Gold Rate : सोन्याचे दर 1 लाखांचा टप्पा पार करणार की घसरण सुरु होणार, तज्ज्ञ नेमकं काय म्हणाले?
Gold Prices: गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचे दर वाढत आहेत. अमेरिका-चीन यांच्यातील ट्रेड वॉरमुळं तणाव वाढलेला आहे. याचा परिणाम सोने दरावर झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Gold Prices नवी दिल्ली: भारतात गेल्या तीन महिन्यात सोन्याचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ वॉर सुरु करण्याचे संकेत देताच गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून सोन्यातील गुंतवणुकीचा पर्याय स्वीकारला सध्या 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर 93000 हजारांच्या पर्यं पोहोचले आहेत. अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धामुळं निर्माण झालेली अस्थिरता, केंद्रीय बँकांकडून करण्यात येत असलेली सोने खरेदी, व्याज दरातील कपातीच्या आशेमुळं सोन्याचे दर वाढत आहेत. आता सोन्याचे दर एक लाख रुपयांचा टप्पा पार करणार का हे पाहावं लागेल.
बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार स्प्रोट असेट मॅनेजमेंटच्या वरिष्ठ पोर्टफोलिओ मॅनेजर रयान मॅकइंटायर यांच्या मतानुसार केंद्रीय बँकांच्या सोने खरेदीमुळं आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रमप यांच्या आक्रमक धोरणामुळं सोने दरात वाढ पाहायला मिळत आहे.
भारतातील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचे दर: 93,390 रुपये प्रति 10 ग्रॅम
22 कॅरेट सोन्याचे दर: 85,610 रुपये प्रति 10 ग्रॅम
18 कॅरेट सोन्याचे दर: 70,050 रुपये प्रति 10 ग्रॅम
जागतिक स्तरावर सोन्याचे दर 3200 डॉल प्रति औंसच्या पुढे गेल्या आहेत. अमेरिकन सोन्याच्या वायद्याचे भाव 3237.50 डॉलर प्रति औंस वर पोहोचले आहेत. 2025 मध्ये सोन्यानं 20 वेळा उच्चांक गाठला आहे. महागाई, डॉलरची कमजोरी आणि केंद्रीय बँकांनी बदललेलं धोरण याचा सोन्याच्या दरावर परिणाम झाला आहे.
सोनं एक लाखांपर्यंत पोहोचणार?
कामा ज्वेलरीचे एमडी कॉलिन शाह यांना सोन्याचे दर 1 लाखांचा टप्पा पार करेल असं वाटत आहे. त्यांनी द हिंदू बिझनेस लाईनश बोलताना म्हटलं की अमेरिकेच्या फेडकडून व्याज दरात कपात केली जाण्याची शक्यता आहे. यामुळं सोन्याचे दर 1 लाखांचा टप्पा पार करु शकतात. अनिश्चिततेच्या काळात लोक सोन्यामध्ये अधिक गुंतवणूक करतात असं ते म्हणाले.
मोतीलाल ओसवालचे कमोडिटी हेड किशोर नारने यांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 4000 ते 4500 डॉलर प्रति औंसपर्यंत जाऊ शकतात. अबास फायनान्शिअल सर्व्हिसेसचे सीईओ चिंतन मेहता यांच्या मतानुसार सोन्याचा दर 1 लाखांचा टप्पा गाठण्याची शक्यता कमी आहे. कारण, बाजारात सकारात्मक स्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळं सोन्याचे दर वाढण्याची शक्यता कमी आहे. मॉर्निंग स्टारचे रणनीतीकार जॉन मिल्स यांनी याबाबत सतर्कता बाळगली आहे. त्यांनी सोन्याच्या दरात मोठी घसरण होऊन ते 1820 डॉलर प्रति औंसवर येतील असा अंदाज वर्तवला आहे.

















