एक्स्प्लोर
वाघाच्या गळ्यात ज्यानं घंटा बांधली तोच सोडू शकतो, तुम्हीच टॅरिफ थांबवा, चीनची नरमाईची भूमिका,डोनाल्ड ट्रम्प आता काय करणार?
Donald Trump : अमेरिका आणि चीन टॅरिफच्या मुद्यावरुन आमने सामने आले आहेत. दोन्ही देशांनी एकमेकांवरील टॅरिफ वाढवलं आहे. चीननं आता एक पाऊल मागं जाण्याचे संकेत दिलेत.
अमेरिका-चीन टॅरिफ वॉर
1/5

अमेरिका आणि चीन टॅरिफ वॉरच्या निमित्तानं आमने सामने आले आहेत. चीननं अमेरिकेला सुरुवातीला जशास तसं उत्तर दिलं. आता चीननं नरमाईची भूमिका घेतली असून अमेरिकेनं परस्पर शुल्क पूर्ण रद्द करावं अशी मागणी केली आहे.
2/5

चीनच्या वाणिज्य मंत्रालयानं म्हटलं की अमेरिकेकडे त्यांच्या चुका सुधारण्यासाठी एक पाऊल टाकण्याची संधी आहे. परस्पर शुल्क प्रथा चुकीची असून ती पूर्णपणे रद्द करावी आणि सन्मानाच्या मार्गावर अमेरिकेनं यावं, असं चीननं म्हटलं. डोनाल्ड ट्रम्प यांन स्मार्ट फोन, लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांना टॅरिफमधून सूट देण्याची घोषणा केली होती.
3/5

वाघाच्या गळ्यात बांधलेली घंटा केवळ तोच व्यक्ती सोडवू शकतो, ज्यानं ती बांधली आहे. ट्रम्प प्रशासनानं त्यांच्या टॅरिफ संदर्भातील दृष्टिकोन बदलण्याचं आवाहन करतो, असं चीननं म्हटलं.
4/5

चीननं म्हटलं की त्यांच्याकडून ट्रम्प यांच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू परस्पर शुल्काबाहेर ठेवण्याच्या निर्णयाचा अभ्यास सुरु आहे. अमेरिकेनं चीनवर लादलेलं 145 टक्के टॅरिफ अजून लागू आहे.
5/5

डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर 145 टॅरिफ लादलं आहे. दुसरीकडे चीननं देखील 125 टक्के टॅरिफ अमेरिकेवर लादलं आहे.चीननं अमेरिकेच्या एकतर्फी आर्थिक धोरणांविरुद्ध इतर देशांनी एकत्र यावं असं म्हटलंय.
Published at : 13 Apr 2025 09:00 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
महाराष्ट्र




















