IPL 2025, RR vs RCB : शाही सामन्यात बंगळुरुचा शाही विजय

आज झालेल्या राजस्थान विरुद्ध बंगळुरु सामन्यात बंगळुरुने शाही विजय संपादन केला..
नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारून प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले ते राजस्थान च्या शाही यजमानांना...
या आयपीएल मध्ये जो संघ पॉवर प्लेचा फायदा घेतो तो संघ विजयी ठरतो..आज पहिल्या 6 षटकामध्ये राजस्थान रॉयल्सच्या फक्त 45 धावा झाल्या...त्यामुळे प्रथम फलंदाजी करून विरोधी संघावर दबाव टाकण्याची संधी त्यांनी तिथे गमावली...राजस्थानची सलामीची भागीदारी 49 धावांची झाली ...त्यात संजू 15 धावा काढून बाद झाला...उजव्या यष्टीचा बाहेर जाणाऱ्या चेंडूवर एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो कुणाल च्या गोलंदाजीवर बाद झाला..
संजू बाद झाल्यावर रियान पराग आणि यशस्वी यांच्यामध्ये 56 धावांची भागीदारी झाली...आज यशस्वी ने त्याच्या लौकिकास साजेशी फलंदाजी केली...त्याने थर्ड मॅन परिसरात मारलेले कट चे फटके कलात्मक होते..कोणताही धोका न पत्करता ते खेळत होता ...47 चेंडूत त्याने 75 धावा केल्या...हेझलवूड च्या गोलंदाजीवर अक्रॉस खेळताना तो पायचीत सापडला... रियान 22 चेंडू 30 धावा आणि शेवटी ध्रुव जुरेल यांनी 23 चेंडूत 35 धावा काढून राजस्थान संघाची धावसंख्या 173 पर्यंत नेली..
आजच्या राजस्थानच्या खेळीत फक्त 5 षटकार मारले गेले...आणि षटकारांच्या या लढाईत राजस्थान संघ कमी पडला...
174 धावांचे आव्हान घेऊन उतरलेला बंगळुरु संघ आज हिरव्या रंगाच्या जर्सी मध्ये खेळताना आणखीन आक्रमक झाला...हिरवा रंग भरभराटीचा द्योतक आहे..आणि ही भरभराट त्यांच्या सॉल्ट ने पॉवर प्ले मध्ये करून दिली..त्याच्या वाट्याला आलेल्या प्रत्येक आखूड टप्प्याच्या चेंडू ला त्याने सीमारेषा दाखविली...33 चेंडूत 65 धावा करताना त्याने 6 षटकार मारले..आणि पॉवर प्ले बंगळुरु संघाच्या नावावर केला...ही लढाई षटकारांची आहे आणि एकट्या सॉल्ट ने 6 षटकार मारून ही लढाई तिथेच बंगळुरु च्या बाजूने केली..
आज सॉल्टच्या विकेट नंतर विराट आणि देवदत्त यांनी उत्तम फलंदाजी केली..विराट ने पुन्हा एकदा धावांचा पाठलाग करीत असताना तो का महान आहे हे दाखविले.. सॉल्टने घातलेल्या पायावर आपल्याला फक्त कळस चढवायचा आहे हे त्याला माहित होते...आणि देवदत्त च्या साथीने तो त्याने चढविला...पूर्ण भरात असलेला देवदत्त पाहणे ही सुद्धा एक मेजवानी असते..आज त्याच्या 40 धावांच्या खेळीत त्याने काही दर्शनीय फटके मारले..विराटने या स्पर्धेतील आपले आणखीन एक अर्धशतक पूर्ण केले..आजच्या सामन्यात यजमानांनी क्षेत्रक्षणात खूप वेळा दया दाखविली...आणि त्यामुळेच हा सामना एकतर्फी झाला...15 चेंडू राखून हा विजय मिळवून बंगळुरु संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर विराजमान झाला...रजत पाटीदार या कर्णधाराला त्याचे श्रेय द्यावे लागेल..




















