Priyansh Arya PBKS vs CSK IPL 2025: प्रियांश; पंजाबचा नवा किंग

Priyansh Arya PBKS vs CSK IPL 2025: आज चंदीगड इथे झालेल्या पंजाब विरुद्ध चेन्नई सामन्यामध्ये पुन्हा एकदा पंजाबच किंग ठरला...आणि त्याला कारण होते त्यांच्या ताफ्यात दाखल झालेला नवा हिरा प्रियांश...नाणेफेकीचा कौल पंजाब ने जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली...आज खलीलने टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर प्रियांश ने त्याला कव्हर पॉईंट वरून फेकून देऊन आजच्या खेळीचा शंख नाद केला.
प्रियांश आर्या हा खेळाडू दक्षिण दिल्लीकडून दिल्ली प्रीमियर लीग मध्ये खेळत असताना त्याने ६ चेंडूत ६ षटकार मारले होते...आणि जेव्हा त्याला पंजाब ने आपल्या ताफ्यात ३.८ कोटी मध्ये घेतले. .तेव्हा हा युवक मोठ्या स्टेज वर मोठ्या गोलंदाजा समोर परफॉर्म करेल का,? हा प्रश्न विचारला गेला....आज प्रियांशने त्याचे उत्तर आपल्या बॅटने दिलेले आहे...आज त्याने केवळ ४२ चेंडूत शतक झळकावले त्यात त्याचे ९ षटकार होते..हा युवक षटकार मारण्याच्या बाबतीत कुठे ही कमी पडत नाही....त्याने आज कव्हर पॉईंट पासून डीप फाइन लेग पर्यंत सर्व भागात फटके खेळले. ...त्याने आज ड्राईव्ह..पुल.. फ्लिक पासून स्लॉग स्वीप असे सर्व फटके खेळले...त्याच्या आजच्या खेळीत दिसला तो प्रचंड आत्मविश्वास...आणि निर्भयता...अर्थात याचे श्रेय द्यावे लागेल ते कर्णधार श्रेयस आणि प्रशिक्षक पाँटिंग यांना...तो निर्भय होता...साहसी होता म्हणूनच आज नशीब सुद्धा त्याच्या बाजूने होते...
Fortune Favors the Brave" - . हे वाक्य आज प्रियांश आर्याने चंदीगड मध्ये खरे करून दाखविले.. प्रियांश आर्या वगळता आणि शशांक सिंग आणि मार्को जॉन्सन वगळता पंजाबचे इतर फलंदाज दुहेरी आकडा सुद्धा पार करू शकले नाहीत...त्यांची ६ षटकात ७३ धावा आणि ३ बळी तर १० षटकात त्यांचे ५ बळी गेले होते...तिथून पंजाब ने २१९धावांचा टप्पा ओलांडला तो प्रियांश आणि शशांक आणि शशांक आणि मार्को जॉन्सन यांच्या भागीदारी मुळे..
गेल्या आय पी एल मधे सुद्धा शशांक वेळोवेळी संकटमोचक बनून उभा राहिला ..किती बिनधास्त खेळतो तो....त्याचा स्लॉग स्वीप पाहण्यासारखा असतो..आज सुद्धा त्याने अर्धशतक करून आपली उपयुक्तता सिद्ध केली.. चेन्नई कडून खालील आणि अश्विन यांनी प्रत्येकी दोन बळी मिळविले पण दोघांनी मिळून ९३ धावा मोजल्या...
२२० धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या चेन्नई संघाची सुरुवात सुद्धा न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी दणक्यात केली..त्यांनी पहिल्या विकेट साठी ६१ धावांची सलामी दिली..खूप दिवसांनी चेन्नई संघाच्या पॉवर प्ले मध्ये चांगल्या धावा लागल्या..पण रवींद्र बाद झाल्यावर चेन्नई कडून शिवम आणि कॉन्वे यांच्यात ८९ धावांची भागीदारी झाली...आज सुद्धा ऋतुराज अपयशी ठरला ,शॉर्ट मीड ऑन वर त्याचा सुंदर झेल घेतला गेला..शिवम बाद झाल्यावर आवश्यक धावगती सुद्धा १४ च्या जवळ गेली शेवटी धोनी ने प्रयत्न केले पण ते अपुरे पडले. आज पंजाब संघाने सुद्धा झेल सोडण्याच्या बाबतीत आम्ही सुद्धा कमी नाहीत हे दाखविले..१२ व्या षटका मध्ये सलग २ चेंडूवर कॉन्वे चे झेल सोडले....खरे तर ज्या संघाचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग आहेत त्यांनी असे सोपे झेल सोडायला नको होते...पण उद्या कदाचित पत्रकार परिषद घेऊन पाँटिंग म्हणतील " काय झाले कुणास ठाऊक काल डोक्यात कुठून राहू केतू घुसले काय माहित आणि झेल सुटले"..काल दिवसभरात दोन्ही सामन्यात २०० धावांचा पाठलाग करीत असताना दोन्ही संघाना निसटता पराभव स्वीकारावा लागला...पण येणाऱ्या सामन्यात क्रीडा रसिकाना तो पाहायला मिळेल इतके मात्र नक्की..
























