एक्स्प्लोर

CSK vs KKR IPL 2025 : कर्णधार म्हणून परतला 'थाला', पहिल्याच सामन्यात धोनीने घेतला मोठा निर्णय! म्हणाला, आम्हीही आधी...

आयपीएल 2025 चा 25 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जात आहे.

Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders : आयपीएल 2025 चा 25 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जात आहे. हा सामना एमए चिदंबरम स्टेडियमवर रंगला आहे. या सामन्यादरम्यान कोलकाता आणि चेन्नई यांच्यात एक हाय व्होल्टेज सामना नक्कीच पाहायला मिळेल. भारतीय संघाचा महान माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार झाला आहे. ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केकेआरने सामन्यासाठी प्लेइंग-11 मध्ये एक बदल केला आहे आणि स्पेंसर जॉन्सनच्या जागी मोईन अलीचे पुनरागमन झाले आहे. 

या सामन्यासाठी सीएसकेने दोन बदल केले आहेत.  चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी म्हणाला की, आम्हीही आधी फलंदाजी करण्याचा विचार करत होतो. गायकवाडच्या जागी त्रिपाठी आणि मुकेश चौधरीच्या जागी अंशुल कंबोजला संधी देण्यात आली आहे.

चेन्नई सुपर किंग्ज संघाची प्लेइंग-11 :  रचिन रवींद्र, डेव्हॉन कॉनवे, राहुल त्रिपाठी, विजय शंकर, शिवम दुबे, एमएस धोनी, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, अंशुल कंबोज, खलील अहमद

कोलकाता नाईट रायडर्स संघाची प्लेइंग-11 : क्विंटन डी कॉक, सुनील नरेन, अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, मोईन अली, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती

या हंगामात चेन्नईची कामगिरी आतापर्यंत निराशाजनक राहिली आहे. सीएसकेने पाच सामने खेळले आहेत आणि फक्त एकच जिंकला आहे. त्यांना चार सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. चेन्नईने गेल्या चार सामन्यात पराभव पत्करला आहे. सलग चार पराभवांनंतर कर्णधाराच्या जाण्याने सीएसकेला मोठा धक्का बसला. ऋतुराज दुखापतीमुळे बाहेर आहे. त्याने पाच पैकी दोन सामन्यांमध्ये अर्धशतके झळकावली.

सीएसके त्यांच्या जुन्या कर्णधारासह मैदानात उतरेल. आयपीएल 2023 नंतर धोनीने ऋतुराज गायकवाडकडे कर्णधारपद सोपवले. पण गायकवाडच्या बाहेर पडल्यानंतर तो पुन्हा एकदा त्याच्या जुन्या शैलीत दिसणार आहे. जर आपण समोरासमोर पाहिले तर चेन्नईचा संघ वरचढ असल्याचे दिसते. चेन्नईने 19 सामने जिंकले आहेत. तर केकेआरने त्यांच्याविरुद्ध फक्त 10 सामने जिंकले आहेत.

जर आपण कोलकाता नाईट रायडर्सबद्दल बोललो तर, त्यांची परिस्थितीही फारशी चांगली नाही. केकेआरने पाच सामने खेळले आहेत आणि फक्त दोनच जिंकले आहेत. कर्णधार अजिंक्य रहाणे सीएसकेविरुद्ध महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. गेल्या सामन्यात त्याने लखनौविरुद्ध स्फोटक अर्धशतक झळकावले होते. रहाणेने 35 चेंडूत 61 धावांची खेळी केली. त्याने 8 चौकार आणि 2 षटकार मारले.

हे ही वाचा -

Corbin Bosch Banned PCB : पाकिस्तानची सटकली... अंबानीच्या स्टार खेळाडूवर पीसीबीने घातली बंदी, काय आहे नेमकं कारण?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
FPI: विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले, पुढं काय घडणार? 
विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले
भाजप आणि शिंदे गटाचे 69 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
भाजप आणि शिंदे गटाचे 68 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
FPI: विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले, पुढं काय घडणार? 
विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले
भाजप आणि शिंदे गटाचे 69 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
भाजप आणि शिंदे गटाचे 68 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
Latur Crime: धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
Uddhav Thackeray : मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
Thackeray BMC Election Manifesto: ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
Embed widget