कोण संजय राऊत? ठाण्याच्या इस्पितळात नाव नोंद करून ठेवलंय; अमित शाहंवरील टीकेनंतर भाजपचा बोचरा पलटवार
संजय राऊत आणि उबाठा सेनेवर हीच वेळ आलेली आहे. औरंगजेबी फॅन क्लबचे तुम्ही नेतृत्व करत आहात.

सिंधुदुर्ग: देशाचे गृहमंत्री अमित शाह हे रायगडावर आले होते, पण त्यांचा रायगडावर येण्याचा हेतू काय होता? असा प्रश्न संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विचारला आहे. तसेच, संजय राऊत यांनी अमित शाह यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असून त्यांनी शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याचेही राऊत यांनी म्हटले. त्याच अनुषंगाने कोकण दौऱ्यावर असलेल्या भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार (Ashish shelar) यांना प्रश्न विचारला असता, कोण संजय राऊत? ठाण्याच्या इस्पितळात ज्याचं नाव नोंद करून ठेवलं, भरती व्हायचा बाकी आहे, त्यांच्या प्रश्नाला काय उत्तर देणार असे म्हणत संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली.
संजय राऊत आणि उबाठा सेनेवर हीच वेळ आलेली आहे. औरंगजेबी फॅन क्लबचे तुम्ही नेतृत्व करत आहात. त्यामुळे, औरंगजेबी फॅन क्लबच्या नेत्यांना, आता आम्हीच अमित शाह आणि त्यांचे सेवक तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा खरा इतिहास सांगू, असे आशिष शेलार यांनी म्हटले. संजय राऊत तुम्ही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना पुरावे विचारले. तुम्ही पाकड्या वृत्तीचे आधारू आहात. त्यामुळे पाकळ्या वृत्तीच्या संजय राऊत यांच्या डोळ्यात अंजन सेवकच घालतील, असेही आशिष शेलार यांनी म्हटलं.
संजय राऊतांना इसबगोल भेट देणार
स्वतः संजय राऊत आणि उबाठा सेना यांच्या पोटात मळमळ, जळजळ झाली. रायगडावर एवढा मोठा महोत्सव होतो, देशाचे गृहमंत्री अमित शहा येतात, आमच्या महाराजांसमोर नतमस्तक होतात. आमच्या महाराजांचा इतिहास जगभर पसरला पाहिजे, भूमिका मांडतात. स्वधर्म, स्वाभिमान यासाठी महाराजांना अभिवादन करतात. त्यामुळे, यांना पोटात जळजळ, मळमळ होणे स्वभाविक आहे. त्यामुळे संजय राऊत यांना इसबगोल सप्रेम भेट देतो, असेही शेलार यांनी म्हटले.
तुम्ही गाढव म्हणून राहा
याला बोलावलं, त्याला बोलवलं नाही याला छिदानवृत्ती म्हणतात. आमच्या कोकणाच्या भाषेत फाटक्यात पाय घालणं म्हणतात. फाटक्यात पाय घालायच्या वृत्तीने ना मत मिळणार, ना नगरसेवक, ना आमदार, तुम्ही फाटक्यात पाय घालून फाटके व्हाल, अशी टीकाही शेलार यांनी राऊतांवर केली. तोंडाला येईल ते बडबडणे याच्यावर केईएम हॉस्पिटलमध्ये एक उपचार करण्याचा प्रस्ताव सादर करणार आहे. त्यामुळे, काही लोकांची तोंड कायमची बंद होतील, असेही त्यांनी म्हटले. गाढव मेहनत करतो, तशी आम्ही मेहनत करतो असं संजय राऊत म्हणाले, त्यावर बोलताना आशिष शेलार यांनी तुम्ही गाढव म्हणून रहा, असा टोला लगावला.
हेही वाचा
Video: वो आये मेरी मजार पर... आधी आमदाराची फडणवीसांसाठी शायरी, मुख्यमंत्र्यांचाही शायराना अंदाज




















