IPL 2025 RCB vs LSG: कलात्मक लखलखता राहुल

IPL 2025 RCB vs LSG: आज पुन्हा एकदा बंगलोर इथे दिल्लीचा विजयरथाची घोडदौड रजत आणि त्यांचे सहकारी रोखू शकले नाहीत...आज सुद्धा त्यांच्या विजय रथाचे सारथ्य केले ते राहुल याने...नाणेफेकीचा कौल दिल्ली संघाने जिंकून त्यांनी प्रथम फलंदाजीस आमंत्रण दिले ते बंगलोर संघाला...बंगलोर संघाची सलामी वादळी झाली...सांघिक तिसऱ्या आणि वैयक्तिक स्टार्क च्या दुसऱ्या षटकात सॉल्ट ने तुफानी हल्ला चढविला ...त्याने दुसऱ्या षटकात ३० धावा चोपून काढल्या त्यात सॉल्ट ने एकट्याने २४ धावा काढल्या...त्याचा षटकाच्या समाप्तीनंतर बंगलोर संघाची धावसंख्या होती बिनबाद ५३...बंगलोर संघाने पॉवर प्ले चा उचललेला फायदा पाहून प्रथम क्षेत्रक्षणाचा निर्णय अंगलट येतो की काय असे दिल्ली संघाला वाटत असेल..पण ४ चौथ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर सॉल्ट दुर्दैवाने धावबाद झाला..खरे तर विराट सारखा खेळाडू कधी कधी नकळत पणे आपल्या जोडीदाराकडे न पाहता समोरील क्षेत्ररक्षकाकडे पाहतो त्याच्यामुळे समन्वयाचा अभाव होतो आणि जोडीदार धावबाद होतो..असे खूप वेळा घडते..सांघिक ६१ धावसंखेवर सॉल्ट ज्या रूपात पहिला मोहरा गळून पडला आणि त्यानंतर बंगलोर संघाची वाताहत सुरू झाली ती अगदी शेवटपर्यंत..त्यानंतर ठराविक अंतराने बंगलोर संघाचे बळी गेले..परिणामी त्यांच्या नंतर १६.१ षटकात केवळ ९५ धावा जमू शकल्या त्यासुद्धा ९७ चेंडूत...आणि हेच त्यांच्या पराभवाचे मुख्य कारण आहे...सॉल्ट आणि विराट यांच्या नंतर त्यांची दुसऱ्या क्रमांकाची भागीदारी डेव्हिड आणि भुवि यांच्यामधील होती...यावरून त्यांचे कोलमडणे लक्षात येते...याचे श्रेय अक्षर याला द्यावे लागेल...सॉल्ट आक्रमण करीत असून सुद्धा त्याने पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी केली आणि ती सुद्धा किफायतशीर...त्याने उत्तम क्षेत्ररक्षण लावून बंगलोर संघाच्या फलंदाज्यांना चूक करण्यास भाग पाडले...आजच्या सामन्यातील कर्णधार पदासाठी त्याला पैकीच्या पैकी गुण द्यावे लागतील..
१५७ धावांचे आव्हान घेऊन उतरलेला दिल्ली संघ सुद्धा अडचणीत आला होता..त्यांचे सुरुवातीचे ३ फलंदाज अक्रॉस खेळत असताना बाद झाले होते...त्यात उंच उडालेले झेल जतीन ने प्रसंगावधान राखून उत्तम रित्या पकडले..अक्षर सुद्धा लवकर बाद झाला...रजत ने यश दयाळ च्या गोलंदाजीवर कव्हर मध्ये उडालेला छेल जर पकडला असता तर दिल्ली संघ खूपच अडचणीत आला असता पण अर्थातच तो झेल खूप कठीण होता. पण नंतर सुरू झाला तो ..कमाल लाजवाब राहुल चा शो... या शो मध्ये देखणेपण होते...कलात्मकता होती...टायमिंग होते.. ..२०/२० क्रिकेट मधील फटके होते...कसोटीतील तंत्र होते...आणि मंत्रमुग्धता होती....सौरभ गांगुली यांना एकदा विचारले होते की भविष्यात कोणता फलंदाज पाहायला आवडेल तेव्हा त्यांनी राहुल चे नाव घेतले होते..त्याच्याकडे रोहित ची सहजता आहे आणि विराटची भक्कमता....आज त्याने दिल्ली संघाला गरज असताना मैदानात पाय रोवून फलंदाजी केली...त्यात ड्राईव्ह मारले...कट मारले... पूल मारले...आणि माझ्याकडे रिव्हर्स स्वीप आणि लॅप शॉट आहे हे दाखविताना ते सुद्धा सराईतपणे मारले...बंगलोर मध्ये थोडे ढगाळ वातावरण तयार झाले आणि राहुल १५ व्या षटकात फलंदाजी करीत होता... त्या षटकाच्या समाप्तीनंतर डकवर्थ लुईस च्या नियमाप्रमाणे 115 धावा धावफलकावर असणे अत्यंत गरजेचे होते... आणि ते षटक बंगलोर संघाकडून हेजलवुड घेऊन आला होता..त्या षटकात राहुल ने २० धावा चोपून काढल्या..षटकातील पहिल्याच चेंडूवर जोल स्लो लेग कटर होता त्याला कट करून ऑफ साईडला चौकार वसूल केलं... पुढील चौकार बॅकवर्ड पॉईंट वर ..नंतर स्क्वेअर लेग सीमा बाहेर..आणि शेवटच्या चेंडूवर इन साईड आउट होऊन एका ऑफ ड्राईव्ह वर स्वीपर कव्हर सीमारेषे बाहेर षटकार वसूल करून दिल्ली संघाची धावसंख्या १२१ वर नेऊन ठेवली जी ६ धावा अधिक होती.. एक दिवसीय सामन्यात रोहित शर्मा त्याच्यावर इतका विश्वास का ठेवतो ही गोष्ट समजण्यासाठी राहुल याची आजची खेळी पुरे आहे. त्याने ५५ चेंडूत स्टब सोबत १११ धावांची अभेद्य भागीदारी केली...या भागीदारीत स्टब स्तब्ध होता त्यामुळे त्याचे सुद्धा कौतुक...आजच्या विजयाने दिल्ली संघाने ८ गुणांसह आघाडी घेतली...एक सुद्धा पराभव न पाहिलेला दिल्ली संघाचा अश्वमेध कोण रोखू शकतो हाच काय तो प्रश्न..रोहित शर्माची फलंदाजी ही माधुरी सारखी मनमोहक असली तरी राहुल च्या फलंदाजीत मनमोहक ता आणि दिव्या भारतीचा सोज्वळ पणा सुद्धा आहे....आणि आमच्यासारख्या नव्वद सालतील तरुणांना या दोन्ही गोष्टी सारख्याच आवडतात..
संबंधित बातमी:
IPL 2025 GT vs RR: शास्त्रीय (फलंदाज) साईने २०/२० ची मैफिल सजविली

























