Hanuman Jayanti 2025 Wishes : जय बजरंगबली! हनुमान जयंतीच्या मित्र परिवाराला द्या मराठमोळ्या शुभेच्छा; पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश
Hanuman Jayanti 2025 Wishes : चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती म्हणून ओळखली जाते. या दिवशीही तुम्ही आपल्या नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना शुभेच्छा पाठवू शकता.

Hanuman Jayanti 2025 Wishes : हिंदू धर्मशास्त्रानुसार, 12 एप्रिल 2025 रोजी म्हणजेच उद्या हनुमान जयंती (Hanuman Jayanti) साजरी केली जाणार आहे. चैत्र शुद्ध पौर्णिमेला अंजनी मातेच्या पोटी भगवान हनुमानाचा जन्म झाला. त्यामुळे चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती म्हणून ओळखली जाते. या दिवशीही तुम्ही आपल्या नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना शुभेच्छा पाठवू शकता.
हनुमान जयंती शुभेच्छा संदेश 2025 :
जय हनुमान ज्ञान गुणसागर, जय कपिश तिहू लोक उजागर
रामदूत अतुलित बल धामा
अंजनीपुत्र पवनसुत नामा,
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
सूर्याला घ्यायला गेला घास,
जो वीरांचा आहे खास,
त्याच्या शक्तीपुढे सर्व काही लहान
असा रामभक्त आहे सर्व भक्तांमध्ये महान
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!
अंजनीसूत, पवनपुत्र बजरंग बली,
ज्याने फक्त शेपटीने लंका जाळली,
अशा बलशाली हनुमानास कोटी कोटी प्रणाम
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!
'भूतप्रेतसमंधादी,
रोगव्याधी समस्तही,
नासती तूटती चिंता,
आनंदे भीमदर्शनें"
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!
"भगवान श्री हनुमान आपल्या जीवनात आनंद,
शांती आणि समृद्धी मिळवून देवो
आणि त्याची कृपादृष्टी आपल्या परिवारावर कायम राहो"
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
"ज्याच्या तनी मनी वसतो राम
जो साऱ्यांमध्ये असे बलवान
असा सर्व जगी न्यारा नाव त्यांचे हनुमान"
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!
रामाप्रती भक्ती, तुझी राखे अंतरी,
रामासाठी शक्ती, तुझी राम राम बोले वैखरी...
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!
महारुद्र अवतार हा सूर्यवंशी
अनादिनाथ पूर्ण तारावयासी
असा चैत्री पौर्णिमेचा जन्म झाला
नमस्कार माझा तया मारुतीला
हनुमान जयंतीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
रामाचा भक्त तू, वाऱ्याचा पुत्र तू,
शत्रूची करतोस दाणादाण
तुझ्या ह्रदयात फक्त सीताराम…
अशा बजरंग बलीला आमचे
कोटी कोटी प्रणाम"
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!
भूत पिशाच निकट नहीं आवे,
महावीर जब नाम सुनावे...
नासे रोग हरे सब पीरा,
जपत निरंतर हनुमत वीरा...
हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
भीमरुपी महारुद्रा,
वज्र हनुमान मारुती
वनारी अंजनीसूता,
रामदूता प्रभजना...
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:




















