट्रवादी एकत्र येणार का? रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Vidip Jadhav: सातारचा रांगडा गडी, अजितदादांचा सुरक्षारक्षक विदीप जाधव यांच्या पत्नीला शासन सेवेत कायम करा; अनिल देशमुखांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
सातारचा रांगडा गडी, अजितदादांचा सुरक्षारक्षक विदीप जाधव यांच्या पत्नीला शासन सेवेत कायम करा; अनिल देशमुखांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

व्हिडीओ

Bajrang Sonawane on Ajit Pawar : अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का तपासा, बजरंग सोनवणेंची मागणी
Sambhaji Nagar Mayor : भाजपचे समीर राजूरकर संभाजीनगरचे महापौर, तर उपमहापौर शिवसेनेकडे
Shivendraraje Bhosale Satara : मला डिवचू नका… मी छत्रपतींची औलाद आहे; विरोधकांना थेट इशारा
Pankaj Bhoyar Nagpur : चंद्रपुरात भाजप-ठाकरे गट एकत्र येतील का? पंकज भोयर स्पष्टच बोलले..
Rohit Shetty And Baba Siddique Case : बाबा सिद्दिकी-रोहित शेट्टी दोन्ही आरोपींचा म्होरक्या एकच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Shiv Sena: शिवसेनेतील नाराजीनाट्य चव्हाट्यावर, एकनाथ शिंदेंचा शिलेदार महानगरप्रमुख, नगरसेवकपदाचा राजीनामा देणार; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले...
शिवसेनेतील नाराजीनाट्य चव्हाट्यावर, एकनाथ शिंदेंचा शिलेदार महानगरप्रमुख, नगरसेवकपदाचा राजीनामा देणार; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले...
तटकरे प्रदेशाध्यक्ष, प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष, त्यांनी जबाबदारीने पाऊल उचललं तर ते 'व्हिलन' कसे ठरू शकतात? हसन मुश्रीफांकडून दोघांची जोरदार पाठराखण
तटकरे प्रदेशाध्यक्ष, प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष, त्यांनी जबाबदारीने पाऊल उचललं तर ते 'व्हिलन' कसे ठरू शकतात? हसन मुश्रीफांकडून दोघांची जोरदार पाठराखण
Rohit Pawar and Ajit Pawar: अजितदादांची इच्छा पूर्ण होणार, पवार कुटुंब अन् राष्ट्रवादी एकत्र येणार का? रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
अजितदादांची इच्छा पूर्ण होणार, पवार कुटुंब अन् राष्ट्रवादी एकत्र येणार का? रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Vidip Jadhav: सातारचा रांगडा गडी, अजितदादांचा सुरक्षारक्षक विदीप जाधव यांच्या पत्नीला शासन सेवेत कायम करा; अनिल देशमुखांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
सातारचा रांगडा गडी, अजितदादांचा सुरक्षारक्षक विदीप जाधव यांच्या पत्नीला शासन सेवेत कायम करा; अनिल देशमुखांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Sachin Pilgaonkar: ट्रोलर्समुळे मला जाहिराती मिळतायत .. सचिन पिळगावकरांचं सोशल मीडियावरच्या ट्रोलिंगला चोख उत्तर, काय म्हणाले?
ट्रोलर्समुळे मला जाहिराती मिळतायत .. सचिन पिळगावकरांचं सोशल मीडियावरच्या ट्रोलिंगला चोख उत्तर, काय म्हणाले?
Ajit Pawar Baramati By-Election: अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोटनिवडणुकीसाठी हालचाली; निवडणूक आयोगाकडून महत्त्वाचं पाऊल
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोटनिवडणुकीसाठी हालचाली; निवडणूक आयोगाकडून महत्त्वाचं पाऊल
Mumbai : मुंबईत मराठी फेरीवाल्यांसाठी मनसे रस्त्यावर उतरली, दहिसरमध्ये मध्यरात्री आंदोलन; भाजप नेत्यावर गंभीर आरोप
मुंबईत मराठी फेरीवाल्यांसाठी मनसे रस्त्यावर उतरली, दहिसरमध्ये मध्यरात्री आंदोलन; भाजप नेत्यावर गंभीर आरोप
Zilla Parishad Election : जिल्हा परिषद, पंचायत समितीचा धुरळा! 125 पंचायत समित्यांच्या कारभाऱ्यांसाठी आज मतदान; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
जिल्हा परिषद, पंचायत समितीचा धुरळा! 125 पंचायत समित्यांच्या कारभाऱ्यांसाठी आज मतदान; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
Embed widget