एक्स्प्लोर

MI vs RCB IPL 2025 : रजत नावाचे सोने!

वानखेडे इथे झालेल्या बेंगलोर विरुद्ध मुंबई या सामन्यात बंगलोर संघाने विजय मिळवित गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली..

नाणेफेक जिंकून मुंबई संघाने प्रथम गोलंदाजी स्वीकारली ...पहिल्याच षटकात बोल्ट ने  त्याच्या गोलंदाजीची चव सॉल्ट ला दिली...पहिल्याच षटकात आज सॉल्ट त्याचा ३१ वा बळी ठरला.( पहिलेच षटकात घेतलेले बोल्ट चे बळी).पण मुंबई संघासाठी तेवढाच काय तो सुखाचा क्षण होता...कारण नंतर विराट ,देवदत्त आणि रजत यांनी मुबई मधील खेळाडूंना सीमेवरून चेंडू आण्यासाठीच ठेवले की काय असे वाटावे अशी परिस्थिती होती...
विराट आणि देवदत्त या दोघांनी दुसऱ्या विकेट साठी ५२ चेंडूत ९१ धावांची भागीदारी करून मोठ्या धावसंखेकडे पाहिले पाऊल टाकले..देवदत्त याने २२ चेंडूतील ३७ धावांच्या खेळीत ३ षटकार मारले..तर विराट याने आपल्या   ४२ चेंडूतील ६७ धावांच्या खेळीत  २ षटकार मारले...आज सुरुवातीपासून आक्रमणाची जबाबदारी  विराट ने घेतली होती..आज या हंगामात बुमराह पहिल्या वेळी आला आणि त्याचे स्वागत विराट ने त्याला लाँग ऑन वर षटकार मारून केले.त्याने आपले अर्धशतक सुद्धा विघ्नेश ला मारलेल्या षटकाराने पूर्ण केले...
देवदत्त जेव्हा चेंडू पुलं करतो तेव्हा त्याचा चेंडू युवराज सिंग सारखा काऊ कॉर्नर वर जाऊन पडतो..
देवदत्त बाद झाल्यावर कर्णधार रजत मैदानात आला...आणि आपल्या फलदाजीतील जादू दाखवायला सुरुवात केली...हार्दिक गोलंदाजी करीत असताना बऱ्याच वेळेला तो स्लो बाउन्सर टाकून चकित करीत असतो...पण आज रजत ने त्याचे हे अस्त्र एका वेगळ्याच फटक्याने निकामी केले..त्याने स्कूप मारले..त्याने रॅप शॉट मारले...त्याने एक्स्ट्रा कव्हर वरून षटकार मारले...कर्णधार म्हणून रजत ने या स्पर्धेत आपल्या फलंदाजीत देखील सातत्य ठेवले आहे...आज मुंबई संघाने चेंडू उजव्या यष्टी बाहेर ठेवून त्याला रोखण्याचा प्रयत्न केला पण त्याला यश येईपर्यंत त्याने धावांचा पाऊस पाडला होता...त्याने सुरवातीला विराट सोबत ४८ धावांची आणि नंतर जितेश सोबत ६९ धावांची ती सुद्धा केवळ २७ चेंडूत  भागीदारी करून मुंबई संघाला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला..
बंगलोर संघाच्या जितेश चे सुद्धा कौतुक करावे लागेल..खाली येऊन हा  आक्रमक खेळतो आणि काही देखण्या फटक्याने आपली खेळी सजवित असतो..आज सुद्धा त्याने १९ चेंडूत ४० धावा केल्या त्यात त्याने मारलेले ४ षटकार होते..

धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबई संघाची सुरुवात पुन्हा एकदा खराब झाली..रोहित शर्मा ने एक षटकार मारून आशा दाखविल्या होत्या...परंतु डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाचा आत येणारा चेंडू त्याची कायम डोकेदुखी होती..ती आज ही कायम राहिली...विल जॅक आणि सूर्यकुमार यांनी ४१ धावांची भागीदारी केली पण त्यासाठी त्यांनी ३६ चेंडू घेतले...आणि ही गोष्ट बंगलोर संघाच्या बाजूने गेली. मुबई च्या पाठलागात एकच गोष्ट चांगली झाली ती म्हणजे तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्यामध्ये झालेली भागीदारी .त्या दोघांनी ३४ चेंडूत ८९ धावांची भागीदारी केली त्यात हार्दिक १४ चेंडूत ४२ तर तिलक चा 43 धावांचा वाटा होता..त्या दोघांनी सामना मुंबई च्या बाजूने केलं होता.. पण सुरुवातीला तीलक भुवि च्या गोलंदाजीवर बाद झाला आणि त्याच्यानंतर 19 व्या षटकात पहिल्या चेंडूवर हार्दिक बाद झाला...आणि सामना मुंबईच्या हातून निसटला..या दोघांनी मिळून ८ षटकार मारले यावरून त्यांच्या खेळीचा परिणाम दिसून येतो..
खरे तर तिलक वर्मा याचे कौतुक करावे लागेल..मागील सामन्यात त्याने जो अपमान पचविला ..आणि आज २२१ धावांचा पाठलाग करणे ते देखील संघ अडचणीत असताना ही सोपी गोष्ट नाही. .तो आपल्या खेळी ने विजय मिळवून देऊ शकला नाही   पण काही इनिंग  चे मोजमाप त्याच्यपलिकडे जाऊन करायचे असते. . तिलक ची आजची खेळी ही त्या वर्गातील होती..

