Jaat Box Office Collection: 'जाट' पडला 'छावा'वर भारी, पहिल्या रविवारी बॉक्स ऑफिसवर कमाई धुवांधार; किती कमावले?
Jaat Box Office Collection: सनी देओलच्या स्टारडमसमोर विक्की कौशलची बोलती बंद झाल्याचं पाहायला मिळालं. 'जाट'नं अवघ्या 4 दिवसांत 'छावा'ला कसं हरवलं, याबाबत सविस्तर जाणून घेऊयात...

Jaat Box Office Collection: सनी देओलचा (Sunny Deol) 'जाट' (Jaat Movie) प्रदर्शित झाला, त्यावेळी पहिल्या दिवशी त्यानं फक्त 9.5 कोटी रुपये कमावले. साऊथचे दिग्दर्शक गोपीचंद मालिनेनी यांच्या चित्रपटाची ही सुरुवात चांगली मानली जात होती. कारण, व्यापार तज्ज्ञ आणि चित्रपट समीक्षकांच्या मते, जवळजवळ समान सुरुवात अपेक्षित होती.
दुसऱ्या दिवशी फक्त 7 कोटी रुपयांची कमाई केल्यानंतर, तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत चांगली वाढ दिसून आली. तिसऱ्या दिवशी चित्रपटानं 9.75 कोटी रुपये कमावले आणि आता चौथ्या दिवशी ही कमाई 15 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
'जाट'नं अनेक मोठे विक्रम रचले
'जाट'नं केवळ वर्षातील सर्वात मोठ्या ओपनिंग चित्रपटांच्या यादीत (छावा, सिकंदर आणि स्काय फोर्सनंतर चौथा) स्थान मिळवलेलं नाही तर, या वर्षी प्रदर्शित झालेल्या 13 बॉलीवूड चित्रपटांपैकी 10 चित्रपटांच्या आयुष्यभराच्या कलेक्शनलाही मागे टाकलं. दरम्यान, यासह चित्रपटानं त्याच्या पहिल्या रविवारच्या कलेक्शनमध्ये आणखी एक विक्रम केला आहे आणि 'छावा'ला मागे टाकलं आहे.
'जाट'ची 'छावा'वर मात
आम्ही 'जाट'च्या पहिल्या रविवारच्या कलेक्शनची तुलना 'छावा'च्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनशी केली आणि त्यातील टक्केवारीत वाढ शोधण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात 'जाट' जिंकत असल्याचं दिसून आलं. कसं ते सविस्तर जाणून घेऊयात...
'छावा'नं पहिल्या दिवशी 31 कोटी आणि पहिल्या रविवारी 48.5 कोटींची कमाई केली. जर आपण या दोन दिवसांच्या कमाईच्या टक्केवारीवर नजर टाकली तर, पहिल्या दिवसाच्या तुलनेत रविवारी 'छावा'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन 56.45 टक्क्यांनी वाढलं.
View this post on Instagram
आता जर आपण 'जाट'च्या पहिल्या दिवसाच्या कमाईवर नजर टाकली तर, ती 9.5 कोटी रुपये होती. रविवारी, ही कमाई वाढून 15 कोटी रुपये झाली (ही आकडेवारी बदलू शकते). याचा अर्थ पहिल्या दिवसाच्या तुलनेत चित्रपटाची कमाई 57.89 टक्क्यांनी वाढल्याचं पाहायला मिळालं. पहिल्या रविवारी विक्की कौशलच्या 'छावा'ला सनी देओलच्या 'जाट'च्या तुलनेत अंदाजे 1 टक्का कमी लोकप्रियता मिळाली हे स्पष्ट आहे.
दरम्यान, 'पुष्पा 2' सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देणाऱ्या प्रॉडक्शन हाऊस, मैथ्री मूव्ही मेकर्सनं 100 कोटी रुपयांमध्ये 'जाट' बनवला आहे. या चित्रपटात सनी देओल मुख्य भूमिकेत आहे. त्याच्याशिवाय रणदीप हुड्डा आणि विनीत कुमार सिंह हे देखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत. जगपती बाबू, सैयामी खेर, रेजिना कॅसांड्रा आणि राम्या कृष्णन यांनी या चित्रपटात काम केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