आज कौतुक करावे लागेल ते कर्णधार रजत पाटीदार याचे... तिलक आणि हार्दिक त्याच्या गोलंदाजांवर तुटून पडलेले असताना त्याने आपले डोके शांत ठेवले.. योग्य वेळी योग्य गोलंदाजाचा वापर करून त्याने फलंदाज चूक करण्याची वाट बघितली आणि त्याच्या ह्या डावपेचाना  यश देखील आले...
जेव्हा त्याने 19 वे षटक हीझलवूड कडे दिले तेव्हा त्याच्याकडे २० वे षटक टाकण्यासाठी फक्त कुणाल पांड्या हाच पर्याय उपलब्ध होता.. पण तो घाबरला नाही... आणि विसावे षटक त्यांनी दुसऱ्या कोणत्याही पर्यायाचा विचार न करता कुणाल पंड्याकडूनच टाकून घेतले... याच्यावरून त्याची खेळाची समज देखील लक्षात येते...
आतापर्यंत बंगलोर संघ पहिल्या चार मधे आहे..त्यांचा संघ कदाचित पंजाब इतका मजबूत वाटत नसेल..किंवा दिल्ली इतका संतुलित नसेल..पण ते आतापर्यंत एक सुद्धा विजेतेपद मिळवू शकले नाहीत...हीच कदाचित त्यांच्यासाठी प्रेरणा असेल...चिरतरुण विराट याला जाणीव आहे की आपल्या केबिन मध्ये कोणते विजेतेपद नाही..आणि बंगलोर संघातील इतर सहकाऱ्यांना आपल्या संघातील या महानायकाच्या मनातील सल माहित आहे...या वर्षी कदाचित ती सल भरून काढणारा कर्णधार रजत असेल..आणि तो कदाचित बंगलोर संघाचा सुवर्णकाळ सुरू करू शकतो...

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Smriti Mandhanna And Palash Muchhal: लग्न मोडलं, सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, नेमकं काय काय घडलं?
सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, काय घडलं?
Palash Muchhal: 'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
Ayodhya Crime News: मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
Video: भाजप खासदाराच्या लेकीच्या लग्नात कंगनाच्या साथीत सुप्रिया सुळे अन् महुआ मोईत्रा थिरकल्या!
Video: भाजप खासदाराच्या लेकीच्या लग्नात कंगनाच्या साथीत सुप्रिया सुळे अन् महुआ मोईत्रा थिरकल्या!
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Thane Crime News : ठाणे फॅमिली कोर्टाच्या बाहेर केकमध्ये गुंगीचं औषध देऊन महिलेवर वारंवार अत्याचार
Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Mandhanna And Palash Muchhal: लग्न मोडलं, सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, नेमकं काय काय घडलं?
सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, काय घडलं?
Palash Muchhal: 'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
Ayodhya Crime News: मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
Video: भाजप खासदाराच्या लेकीच्या लग्नात कंगनाच्या साथीत सुप्रिया सुळे अन् महुआ मोईत्रा थिरकल्या!
Video: भाजप खासदाराच्या लेकीच्या लग्नात कंगनाच्या साथीत सुप्रिया सुळे अन् महुआ मोईत्रा थिरकल्या!
Smriti Mandhana: स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! अफवांना वैतागून स्वत: पोस्ट करत म्हणाली, 'मला आता स्वतः बोलणं गरजेचं वाटतं म्हणून..'
स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! अफवांना वैतागून स्वत: पोस्ट करत म्हणाली, 'मला आता स्वतः बोलणं गरजेचं वाटतं म्हणून..'
Winter Session: विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस नव्याने मुख्यमंत्री व विधानपरिषद सभापतींकडे प्रस्ताव देणार
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस नव्याने मुख्यमंत्री व विधानपरिषद सभापतींकडे प्रस्ताव देणार
Sarangkheda Horse Market: मध्य प्रदेशातून आली खास पाहुणी; पुष्करमध्ये 1 कोटी 17 लाखांची किंमत, रोज 8 लिटर दूध पिणारी ऐटदार 'रुद्राणी' घोडी सारंगखेडा अश्वबाजारात
मध्य प्रदेशातून आली खास पाहुणी; पुष्करमध्ये 1 कोटी 17 लाखांची किंमत, रोज 8 लिटर दूध पिणारी ऐटदार 'रुद्राणी' घोडी सारंगखेडा अश्वबाजारात
Nightclub Fire in Goa: स्फोट होताच तळघरात पळाले अन् तिथंच 20 जणांचा धुरात घुटमळून जीव गेला, तिघांचा कोळसा झाला; गोव्यातील मध्यरात्रीच्या थरकापात काय काय घडलं?
स्फोट होताच तळघरात पळाले अन् तिथंच 20 जणांचा धुरात घुटमळून जीव गेला, तिघांचा कोळसा झाला; गोव्यातील मध्यरात्रीच्या थरकापात काय काय घडलं?
Embed widget